02:37am | Sep 29, 2019 |
कराड : जनकल्याण नागरी सहकारी पतसंस्थेने सामान्य ठेवीदारंाना सभासद करून भागधारक मतदार बनवून त्यांना सातत्याने 15 टक्के लाभांश देण्याचे काम केले आहे. संस्थेच्या इतिहासातील रौप्य महोत्सवापर्यंत आणखी यशस्वी वाटचाल करावी, असे गौरवोद्गार काढताना सहकार हा राजकारणाचा अड्डा बनला असून व्यक्तिगत स्वार्थीमुळेच सहकार चळवळ उदध्वस्त होत असल्याचे स्पष्ट मत राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे अखिल भारतीय संपर्कप्रमुख व पुणे येथील शैक्षणिक विकास केंद्राचे अध्यक्ष प्रा. अनिरूध्द देशपांडे यांनी व्यक्त केले.
येथील यशवंतराव चव्हाण स्मृतीसदनात कराड येथील जनकल्याण नागरी सहकारी पतसंस्थेच्या रौप्य महोत्सवी वर्षांच्या शुभारंभप्रसंगी प्रमुख पाहुणे म्हणून ते बोलत होते. यावेळी माजी राज्यपाल श्रीनिवास पाटील, पंढरपूर येथील विठ्ठल रूक्मिणी मंदिर समितीचे अध्यक्ष डॉ. अतुल भोसले, भाजपाचे जिल्हाध्यक्ष विक्रम पावसकर, संस्थेचे अध्यक्ष चंद्रशेखर देशपांडे, उपाध्यक्ष डॉ. मिलिंद पेंढारकर, मुख्य कार्यकारी अधिकारी अनंत जोशी, सीए शिरीष गोडबोले, डॉ. प्रकाश सप्रे, डॉ. अविनाश गरगटे, जगदीश सुभेदार यांच्यासह संचालक, सभासद, ठेवीदारांची उपस्थित होती.
प्रा. देशपांडे म्हणाले, जागतिक लोकसंख्येच्या केवळ 9 टक्के लोक संपूर्ण जगाच्या संपत्तीचे मालक आहेत. त्यामुळे जगातील आर्थिक विषमता प्रकर्षाने जाणवत असून ती संपुष्टात आणण्यासाठी प्रयत्नांची गरज आहे. गेल्या पाच वर्षात देशातील उत्पादन मोठया प्रमाणात वाढल्यामुळे विक्रीचे मोठे संंकट उत्पादकांसमोर उभे ठाकले आहे. त्यामुळे आपले उत्पादन जगाच्या बाजारपेठेत खपवण्यासाठी जाहितरातींचा मारा केला जात आहे. त्यामुळे मॉल संस्कृती फोफावली आहे. मॉलमध्ये गर्दीचा फुगवटा वाढताना मॉलबाहेर उभे राहून पैसे मागणार्यांची संख्या वाढली आहे. हे चित्र बदलण्याची गरज निर्माण झाली आहे. बचत ही एक सांस्कृतिक चळवळ आहे. सहकारच्या आधारावर चालणारी व्यवस्था हीच खरी अर्थव्यवस्था आहे. यालाच आदर्श मानून जनकल्याण पतसंस्थेची वाटचाल सुरू असल्याचे गौरवोद्गार त्यांनी काढले.
