08:31pm | Apr 17, 2019 |
सातारा : (अजित जगताप) : सतराव्या लोकसभा निवडणुकीच्या रणधुमाळीत सातारा येथे राष्ट्रवादी व कॉंग्रेस आघाडी आणि सेना-भाजप युती यांचा प्रचार शिंगेला पोहचला असून वंचित आघाडी प्रचारापासून दूर असली तरी तिरंगी लढत होणार आहे. बाकी उमेदवार किती मताचा पल्ला गाठतात? हे मतदान मोजणी दिवशी समजणार आहे. तत्पूर्वी निवडणुकी खर्चाचा तपशिल देताना खर्चाचा पल्ला पार करता येणार नाही. त्यामुळे सातार्यात हॉटेल मधील चार भिंतीच्या आड खुला तर गांधी मैदानावरील विराट सभेच्या मुक्तपीठावर छुपा पाठिंबा देण्याचे तंत्र मनसे अध्यक्ष राजसाहेब ठाकरे यांनी सातार्यात आत्मसात करणार आहेत. त्यामुळे या सभेचा खर्च कोणत्या उमेदवाराच्या खर्चात नोंद करावी? असा प्रश्न उपस्थित होण्याची दाट शक्यता निर्माण झालेली आहे. या सभेला मनसे व्यतिरिक्त कोणत्याही राजकीय पक्षाचे नेते या मुक्तपीठावर दिसणार नाही, याची काळजी घेण्यात येणार आहे.
देशात तीन टप्प्यांमध्ये लोकसभेच्या निवडणुका होत आहेत. सध्या तिसर्या टप्प्यातील निवडणुक एक आठवडा कालावधीपर्यंत आलेली आहे. देशाच्या पंतप्रधानांपासून ते ग्रुप ग्रामपंचायतीच्या सदस्यांपर्यंत अनेकांनी प्रचारात सहभागी होऊन आरोप-प्रत्यारोपाच्या ङ्गायरी झाडल्या आहेत. प्रमुख राजकीय पक्ष वगळता अनेक अपक्ष असले तरी त्यांची ङ्गारशी दखल मतदार घेत नाहीत. त्यामुळे खरी लढत ही राजकीय पक्षामध्ये असते. आश्चर्याची गोष्ट म्हणजे सातारा लोकसभा मतदार संघात पक्षाचा कोणताही उमेदवार उभा नसतानाही मनसेचे अध्यक्ष राज ठाकरे यांची विराट सभा गांधी मैदान सातारा याठिकाणी आज दि. १७ एप्रिल रोजी सायंकाळी ६:३० वाजता होत आहे. याची नोंद राजकीय ईतिहासात ठळक अक्षरात होणार आहे. विशेष म्हणजे या सभेला कोणत्या पक्षाला, कोणत्या उमेदवाराला जाहिर पाठिंबा देणार याचा कुठेही उल्लेख होणार नाही. याची काळजी घेतली जाणार असली तरी, ‘समजने वाले को, काङ्गी इशारा’ या धरतीवर सातारकरांना समजला आहे. आज दुपारी मनसे अध्यक्ष राज ठाकरे हे सातारा शहरातील हॉटेल महाराजा या ठिकाणी आले. त्यावेळी सातारकरांच्या वतीने मनसे अध्यक्ष धैर्यशील पाटील, राजू शेळके, युवराज पवार, विक्रम पवार व मान्यवर मनसे सैनिकांनी त्यांचे जोरदार स्वागत केले. विशेष म्हणजे याच हॉटेलमध्ये राष्ट्रवादीचे उमेदवार श्री. छ. उदयनराजे भोसले यांची दोनच दिवसापूर्वी पत्रकार परिषद झाली होती. त्यावेळी मोठ्या संख्येने श्री. छ. भोसले व त्यांचे समर्थक उपस्थित होते. आज मात्र या परिसरात कोणीही राष्ट्रवादीचे कार्यकर्ते किंवा श्री. छ. भोसले यांचे समर्थक दिसून येत नव्हते. कालच भाजपचे नेते व शिक्षणमंत्री विनोद तावडे यांनी राज ठाकरे यांच्या नांदेडच्या सभेबाबत निवडणूक आयोगाकडे या सभेचा खर्च कॉंग्रेस उमेदवारीच्या खर्चात धरावा, अशी मागणी केली होती. पण सातार्यात कोणत्याही उमेदवाराला जाहिर पाठिंबा न देता स्वबळावर? मनसेने विराट सभेचे आयोजन केले आहे. या सभेपूर्वी हॉटेल मधील रूममध्ये राज ठाकरे यांनी सातारा जिल्ह्यातील मनसे सैनिकांशी संवाद साधला. सातारा जिल्ह्यातील राजकीय परिस्थिती आणि इतर बाबीं बाबत चर्चा केली असल्याची माहिती समजली आहे. मात्र त्याचा तपशिल कळू शकलेला नाही. चार भिंतीच्या आड खुला तर विराट सभेत छुपा पाठिंबा अशीच चर्चा राजकीय वर्तुळात सुरू झालेली आहे.
