04:52pm | Feb 01, 2019 |
महाबळेश्वर : गेली अनेक वर्षे बंद असलेला सांडपाणी प्रकल्प तातडीने सुरू करण्याबाबत प्रदुषण नियंत्रण मंडळाने आदेश दिले असतानाही आजपर्यंत सांडपाणी प्रकल्प बंद अवस्थेत आहे. या प्रकल्पाची पाहणी महाराष्ट्र प्रदुषण नियंत्रण मंडळाचे उपप्रादेशिक अधिकारी बी. एम. कुकडे यांनी आज केली. दरम्यान पालिकेत कुकडे यांची भेट घेवुन नगरसेवक संजय पिसाळ यांनी या प्रकरणी पालिकेेच्या मुख्याधिकारी यांच्यावर कडक कारवाई करण्याची मागणी केली.
सांडपाण्यावर प्रक्रिया करणारे 4 दशलक्ष व 1 दशलक्ष क्षमतेचे दोन प्रकल्प पालिकेने उभारले आहेत. हे दोन्ही प्रकल्प बंद पडले होते. प्रदुषण नियंत्रण मंडळाने हे दोन्ही प्रकल्प सुरू करण्याबाबत वारंवार नोटीसा बजावल्या होत्या. परंतु पालिकेने या नोटीसांकडे दुर्लक्ष केले. पालिकेच्या हलगर्जीपणामुळे सांडपाणी प्रकल्प गेल्या अनेक महीन्यांपासुन बंद आहे. हे प्रकल्प बंद असल्याने सांडपाण्यावर प्रक्रिया न करताच ते थेट जंगलात सोडण्यात आल्याचे दिसत आहे. हा प्रकल्प बंद असल्याने या प्रकल्पा शेजारी असलेल्या दलित वसाहतीमध्ये प्रचंड दुर्गंधी सुटते. या दुर्गंधीमुळे या वसाहतीमध्ये नागरीकांना राहणे मुष्कील झाले आहे. या संदर्भात वाढत्या तक्रारी आल्याने नगरसेवक संजय पिसाळ यांनी पत्रकारांबरोबर हॉटेल व्हॅल्यु व्हयु शेजारी असलेल्या सांंडपाणी प्रकल्पाची पाहणी केली. तेव्हा हा प्रकल्प बंद असल्याचे दिसुन आले. तेथे पालिकेचा कोणताही कर्मचारी उपस्थित नव्हता. याच ठिकाणी सांडपाण्याची प्रचंड दुर्गंधी सुटली होती. सांडपाणी प्रकल्पाच्या शेवटी पाहणी केली असता या प्रकल्पाच्या टाक्या पुर्ण क्षमतेने भरल्या होत्या व त्या मैलासहीत वाहत होत्या. हा मैला थेट जंगलात सोडण्यात आले असल्याचे निदर्शनास आले. या प्रकल्पाची पाहणी करीत असतानाच तेथे प्रदुषण नियंत्रण मंडळाचे वाहन चालक माने तेथे आले व त्यांनी उघडयावर सोडण्यात आलेल्या सांडपाण्याची पाहणी केली व जंगलात सोडण्यात आलेल्या सांडपाण्याचे नमुने घेतले.
सांडपाणी प्रकल्पाची पाहणी केल्यानंतर नगरसेवक पालिकेत गेले. तेथे मुख्याधिकारी यांच्या दालनात महाराष्ट्र प्रदुषण नियंत्रण मंडळाचे उप प्रादेशिक अधिकारी बी. एम. कुकडे हे तेथे बसले होते. नगरसेवक यांनी कुकडे याना बंद असलेल्या सांडपाणी प्रकल्पाबाबत सविस्तर चर्चा केली. पिसाळ म्हणाले की, हा प्रकल्प गेली अनेक महीने बंद अवस्थेत आहे. त्यामुळे या प्रकल्पाची दुरावस्था झाली आहे. आपण हा प्रकल्प सुरू करण्याबाबत वारंवार नोटीसा पालिकेला बजावता परंतु पालिका दुर्लक्ष करते मागील दोन महीन्यांपुर्वी देखिल आपण नोटीस दिली होती. या नोटीसांमध्ये आपण पालिकेला एक महिन्यांची मुदत दिली होती. परंतु त्यास आता दोन महीने झाले तरी हा प्रकल्प सुरू करण्यात पालिकेला यश आले नाही तेव्हा आपण केवळ नोटीसा देणे बंद करून पालिकेच्या कारभारास मुख्याधिकारी यांना जबाबदार धरून त्यांचेवर कडक कारवाई करावी, अशी मागणी केली. हा प्रकल्प सुरू करण्याबाबत पालिकेने हालचाली सुरू केल्या आहेत. जी कामे करणे आवश्यक आहे त्या कामाच्या निवदा प्रसिध्द करण्यात आल्याची माहिती मुख्याधिकारी अमिता दगडे- पाटील यांनी नगरसेवक संजय पिसाळ यांना दिली. या माहितीने पिसाळ यांचे समाधान झाले नाही. त्यांनी पुन्हा पालिकेवर कडक कारवाई करण्याची मागणी कुकडे यांचेकडे केली.