प्रास्ताविकात अनंत जोशी यांनी संस्थेची पारदर्शकता, संचालक मंडळाची विश्वासर्हता व व्यावसायिक नीतिमत्ता ही संस्थेच्या यशातील त्रिसूत्री राहिली आहे. तसेच संस्थेने अर्थसहाय्य करून सामाजिक बांधिलकीही जतन केली आहे. 24 वर्षाचा कार्यकाळ पूर्ण करून रौप्य महोत्सवी वर्षात पदार्पण करताना सुमारे 750 कोटींचा एकत्रित व्यवसायाचा टप्पा पूर्ण केला आहे. गेल्या 24 वर्षात संस्थेने स्थैर्य, सुरक्षा, समृध्दी व संस्कृती या चतुःसूत्रीने संरक्षित व स्वयंपूर्ण अशी एक आदर्श आर्थिक संस्था अशी लोकमनात ओळख निर्माण केल्याचे सांगितले. यावेळी मान्यवरांच्या हस्ते संस्थेच्या नूतन बोधचिन्हांचे प्रकाशन करण्यात आले. यावेळी संस्थेचे अध्यक्ष चंद्रशेखर देशपांडे, माजी अध्यक्ष सीए शिरीष गोडबोले, डॉ.प्रकाश सप्रे, डॉ. अविनाश गरगटे यांनी संस्थेच्या वाटचालीचा आढावा घेतला. उपाध्यक्ष डॉ. मिलिंद पेंढारकर यांनी आभार मानले. यावेळी संचालक, पदाधिकारी, कर्मचारी, सभासद, ठेवीदार, कर्जदार, नागरिक उपस्थित होते.
शाहूपुरी पोलिस ठाण्याच्या हद्दीत आढळला अनोळखी पुरुषाचा मृतदेह |
सातारा शहरातून दोनजणी बेपत्ता |
डॉ आंबेडकर जयंती समारोह अध्यक्षपदी संजय गाडे यांची निवड |
शरद पवारांच्या डावपेचाकडे महाराष्ट्राचे लक्ष |
कराडला रविवारी इंडिया आघाडीचा मेळावा |
पश्चिम महाराष्ट्रात दि. २९ ते ३१ पर्यंत महावितरणचे वीजबिल भरणा केंद्र सुरू |
करंजे पेठतील थकबाकीदाराची पालिकेकडून मालमत्ता केली सील |
साताऱ्यात लोकसभेबाबत शुक्रवारी शरद पवारांची बैठक |
जमिनीच्या वादातून धारदार शस्त्राने एकाचा खून |
लोकसभा सार्वत्रिक निवडणूक-2024 |
कोल्हापूरला निघालेली खासगी ट्रॅव्हल्स झाली पलटी |
पुण्यातील पीएमटीच्या बसचालकाची सोनगाव येथे आत्महत्या |
झाड मारल्याप्रकरणी सातार्यात दोन गुन्हे दाखल |
अदानी ग्रुपचा वीज प्रकल्प रद्द करण्याठी प्रकल्पग्रस्त जिल्हाधिकारी कार्यालयावर काढणार मोर्चा |
प्रतापसिंह नगरात अतिक्रमणांसह लल्लन आणि युवराजच्या दहशतीवर जिल्हा प्रशासनाचा बुलडोझर |
पश्चिम महाराष्ट्रात दि. २९ ते ३१ पर्यंत महावितरणचे वीजबिल भरणा केंद्र सुरू |
करंजे पेठतील थकबाकीदाराची पालिकेकडून मालमत्ता केली सील |
साताऱ्यात लोकसभेबाबत शुक्रवारी शरद पवारांची बैठक |
जमिनीच्या वादातून धारदार शस्त्राने एकाचा खून |
लोकसभा सार्वत्रिक निवडणूक-2024 |
कोल्हापूरला निघालेली खासगी ट्रॅव्हल्स झाली पलटी |
पुण्यातील पीएमटीच्या बसचालकाची सोनगाव येथे आत्महत्या |
झाड मारल्याप्रकरणी सातार्यात दोन गुन्हे दाखल |
अदानी ग्रुपचा वीज प्रकल्प रद्द करण्याठी प्रकल्पग्रस्त जिल्हाधिकारी कार्यालयावर काढणार मोर्चा |
प्रतापसिंह नगरात अतिक्रमणांसह लल्लन आणि युवराजच्या दहशतीवर जिल्हा प्रशासनाचा बुलडोझर |
पाच नॅशनल पुरस्कार मिळवून श्लोक घोरपडे कोल्हापूर येथील स्पर्धेत मारणार बाजी |
'आयडियल' मतदारसंघाचे 'आयडॉल' आमदार |
आचारसंहिता काळात लोकशाही दिनाचे आयोजन होणार नाही : नागेश पाटील |
पोक्सोंतर्गत एकावर गुन्हा |
कुऱ्हाडीने वार केल्या प्रकरणी एकावर गुन्हा |