सातारा : रयत शिक्षण संस्थेला शंभरी पूर्ण होत असल्यामुळे चालू वर्ष शताब्दी वर्ष म्हणून साजरे केले आहे. त्यानिमित्ताने संजय भैरवनाथ काळे विद्यालयामध्ये भरगच्च, वैविध्यपूर्ण कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले. 5 तरखरपासून 11 तारखेपर्यंत हा सप्ताह साजरा करण्यात आला. 5 तरखेला भव्य चित्ररथ व मिरवणूक काढण्यात आली. शताब्दी फलकाचे अनावरण मान्यवरांच्या हस्ते करण्यात आले. पालकांसाठी कर्मवीर अण्णांच्या जीवनावरील दाखवण्यात आली माजी विद्यार्थी मेळावा, वक्तृत्व स्पर्धा, निबंध स्पर्धा, क्रीडा स्पर्धा, विज्ञान खेळणी प्रदर्शन, विविध विषयांवर वैचारिक व्याख्यानमाला, सांस्कृतिक कार्यक्रम, ग्रंथ प्रदर्शन, हस्तलिखित प्रकाशन, रांगोळी प्रदर्शन इत्यादी विविध कार्यक्रमांचे शाखा पातळीवर आयोजन करण्यात आले. या सर्वांमध्ये विद्यार्थ्यांनी अतिशय उत्साहाने कृतिशील सहभाग घेतला.
या कार्यक्रमाची सांगता सभेच्या कार्यक्रमाने झाली. 11 ऑक्टोम्बर रोजी विद्यालयाच्या प्रांगणात कर्मवीर अण्णांची 131 वी जयंती व शताब्दी महोत्सवानिमित्त सभेच्या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले. या कार्यक्रमासाठी सातारा तालुका पंचायत समितीचे गटशिक्षणाधिकारी मा.श्री. संजय श्रीरंग धुमाळ हे होते. माजी विद्यार्थी म्हणून त्यांना रयत शिक्षण संस्थेबद्दल आपुलकी आहे. शैक्षणिक दर्जा व गुणवत्ता यामध्ये रयत शिक्षण संस्था नेहमीच अग्रेसर राहिलेली आहे असे त्यांनी सांगितले. तसेच कर्मवीर अण्णांच्या जीवावर त्यांनी प्रकाशझोत टाकला. माजी मुख्याध्यापक मा. श्री. मोहिते जी. डी. हे अध्यक्ष म्हणून लाभले त्यांनी कर्मवीरांच्या बद्दल आपले विचार थोडक्यात व्यक्त केले. यावेळी स्कुल कमिटीचे सदस्य, संस्थाप्रेमी ग्रामस्थ, पालक उपस्थित होते. कार्यक्रमाचे प्रास्ताविक व पाहुण्यांचे स्वागत प्राचार्य श्री. कुचेकर एम. जे. यांनी केले. विविध स्पर्धेत यश मिळवलेल्या विद्यार्थ्यांना बक्षीस वितरण पाहुण्यांच्या हस्ते करण्यात आले. विद्यार्थी व शिक्षक मनोगत झाले. आदर्श विद्यार्थी पुरस्कार कु. करूणा ताटे हिला मिळाला.
विद्यालयाचे पर्यवेक्षक मा. श्री. महामुलकर यांनी उपस्थित सर्वांचे तसेच कार्यक्रमासाठी योगदान देणाऱ्या सर्वांचे विद्यालयाच्या वतीने आभार मानले. राष्ट्रगीताने सभेची सांगता झाली. या कार्यक्रमाचे सूत्रसंचलन श्रीम. नष्टे व श्रीम. गवळी मॅडम यांनी केले.
शाहूपुरी पोलिस ठाण्याच्या हद्दीत आढळला अनोळखी पुरुषाचा मृतदेह |
सातारा शहरातून दोनजणी बेपत्ता |
डॉ आंबेडकर जयंती समारोह अध्यक्षपदी संजय गाडे यांची निवड |
शरद पवारांच्या डावपेचाकडे महाराष्ट्राचे लक्ष |
कराडला रविवारी इंडिया आघाडीचा मेळावा |
पश्चिम महाराष्ट्रात दि. २९ ते ३१ पर्यंत महावितरणचे वीजबिल भरणा केंद्र सुरू |
करंजे पेठतील थकबाकीदाराची पालिकेकडून मालमत्ता केली सील |
साताऱ्यात लोकसभेबाबत शुक्रवारी शरद पवारांची बैठक |
जमिनीच्या वादातून धारदार शस्त्राने एकाचा खून |
लोकसभा सार्वत्रिक निवडणूक-2024 |
कोल्हापूरला निघालेली खासगी ट्रॅव्हल्स झाली पलटी |
पुण्यातील पीएमटीच्या बसचालकाची सोनगाव येथे आत्महत्या |
झाड मारल्याप्रकरणी सातार्यात दोन गुन्हे दाखल |
अदानी ग्रुपचा वीज प्रकल्प रद्द करण्याठी प्रकल्पग्रस्त जिल्हाधिकारी कार्यालयावर काढणार मोर्चा |
प्रतापसिंह नगरात अतिक्रमणांसह लल्लन आणि युवराजच्या दहशतीवर जिल्हा प्रशासनाचा बुलडोझर |

पाच नॅशनल पुरस्कार मिळवून श्लोक घोरपडे कोल्हापूर येथील स्पर्धेत मारणार बाजी |
'आयडियल' मतदारसंघाचे 'आयडॉल' आमदार |
आचारसंहिता काळात लोकशाही दिनाचे आयोजन होणार नाही : नागेश पाटील |
पोक्सोंतर्गत एकावर गुन्हा |
कुऱ्हाडीने वार केल्या प्रकरणी एकावर गुन्हा |