सातारा : शहरालगत बारावकरनगर येथे मंगळवारी भल्या पहाटे गॅस कटरच्या सहाय्याने एसबीआयचे एटीएम सेंटर फोडून तब्बल 19 लाख 83 हजार 500 रुपयांची रोकड दरोडेखोरांनी चोरुन नेली असल्याची धक्कादायक माहिती समोर आली आहे. चोरट्यांनी त्याच परिसरातील कोडोली येथीलही एटीएम सेंटर फोडण्याचा प्रयत्न केला मात्र त्यात त्यांना यश आले नाही. दरम्यान, शहरालगत दरोडेखोर सक्रीय झाल्याने परिसर भितीने हादरला आहे.
सागर सुरेश घाडगे (वय 30, रा.शाहूपुरी) यांनी याबाबतची सातारा शहर पोलिस ठाण्यात तक्रार दिली आहेे. ते इलेक्ट्रॉनिक पेमेंट अॅन्ड सर्व्हिसेस प्रा.लि. मुंबई या कंपनीमध्ये काम करत असून ही कंपनी एटीएम सेवा पुरवत आहेे. घाटगे हे सातारा जिल्ह्याचे मॅनजर आहेेत.
पोलिसांनी दिलेली माहिती अशी, मंगळवारी पहाटे सातारकर गाढ झोपेत असताना कोडोली येथील बारावकरनगरमध्ये गॅस कटरच्या सहाय्याने दरोडेखोर स्टेट बँक ऑफ इंडियाचे एटीएम मशीन फोडत होते. संशयितांनी घटनास्थळाचा व परिसराचा अंदाज घेतल्यानंतर टोळीतील काही जण बाहेर वॉच ठेवण्यासाठी तर उर्वरीत एटीएम मशीन फोडण्यासाठी कामाला लागले. मध्यरात्री दोन वाजण्याच्या सुमारास त्यांनी एटीएमचे मशीन फोडले. एटीएम मशीन फोडल्यानंतर चोरट्यांना पहिल्याच प्रयत्नात अक्षरश: घबाडच सापडले. 100, 500 व 2000 हजार रुपयांच्या अशा तब्बल 20 लाख रुपयांचा नोटा त्यांना सापडल्या. चोरट्यांनी सर्व पैसे चोरुन ते घटनास्थळ सोडले.
सुमारे 20 लाख रुपयांची रक्कम सापल्यानंतरही चोरट्यांनी आणखी एक एटीएम मशीन फोडण्यासाठी संभाजीनगर येथील परिसरात गेले. चोरट्यांनी गॅस कटरच्या माध्यमातून एटीएम मशीन फोडण्यासाठी हालचाली केल्या. यावेळी बाहेर वॉच ठेवण्यासाठी टोळीतील काहीजण थांबले होते. याठिकाणी परिसरातील नागरिक जागे झाले असल्याचे या टोळीच्या लक्षात आल्यानंतर ते अलर्ट झाले. एटीएम सेंटर फोडत असणार्यांना तेथून निघून जाण्याच्या सूचना दिल्यानंतर त्यांनी ते अर्धवट फोडलेले मशीन तेथेच टाकले व घटनास्थळावरुन पसार झाले.
संभाजीनगर परिसरातील एटीएम सेंटर परिसरात संशयास्पद हालचाली सुरु असल्याची माहिती स्थानिक नागरिकांच्या लक्षात आल्यानंतर त्यांनी कंट्रोल रुम व पोलिसांशी संपर्क साधला. सुमार अर्ध्या तासानंतर घटनास्थळी व पोलिस व स्थानिक काही नागरिक गेले असता तेथे एटीएम सेंटर फोडण्याचा प्रयत्न झाला असल्याचे समोर आले. घटनेचे गांभीर्य ओळखून याबाबत वरिष्ठ पोलिस अधिकार्यांना माहिती देण्यात आली. दरम्यान, बारावकरनगर येथील एटीएम फोडल्याचे समोर आल्यानंतर पोलिस कर्मचार्यांनी तिकडेही धाव घेतली. पहाटे याबाबत बँकेच्या अधिकार्यांना माहिती मिळाल्यानंतर त्यांनी घटनास्थळी धाव घेतली. पोलिसांनीही डॉग स्कॉड, ठसे तज्ञांना पाचारण करुन घटनास्थळाचा पंचनामा केला.
