गेल्या काही वर्षांत भारतात थायरॉईडच्या समस्येचे प्रमाण वाढले आहे. एका अंदाजानुसार, देशातील 30 टक्के लोक थायरॉईडच्या समस्येने ग्रस्त आहेत; पण थायरॉईडच्या समस्येचा सर्वाधिक त्रास होतो तो स्त्रियांना. त्याचे दुष्परिणामही जाणवतात. अनेकींचे वजन जास्त वाढते आणि संप्रेरकांमध्ये बदल होतो. त्याशिवाय बदलत्या जीवनशैलीमुळे तणावग्रस्त असल्याने थायरॉईडचा त्रास सुरू होतो.
थायरॉईड हा सायलेंट किलर म्हणूनही ओळखला जातो. अशावेळी थायरॉईडच्या रुग्णांनी आपल्या आहाराकडे विशेष लक्ष दिले पाहिजे. दैनंदिनीत बदल आणि पौष्टिक आहार याच्या मदतीने आपण स्वतःच थायरॉईडच्या समस्येतून बाहेर पडू शकतो. रोजचा व्यायाम आणि आहारातील बदल केल्यास थायरॉईडपासून मुक्ती मिळू शकते. जीवनशैलीतील बदल थायरॉईडचा त्रास कमी करू शकतो कसे ते जाणून घेऊया... त्यासाठी आधी थायरॉईडचा विकार म्हणजे काय ते समजावून घेऊया.
थायरॉईडचा त्रास म्हणजे काय?
थायरॉईड ही शरीरातील एक आवश्यक ग्रंथी आहे. गळ्याच्या खालच्या बाजूला ही ग्रंथी असते. थायरॉईडला सायलंट किलर म्हटले जाते. कारण, त्याची लक्षणे एकत्र दिसून येत नाहीत. वेळीच त्यावर इलाज न केल्यास रुग्णाच्या आरोग्याला धोका पोहोचू शकतो. थायरॉईड ही ग्रंथी अत्यंत लहान असते. मात्र, तिच्यातील बिघाडाचे आरोग्यावर मोठे परिणाम होताना दिसतात. थायरॉईड ही एक इंडोक्राईन ग्रंथी आहे. तिच्यामुळे काही हार्मोनल स्राव शरीरात स्रवतात. थायरॉईड ग्रंथीने आपले काम करणे बंद केल्यास शरीरात अनेक प्रकारच्या समस्या निर्माण होतात. शरीरातील हार्मोन्सच्या स्रावावर प्रभाव पडतो; पण थायरॉईड ग्रंथी कमी-अधिक प्रमाणात सक्रिय झाली तर शरीरावर त्याचा प्रभाव पडतो.
थायरॉईडचे प्रकार
शरीरात थायरॉईडचे दोन प्रकारचे त्रास उद्भवू शकतात. त्या दोन्हींची लक्षणे आणि त्यामुळे होणार्या समस्याही वेगवेगळ्या आहेत.
हायपोथायरॉडिझम
यामध्ये थायरॉईड ग्रंथी हार्मोन्सच्या पातळीत घट करते, त्यामुळे व्यक्तीला कोणताही आजार होत नसला, तरीही चयापचयाचा वेग कमी होतो. त्यावर उपचार करण्यासाठी रुग्णाला थायरॉईड हार्मोन्स दिले जाते. एखाद्या व्यक्तीला हायपोथायरॉईडिझम आहे किंवा नाही हे माहीत करून घेण्यासाठी टी3 आणि टी4 यांची कमतरता आहे का किंवा टीएसएचमध्ये वाढ झाली आहे काय, याची तपासणी करता येते.
लक्षणे
बद्धकोष्ठता, चेहर्यावर सूज, चेहरा कोमेजणे, अचानक वजन वाढणे, नैराश्य आणि चिडचिड होणे, त्यामुळे व्यक्ती विचित्र होते. शरीर थंड होते, तसेच मासिकपाळीचे चक्रही अनियमित होते.
हायपर थायरॉईडिझम
यामध्ये थायरॉईड ग्रंथी हार्मोन्सच्या पातळीत वृद्धी करतात. त्यामुळे व्यक्तीला ग्रेव्स रोग होण्याची शक्यता असते. शिवाय, चयापचयाचा वेगही वाढतो. हायपर थायरॉईडिझममध्ये व्यक्तीच्या शरीरातील टी3 आणि टी4 मध्ये वाढ होते, तर टीएसएचचे प्रमाण कमी होते.
लक्षणे
यामध्ये विशेष कोणतेही लक्षण दिसून येत नाही किंवा अनेक लक्षणे एकाचवेळी दिसून येतात. जसे अशक्तपणा, घाम येणे, केस गळणे, शरीराची थरथर, वजन कमी होणे, हृदयाची गती वाढणे, त्वचेला खाज येणे.