पालिकेचा सांडपाणी प्रकल्प बंद आहे यामध्ये कोणाचेही दुमत नाही महाष्ट्र प्रदुषण नियंत्रण मंडळाने नोटीसा देवुनही पालिकेने हा प्रकल्प सुरू केला नाही आजही हा प्रकल्प बंद आहे या बाबत मी पुढील कारवाई साठी माझा अहवाल वरीष्ठांकडे पाठविणार असुन वरीष्ठांकडुन जे निर्देश येतील त्या प्रमाणे पालिकेवर कारवाई करण्यात येईल अशी माहीती महाष्ट्र प्रदुषण नियंत्रण मंडळाचे उप प्रादेशिक अधिकारी बी. एम. कुकडे यांनी वार्ताहरांशी बोलताना दिली.
गेल्या पाच वर्षांपासुन हा प्रकल्प बंद असल्याची कबुली मुख्याधिकारी अमिता दगडे पाटील यांनी दिली. असे असतानाही प्रदुषण नियंत्रण मंडळाने पालिकेवर कोणतीच कारवाई केली नाही. त्यामुळे पालिकेचे व प्रदुषण नियंत्रण मंडळाचे अधिकारी यांच्यात अर्थपुर्ण संगनमत असल्याची चर्चा शहरात सुरू असुन आता मंडळ पालिकेवर कोणती कारवाई करणार. याकडे नागरीकांचे लक्ष लागून राहिले आहे.
सराईत गुन्हेगाराने दिली तीन घरफोड्यांची कबुली |
उदयनराजे यांच्या समर्थनार्थ सातार्यात लोटला जनसागर |
शिक्षक हेच सुसंस्कृत समाजनिर्मितीचे जनक |
अजिंक्यतारा कारखान्यावर वादातून झाला गोळीबार |
जनता बँक साताराच्या तज्ज्ञ संचालकपदी सौरभ रायरीकर, राजेंद्र जाधव यांची निवड |
महिलेची गळफास घेवून आत्महत्या |
एकाच्या मृत्यूप्रकरणी कार चालकावर गुन्हा |
संशयित माल जवळ बाळगल्याप्रकरणी एकावर गुन्हा |
राहत्या घरातून युवती बेपत्ता |
वाई, जावळी परिसरात जोरदार अवकाळी पाऊस |
विरोधकांच्या रडीच्या डावाला जनता भुलणार नाही |
महायुतीचे आज सातार्यात जोरदार शक्ती प्रदर्शन |
सातारा जिल्ह्यात राम लल्लाच्या गजराने रामनवमी साजरी |
उदयनराजे यांच्या शक्तीप्रदर्शनासाठी आमदार शिवेंद्रसिंहराजे सज्ज |
सातारा जिल्ह्यात रामनवमी उत्साहात साजरी |
महिलेची गळफास घेवून आत्महत्या |
एकाच्या मृत्यूप्रकरणी कार चालकावर गुन्हा |
संशयित माल जवळ बाळगल्याप्रकरणी एकावर गुन्हा |
राहत्या घरातून युवती बेपत्ता |
वाई, जावळी परिसरात जोरदार अवकाळी पाऊस |
विरोधकांच्या रडीच्या डावाला जनता भुलणार नाही |
महायुतीचे आज सातार्यात जोरदार शक्ती प्रदर्शन |
सातारा जिल्ह्यात राम लल्लाच्या गजराने रामनवमी साजरी |
उदयनराजे यांच्या शक्तीप्रदर्शनासाठी आमदार शिवेंद्रसिंहराजे सज्ज |
सातारा जिल्ह्यात रामनवमी उत्साहात साजरी |
उष्माघातावरील उपचारासाठी सर्व शासकीय रुग्णालयांमध्ये कक्ष स्थापन |
आदर्श आचारसंहितेच्या काटेकोरपणे अंमलबजावणीस सर्वोच्च प्राधान्य : जिल्हाधिकारी डुडी |
श्रीराम नवमी निमित्त राम ध्यान मंदिरात अर्पित कथक नृत्यलयाचा कार्यक्रम |
निवृत्तीवेतनधारक/कुटुंबनिवृत्तीवेतन धारकांना आवाहन |
विविध मोबाईल अॅपच्या माध्यमातून मतदारांना सोई- सुविधा |