एकेकाळी गुजरात मध्ये जावून तात्कालीन मुख्यमंत्री नरेंद्र मोदी यांच्यावर कौतुकाचा वर्षाव करणारे मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांची काही वर्षानंतर पूर्ण भ्रमनिरास झाली आहे. हुकुमशाह पद्धतीने केंद्र सरकार वागत आहे. देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी व भाजप अध्यक्ष अमित शहा यांना विरोध म्हणून राज ठाकरे हे महाराष्ट्रातील प्रमुख शहरात विराट सभा घेत असून त्याला उदंड प्रतिसाद लाभत आहेत. सातारा जिल्ह्यात मोदी-शहा जोड गोळीच्या विरोधातील उमेदवाराला मतदान करा. असा संदेश देण्यासाठी राज ठाकरे यांची विराट सभा होत आहे. या सभेची पूर्ण तयारी झाली असून या सभेबाबत राजठाकरे यांनी कार्यकर्त्यांशी संपर्क साधून माहिती घेतली असल्याची समजते. राज ठाकरे यांच्या सभेकडे संपूर्ण सातारकरांचे लक्ष लागले असून विरोधकांचा पर्दाङ्गाश करताना कुठेही आचार संहिता भंग होऊ नये, याची काळजी घेतली जाणार आहे. विशेष म्हणजे या सभेत कोणताही पक्ष किंवा उमेदवार यांचा उल्लेख होणार नाही, याची काळजी घेतली जाणार आहे. दोन दिवसापूर्वी भाजपने मुख्य निवडणुक आयोगाकडे मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांच्या भाषणाबाबत तक्रार केलेली आहे. त्या भाषणाची काळजीपूर्वक पडताळणी करून ते भाषण कोणत्या पक्षासाठी अनुकूल आहे. याची पाहणी करणार आहेत. त्यानंतर त्यांनी उमेदवाराचा उल्लेख केला असेल तर त्याच्या खर्चामध्ये या सभेचा होणार खर्च टाकण्यात येईल, असे स्पष्ट केले आहे.
सातार्यातील सभेत मनसे अध्यक्ष राज ठाकरे हे सभेला संबोधित करताना कोणत्याही राजकीय पक्षाचा किंवा उमेदवाराचा उल्लेख करणार नाहीत. परंतु नरेंद्र मोदी व अमित शहा यांच्या विरोधात आक्रमक रित्या शेरेबाजी करणार असल्याची चर्चा आता पासूनच रंगू लागली आहे. ठाकरे घराण्यातील नेत्यांनी यापूर्वी कॉंग्रेस राष्ट्रवादी विरोधात तोङ्ग डागली होती. परंतू मनसे अध्यक्ष राज ठाकरे हे पहिले ठाकरे घराण्यातील नेते आहेत. की, जे कोणत्याही पक्षाच्या उमेदवाराला मत द्या, हे सांगण्यासाठी सातार्यात आले नसून भाजपच्या मोदी-शहा पक्षाला मत देवू नका, हे ठणकावून सागण्यासाठी आले आहेत. त्यामुळे भाजप सेनेच्या गोठ्यात चिंतेचे वातावरण पसरले आहे.
उदयनराजे यांना मतदान करून गादीचा सन्मान ठेवा |
जपानचे स्लिम लँडर तिसऱ्यांदा जागृत |
कोल्हापुरातील अंबाबाईच्या रथोत्सव |
छत्रपतींच्या वंशजांना जावळीचा स्वाभिमान सांगू नका |
माझ्याकडे विरोधकांच्या अनेक भानगडी |
महाभकास आघाडीला निवडणुकीत जागा दाखवा |
साताऱ्यात मेघगर्जनेसह बरसल्या पावसाच्या सरी |
जनता बँकेत पुर्नगठीत बोर्ड ऑफ मॅनेजमेंटच्या चेअरमनपदी विनोद कुलकर्णी |
बोंडारवाडीसह धरणांची कामे मार्गी लावणार उदयनराजेंचे आश्वासन |
दलित महासंघ,पॅंथरचा उदयनराजेंना जाहीर पाठींबा |
सातारकरांना बाहेरच्यांनी स्वाभिमान शिकवू नये |
साताऱ्यात कोट्यावधीची कामे हीच आपली जमेची बाजू |
जुगार प्रकरणी एकावर कारवाई |
नोकरीच्या अमिषाने सुमारे पावणे सहा लाखांची फसवणूक |
शहरातील दोन वेगवेगळ्या घटनांमध्ये दोनजण बेपत्ता |
महाभकास आघाडीला निवडणुकीत जागा दाखवा |
साताऱ्यात मेघगर्जनेसह बरसल्या पावसाच्या सरी |
जनता बँकेत पुर्नगठीत बोर्ड ऑफ मॅनेजमेंटच्या चेअरमनपदी विनोद कुलकर्णी |
बोंडारवाडीसह धरणांची कामे मार्गी लावणार उदयनराजेंचे आश्वासन |
दलित महासंघ,पॅंथरचा उदयनराजेंना जाहीर पाठींबा |
सातारकरांना बाहेरच्यांनी स्वाभिमान शिकवू नये |
साताऱ्यात कोट्यावधीची कामे हीच आपली जमेची बाजू |
जुगार प्रकरणी एकावर कारवाई |
नोकरीच्या अमिषाने सुमारे पावणे सहा लाखांची फसवणूक |
शहरातील दोन वेगवेगळ्या घटनांमध्ये दोनजण बेपत्ता |
विवाहितेला आत्महत्येस प्रवृत्त केल्याप्रकरणी पती विरुध्द गुन्हा |
शाहूनगर येथे घरफोडी |
पंतप्रधान मोदी यांची सभा म्हणजे उदयनराजे यांच्या विजयाची नांदी |
वाट कशाची पाहता? कामाला लागा |
साताऱ्यात आरटीई प्रवेशासाठी पालकांचा कमी प्रतिसाद |