सातारा : आमदार फंडासह विविध केंद्र आणि राज्य शासनाच्या विविध योजनांच्या माध्यमातून भरीव निधी उपलब्ध करुन आ. श्रीमंत छ. शिवेंद्रसिंहराजे भोसले यांनी सातारा- जावली मतदासंघात विकासकामांचा झंजावात सुरु ठेवला आहे. ग्रामीण भागातील विकास कामांसाठी जिल्हा परिषदांना सहायक अनुदान (2515) या योजनेतून त्यांनी सातारा आणि जावली तालुक्यातील विविध 23 विकासकामांसाठी तब्बल 1 कोटी 26 लाख रुपये निधी मंजूर करुन घेतला आहे.
राज्यातील गावांतर्गत मुलभुत सुविधांच्या कामांसाठी निधी उपलब्ध करुन देण्याबाबत अनेक लोकप्रतिनिधींकडून शासनाला प्रस्ताव प्राप्त होत असतात. आ. शिवेंद्रसिंहराजे यांनीही सातारा आणि जावली तालुक्यातील विविध गावांमध्ये ग्रामस्थांना अपेक्षित विकासकामांचे प्रस्ताव संबंधीत विभागांमार्ङ्गत शासनाकडे पाठवले होते. सदर प्रस्तावांना 2515 योजनेंतर्गत मंजूर मिळाली असून या कामांसाठी 1 कोटी 26 लाख रुपये निधी मंजूर झाला आहे.
सातारा तालुक्यातील सैदापूर येथील जगदेश्वर कॉलनी येथे बंदीस्त पाईप गटर करणे. सैदापूर येथील संभाजीनगर, आदित्य नगर आणि राणा प्रताप नगर येथे रस्ता कॉंक्रीटीककरण करणे. तसेच सैदापूर येथील अवधुत नगर येथे ओपण स्पेस मध्ये पेव्हर ब्लॉक बसवणे या कामांना मंजूरी मिळाली असून सैदापूर येथील एकूण 5 कामांसाठी 15 लाख रुपयांचा निधी उपलब्ध झाला आहे. सातारा तालुक्यातील लिंब गावात 5 कामांसाठी 27 लाख रुपये निधी मंजूर करण्यात आला आहे. यामध्ये लिंब फाटा ते लिंब चौक अखेर रस्ता खडीकरण आणि डांबरीकरण करण्यासाठी 15 लाख रुपये. लिंब येथील नवीन गावठाण दादाच्या घरापाठीमागे रस्ता कॉंक्रीटीकरण करणे. रामेश्वर रस्ता खडीकरण करणे. पवळेश्वर नगर येथे गटर करणे आणि दुल्हा टेक लिंब अंतर्गत रस्ता डांबरीकरण करणे या कामांसाठी 12 लाख रुपये निधी मंजूर झाला आहे.
गवडी येथील रस्ता कॉंक्रीटीकरण करणे तसेच घोडेवस्ती ते मधली वाडी हा रस्ता तयार करण्यासाठी निधी मंजूर झाला आहे. नुने येथील अंतर्गत रस्ता तयार करणे आणि डोळेगाव येथे अंतर्गत कॉंक्रीटीकरण करणे. खडगांव येथे पेव्हर ब्लॉक बसवणे. निगुडमाळ येथे पोहोच रस्ता खडीकरण करणे. ताकवली येथे संरक्षण भिंत बांधणे. आंबवडे बु. येथे स्मशानभुमीकडे जाणारा रस्ता खडीकरण व डांबरीकरण करणे आणि सोनवडी- खामकरवस्ती येथे पेव्हर ब्लॉक बसवणे या कामांनाही भरिव निधी उपलब्ध झाला आहे.
जावली तालुक्यातील दिवदेव अंतर्गत रस्ता कॉंक्रीटीकरण करण्यासाठी 8 लाख रुपये, बेलोशी अंतर्गत रस्ता डांबरीकरण करण्यासाठी 14 लाख रुपये, महु अंतर्गत रस्ता डांबरीकरण करण्यासाठी 13 लाख रुपये तर, गावडेवाडे (खर्शीबारामुरे) येथे अंतर्गत रस्ता डांबरीकरण करण्यासाठी 14 लाख रुपये निधी मंजूर झाला आहे. मंजूर कामांची तातडीने निविदा प्रक्रीया राबवून लवकरात लवकर प्रत्यक्ष कामांना सुरुवात करावी आणि कामे दर्जेदार करावीत अशा सुचना आ. शिवेंद्रसिंहराजे यांनी संबंधीत अधिकार्यांना केल्या आहेत.
सराईत गुन्हेगाराने दिली तीन घरफोड्यांची कबुली |
उदयनराजे यांच्या समर्थनार्थ सातार्यात लोटला जनसागर |
शिक्षक हेच सुसंस्कृत समाजनिर्मितीचे जनक |
अजिंक्यतारा कारखान्यावर वादातून झाला गोळीबार |
जनता बँक साताराच्या तज्ज्ञ संचालकपदी सौरभ रायरीकर, राजेंद्र जाधव यांची निवड |
महिलेची गळफास घेवून आत्महत्या |
एकाच्या मृत्यूप्रकरणी कार चालकावर गुन्हा |
संशयित माल जवळ बाळगल्याप्रकरणी एकावर गुन्हा |
राहत्या घरातून युवती बेपत्ता |
वाई, जावळी परिसरात जोरदार अवकाळी पाऊस |
विरोधकांच्या रडीच्या डावाला जनता भुलणार नाही |
महायुतीचे आज सातार्यात जोरदार शक्ती प्रदर्शन |
सातारा जिल्ह्यात राम लल्लाच्या गजराने रामनवमी साजरी |
उदयनराजे यांच्या शक्तीप्रदर्शनासाठी आमदार शिवेंद्रसिंहराजे सज्ज |
सातारा जिल्ह्यात रामनवमी उत्साहात साजरी |
महिलेची गळफास घेवून आत्महत्या |
एकाच्या मृत्यूप्रकरणी कार चालकावर गुन्हा |
संशयित माल जवळ बाळगल्याप्रकरणी एकावर गुन्हा |
राहत्या घरातून युवती बेपत्ता |
वाई, जावळी परिसरात जोरदार अवकाळी पाऊस |
विरोधकांच्या रडीच्या डावाला जनता भुलणार नाही |
महायुतीचे आज सातार्यात जोरदार शक्ती प्रदर्शन |
सातारा जिल्ह्यात राम लल्लाच्या गजराने रामनवमी साजरी |
उदयनराजे यांच्या शक्तीप्रदर्शनासाठी आमदार शिवेंद्रसिंहराजे सज्ज |
सातारा जिल्ह्यात रामनवमी उत्साहात साजरी |
उष्माघातावरील उपचारासाठी सर्व शासकीय रुग्णालयांमध्ये कक्ष स्थापन |
आदर्श आचारसंहितेच्या काटेकोरपणे अंमलबजावणीस सर्वोच्च प्राधान्य : जिल्हाधिकारी डुडी |
श्रीराम नवमी निमित्त राम ध्यान मंदिरात अर्पित कथक नृत्यलयाचा कार्यक्रम |
निवृत्तीवेतनधारक/कुटुंबनिवृत्तीवेतन धारकांना आवाहन |
विविध मोबाईल अॅपच्या माध्यमातून मतदारांना सोई- सुविधा |