बँकेच्या अधिकार्यांनी एटीएममध्ये भरलेल्या रकमेबाबत बँकेतून सर्व डाटा काढल्यानंतर चोरी झालेली रक्कम पाहून त्यांना थंडीत घाम फुटला. बँक अधिकार्यांनी चोरीची रक्कम तब्बल 20 लाख रुपये असल्याचे पोलिसांना सांगितल्यानंतर पोलिसांनाही हुडहुडी भरली. पोलिस ठाण्यात तक्रार दिल्यानंतर तपासाची चक्रे गतीमान करण्यात आली आहेत. शहर पोलिस ठाण्याचे सपोनि बाजीराव ढेकळे या घटनेचा पुढील तपास करत आहेत.
सातारा शहरालगत गेल्या काही दिवसांपासून चोरट्यांचा उच्छाद सुरु आहेे. आता 20 लाख रुपयांची रोकडच चोरी झाल्याने सुरक्षेचे तीनतेरा वाजल्याचे स्पष्ट झाले आहे. घडलेली दोन्ही ठिकाणी ही वर्दळीच्या ठिकाणी आहेत. यामुळे मंगळवारी रात्री व पहाटे पोलिसांची गस्त सुरु होती की नव्हती? या परिसरात पेट्रोलिंग कोण करत होते? गस्तीवर असणारे पोलिस झोपले होते की जागे होते? चोरटे कुठून आले व कुठे गेले? दरोडेखोरांकडे गॅसकटरसह इतर कोणती शस्त्रे होती? असे अनेक सवाल उपस्थित झाले आहेत.
पंतप्रधान मोदी यांची सभा म्हणजे उदयनराजे यांच्या विजयाची नांदी |
वाट कशाची पाहता? कामाला लागा |
साताऱ्यात आरटीई प्रवेशासाठी पालकांचा कमी प्रतिसाद |
अफवांवर नाही, हवामान खात्यावर विश्वास ठेवा : हवामान खात्याचे प्रमुख सुनील कांबळे |
घोटाळेबाजांशी कायम लढत राहणार उदयनराजे गरजले |
साताऱ्यातील सुप्रसिद्ध डॉ. रविंद्र हर्षे यांचे दुःखद निधन |
भाजप देशाचे भविष्य तर काँग्रेस भूतकाळ उदयनराजे भोसले यांचा टोला |
कृष्णाबाई यात्रा महोत्सवाचा पालखी मिरवणुकीने शुभारंभ |
गंभीर गुन्हे करणार्या चौघांच्या टोळीला तडीपारीचा दणका |
बेकायदा दारु विक्रीप्रकरणी एकावर कारवाई |
आदेशाचे उल्लंघन केल्याप्रकरणी पाचजणांवर गुन्हा |
अपघातात जखमी केल्याप्रकरणी दुचाकी चालकावर गुन्हा |
वेगवेगळ्या घटनांमध्ये दोनजणी बेपत्ता |
सातारा शहरातील लल्लन टोळीवर मोक्का कारवाई |
कृष्णा खोरे महामंडळामुळे दुष्काळी भागात पाणी : उदयनराजे भोसले |
साताऱ्यातील सुप्रसिद्ध डॉ. रविंद्र हर्षे यांचे दुःखद निधन |
भाजप देशाचे भविष्य तर काँग्रेस भूतकाळ उदयनराजे भोसले यांचा टोला |
कृष्णाबाई यात्रा महोत्सवाचा पालखी मिरवणुकीने शुभारंभ |
गंभीर गुन्हे करणार्या चौघांच्या टोळीला तडीपारीचा दणका |
बेकायदा दारु विक्रीप्रकरणी एकावर कारवाई |
आदेशाचे उल्लंघन केल्याप्रकरणी पाचजणांवर गुन्हा |
अपघातात जखमी केल्याप्रकरणी दुचाकी चालकावर गुन्हा |
वेगवेगळ्या घटनांमध्ये दोनजणी बेपत्ता |
सातारा शहरातील लल्लन टोळीवर मोक्का कारवाई |
कृष्णा खोरे महामंडळामुळे दुष्काळी भागात पाणी : उदयनराजे भोसले |
लोकसभा निवडणुकीच्या मतदानाची वेळ वाढवून मिळावी |
सूर्योदयाच्या मुहूर्तावर हनुमान जन्मोत्सव साजरा |
सणबूरच्या यात्रेत कुस्तीच्या फडात आग्या मोहोळाचा हल्ला |
उदयनराजेंच्या पत्नी दमयंतीराजेंचा काँग्रेसवर गंभीर आरोप |
वाई, जावळी तालुक्यात अवकाळी पाऊस |