04:07pm | Jan 01, 2020 |
कराड (प्रल्हाद गुजले) : तीन महिन्यांपासून दक्षिण भागातील बहुतांश कार्यालयांचे ऑनलाईन कामकाज पॉज मशिनला रेंज नसल्यामुळे विस्कळीत झाले आहे. पोस्टाचे सर्व व्यवहार पोस्टाबाहेर डोंगरात व शेतात नेटवर्क ज्या ठिकाणी मिळेल त्या ठिकाणीहून काम करण्याची वेळ पोस्टमास्तरवर आली आहे.
कराड दक्षिणच्या डोंगरी भागात दहा ते पंधरा व काले विभागात तेवडीच कार्यालये आहेत. पोस्ट कार्यालयांचे कामकाज ऑनलाईन पध्दतीने सुरु आहे. परंतु या ऑनलाईन कामकाजासाठी पोस्ट कार्यालयाला ज्या कंपन्यांचे नेटवर्क जोडले आहे ते सुस्थितीत चालत नाही. बहुतेकवेळा नेटवर्क नसल्याने कामकाज विस्कळीत होत आहे.
कराड तालुक्यातील व डोंगरी विभागातील बहुतांशी पोस्ट कार्यालयात तीन महिन्यांपासून पोस्टाचे कोणतेही व्यवहार ऑनलाईन होत नाहीत. ऑनलाईन व्यवहार करायचा झाल्यास अगोदर पोस्टमास्तर जवळ आरडी, पीएलआय किंवा कोणत्याही व्यवहाराचे पैसे आगाऊ जमा करावे लागतात. पोस्ट मास्तराने टेकडीवर जिथे रेंज आहे तेथे जाऊन तो ऑनलाईन व्यवहार पूर्ण करावा लागतो. त्यासाठी संबंधित पोस्ट मास्तराने काळ वेळ याचा विचार न करता डोंगरकपारीत शेतात किंवा अडचणीच्या ठिकाणी जिथे रेंज असेल तेथे जाऊन पोस्टाची कामे करायची असा प्रकार सुरु आहे. असे कामकाज तीन महिन्यांपासून सुरु आहे.
याबाबत पोस्ट कार्यालयातील वरिष्ठांकडे तक्रार करुनही वरिष्ठ याबाबत कोणतीही दखल घेत नाहीत. ग्राहकांनी पोस्टमास्तरच्या विश्वासावर हजारो रुपयांची रक्कम कशी द्यायची आणि संबंधित पोस्टमास्तर जर दुसर्या दिवशी नाकबूल आला तर जाब विचारायचा कोणाला या विवंचनेत काही ग्राहक आहेत. पोस्टखाते तीन-तीन महिने ऑनलाईन व्यवहार बंद असताना ऑफलाईन व्यवहार का करत नाही असा प्रश्न ग्राहकांना पडला आहे. ऑफलाईन कामकाज करु दे काय, असे वरिष्ठांना काही पोस्ट कर्मचार्यांनी विचारले असता त्याला वरिष्ठ अधिकारी नकार देतात. तीन महिन्यांपासून उंडाळे विभागात बहुतांश ठिकाणी पोस्ट कार्यालयाचा कारभार पोस्टाबाहेरुन केला जात आहे. ऑनलाईन व्यवहार सुरु करणे किंवा जिथे नेटवर्क आहे तिथे पूर्ण करावेत अशी मागणी ग्राहकांनी केली आहे.
सातारा पोलीस मुख्यालयात उपनिरीक्षकाला धमकी |
बिग बॉस फेम अभिजीत बिचुकले यांचा अर्ज दाखल |
महाविकास आघाडीच्या उमेदवाराचा पूर्ण ताकतीने प्रचार करणार |
माढयात अभय जगताप यांचे बंड शमले |
सातारा लोकसभा प्रबंधन समितीचे कार्य उत्कृष्ठ |
उदयनराजे भोसले यांची संपत्ती 251 कोटीची |
वादळी वाऱ्यात स्पीड बोट उलटून एकाचा मृत्यू |
निवडणूक स्थिर सर्वेक्षण पथकातील कर्मचाऱ्याला पोलिसाकडून मारहाण |
येणके येथील कुंभार वस्तीतील जल जीवन मिशनअंतर्गतचे काम प्रगतीपथावर |
निवडणुक निरिक्षक आर. अर्जुन व पोलिस निवडणुक निरिक्षक प्रदीप शर्मा यांचे जिल्ह्यात आगमन |
उदयनराजेंना विक्रमी मताधिक्याने निवडून आणण्यासाठी सर्वतोपरी प्रयत्न करणार |
श्री क्षेत्र निनाम येथील सासनकाठीला यात्रेत महत्वाचे स्थान |
मंदार कोल्हटकर, धिरज पाटील यांचे अपघाती निधन |
ट्रकच्या धडकेत दुचाकीस्वाराचा मृत्यू |
राजवाडा परिसरातून सव्वा लाखांच्या सोन्याच्या चैनची चोरी |

मारहाण प्रकरणी चौघांवर गुन्हा |
ट्रक चालकाला लुटल्याप्रकरणी तीन अज्ञातांवर गुन्हा |
महिलेचा विनयभंग केल्याप्रकरणी एकावर गुन्हा |
सराईत गुन्हेगाराने दिली तीन घरफोड्यांची कबुली |
उदयनराजे यांच्या समर्थनार्थ सातार्यात लोटला जनसागर |