कराड : दीडशे वर्षांपासून संत घाडगेनाथ महाराज कोळे यांची पायी दिंडी-पालखी क्षेत्र पंढरपूर येथे जाते. या दिंडीतून ते वारकरी या दिंडीमधून विठ्ठलाच्या दर्शनासाठी जातात. दि. जून रोजी कोळे येथून प्रस्थान झालेल्या पालखीचे घारेवाडी, चचेगाव, मार्गे सोमवारी कराड शहरात आगमन झाले. यावेळी डुबलवाडा येथील महिला, भाविकांनी मोठ्या संख्येने उपस्थित राहत पालखीचे पुजन केले.
यावेळी पालखी बरोबर घोडे, विणेकरी, तुळशी वृंदावनधारी महिला, टाळकरी, चोपदार आदींसह मोठ्या संख्येने वारकरी उपस्थित होते. कराड शहराच्या वेशीवर दत्त मंदिर येथे सर्व डुबल इनामदार मंडळींकडून पालखीचे स्वागत करण्यात आले. ताल मृदूंगाच्या तालावर पुंडलिक हरी विठ्ठल, असा जयघोष करीत पालखी कराड शहरातून मुख्य मार्गातून दत्तमंदिर, गणपती मंदिर, नामदेव मंदिर मार्गे शुक्रवार पेठ येथील सरदार साळोखे-डुबल यांच्या ऐतिहासिक वाडा येथे आणण्यात आली. तेथे विठ्ठलाची आरती होऊन वाड्यामध्ये विठ्ठलाच्या मुर्तीची स्थापना करण्यात आली.
यावेळी बोलताना नानासाहेब डुबल इनामदार म्हणाले, हिंदू संस्कृती जपण्याचे कार्य डुबल इनामदार घराणे पिढ्यान पिढ्या करीत असून गेली वर्षे संत घाडगेनाथ महाराज पालखीच्या सेवेच्या रूपाने चालू ठेवले आहे. सरदार साळोखे-डुबल या शिवपूर्वकालीन घराण्याला वर्षाचा इतिहास असून गेली पिढ्या त्यांचे वास्तव्य कराड प्रांतामध्ये आहे. आजही कराड तालुक्यातील प्रत्येक गावात डुबलकी नावाच्या जमिनी आहेत. ’सरदार बाळोजी साळोखे-डुबल चॅरिटेबल ट्रस्ट’ च्या माध्यमातून समाजोपयोगी उपक्रम राबविले जात आहेत.
या पालखी दिंडीचा मान कराड व मिरज प्रांताचे सुभेदार श्रीमंत बाळोजी साळोखे डुबल यांचे वंशजाकडे पूर्वपार चालत आलेला आहे. या सरदार डुबल घराण्यातील चालुक्य,
आदिलशाही, मराठेशाही, पेशवाई या काळात स्वराज्यासाठी बलिदान केले आहे. त्याच्या समाधी व सती मंदिरे ठिकठिकाणी आहेत. त्याच बरोबर या सरदारांनी धर्मकार्य केली आहेत. कराडमधील हाटकेश्वर मंदिर, मारूती मंदिर, सटवाई मंदिर व म्हसवड येथील सिध्दनाथ मंदिर या मोठया मंदिराची उभारणी करून त्याचे देखभालीसाठी त्याचे सरंजाम व सरदारकीच्या जमीनी दान दिल्या आहेत. दिंडी चे स्वागत नानासाहेब राजेसाहेब डुबल यांचेकडून करण्यात आले.
शाहूपुरी पोलिस ठाण्याच्या हद्दीत आढळला अनोळखी पुरुषाचा मृतदेह |
सातारा शहरातून दोनजणी बेपत्ता |
डॉ आंबेडकर जयंती समारोह अध्यक्षपदी संजय गाडे यांची निवड |
शरद पवारांच्या डावपेचाकडे महाराष्ट्राचे लक्ष |
कराडला रविवारी इंडिया आघाडीचा मेळावा |
पश्चिम महाराष्ट्रात दि. २९ ते ३१ पर्यंत महावितरणचे वीजबिल भरणा केंद्र सुरू |
करंजे पेठतील थकबाकीदाराची पालिकेकडून मालमत्ता केली सील |
साताऱ्यात लोकसभेबाबत शुक्रवारी शरद पवारांची बैठक |
जमिनीच्या वादातून धारदार शस्त्राने एकाचा खून |
लोकसभा सार्वत्रिक निवडणूक-2024 |
कोल्हापूरला निघालेली खासगी ट्रॅव्हल्स झाली पलटी |
पुण्यातील पीएमटीच्या बसचालकाची सोनगाव येथे आत्महत्या |
झाड मारल्याप्रकरणी सातार्यात दोन गुन्हे दाखल |
अदानी ग्रुपचा वीज प्रकल्प रद्द करण्याठी प्रकल्पग्रस्त जिल्हाधिकारी कार्यालयावर काढणार मोर्चा |
प्रतापसिंह नगरात अतिक्रमणांसह लल्लन आणि युवराजच्या दहशतीवर जिल्हा प्रशासनाचा बुलडोझर |

पाच नॅशनल पुरस्कार मिळवून श्लोक घोरपडे कोल्हापूर येथील स्पर्धेत मारणार बाजी |
'आयडियल' मतदारसंघाचे 'आयडॉल' आमदार |
आचारसंहिता काळात लोकशाही दिनाचे आयोजन होणार नाही : नागेश पाटील |
पोक्सोंतर्गत एकावर गुन्हा |
कुऱ्हाडीने वार केल्या प्रकरणी एकावर गुन्हा |