हायपोथायरॉईडिझममध्ये वजन कसे वाढते?
बहुतांश स्त्रियांमध्ये हा आजार पाहायला मिळतो. त्यामुळे चयापचयाचा वेग सरासरीपेक्षा खूप जास्त कमी होतो. चयापचयाची क्रिया नियंत्रित करण्याचे काम थायरॉईड ग्रंथींचे असते, त्यामुळे शरीरातील अतिरिक्त चरबीचे रूपांतर ऊर्जेत केले जाते. हायपोथायरॉईडिझममध्ये थायरॉक्साईनचे प्रमाण सामान्य प्रमाणापेक्षा कमी असते. याच कारणाने शरीरात अप्रत्यक्षपणे थकवा, अशक्तपणा, वजनवृद्धी होते.
हायपोथायरॉईडिझमसाठी आहार
थायरॉईडच्या आजाराने ग्रस्त असाल, तर अतिरिक्त वजन कमी करावे लागते आणि तीच गोष्ट खूप अवघड असते; पण वजन कमी करण्यासाठी थायरॉईड फ्रेंडली आहार विशेष अंगीकारू शकता.
सकाळी : सकाळी लवकर उठल्याबरोबर पाण्याबरोबर थायरॉईडसाठीची गोळी घ्यावी. सकाळी 7-8 वा.च्यादरम्यान लिंबू पाणी आणि मध घ्यावे किंवा कोमट पाण्यात अॅपल सायडर व्हिनेगर मिसळावे. आठ ते नऊच्यादरम्यान केळं आणि डाळिंबाचे दाणे एकत्र करून खावेत. मोडाची धान्ये किंवा सफरचंद, केळे आणि चिया सीड यांची स्मुदी बनवून खावी. साधारणत:, साडेदहा वाजता अर्धी वाटी साय काढलेले लो फॅट दही, त्याच्याबरोबर डाळिंब किंवा एक चमचा भाजलेले चिया सीडस् खावेत.
दुपारचे जेवण
एक बाऊल ओटस् किंवा 2 मल्टिग्रेन रोटीबरोबर एक वाटी डाळ किंवा दही-भात किंवा सूप किंवा उकडलेल्या भाज्या खाव्यात. दुपारच्या जेवणानंतर एक ग्लास ताक किंवा ग्रीन टी. दुपारी 4 वाजता सुकामेवा किंवा मोडाची धान्ये खावीत.
रात्रीचे जेवण
सायंकाळी एक प्लेट सलाड खावे. साधारणत: 7-8 वाजता दलिया किंवा एक वाटी पनीर किंवा 1 पोळी किंवा एक वाटी ब्राऊन राईस. झोपण्यापूर्वी अर्धा तास आधी एक कप गरम लिंबू पाणी प्यावे.
वजन कमी करण्यासाठी
आहाराव्यतिरिक्त वजन कमी करण्यासाठी जीवनशैलीत काही बदल करावे लागतील. कारण, काही गोष्टी मिळवण्यासाठी थोडी मेहनत तर करावी लागतेच. त्यामुळे वजन कमी करताना कोणत्या गोष्टी लक्षात ठेवाव्या पाहूया...
* सर्वात पहिल्यांदा डॉक्टरांशी बोलून दैनंदिनीत काही बदल करावेत.
* दिवसभरात कमीत कमी 10-12 ग्लास पाणी प्यावे.
* 45 मिनिटे व्यायाम करावा.
* थायरॉईडची औषधे अनशापोटी सकाळी घेण्यास विसरू नका.
* कमीत कमी 15 मिनिटे चालावे.
* जेवताना सावकाश जेवावे आणि प्रत्येक घास चावून खावा त्यामुळे पचनक्रिया चांगली राहाते.
* कार्बोनेटेड ड्रिंक्स, गोड पदार्थ, रिफाईंड तेल आणि अतिग्लुटेनचे सेवन करण्यापासून बचाव करा.
* आहार सेवन करताना विचार करून खावे. खाण्याव्यतिरिक्त इतर गोष्टींकडे लक्ष द्यावे.
* सर्वात महत्त्वाचे म्हणजे 7-8 शांत झोप जरूर घ्यावी.
पुण्यातील पीएमटीच्या बसचालकाची सोनगाव येथे आत्महत्या |
झाड मारल्याप्रकरणी सातार्यात दोन गुन्हे दाखल |
अदानी ग्रुपचा वीज प्रकल्प रद्द करण्याठी प्रकल्पग्रस्त जिल्हाधिकारी कार्यालयावर काढणार मोर्चा |
प्रतापसिंह नगरात अतिक्रमणांसह लल्लन आणि युवराजच्या दहशतीवर जिल्हा प्रशासनाचा बुलडोझर |
पाच नॅशनल पुरस्कार मिळवून श्लोक घोरपडे कोल्हापूर येथील स्पर्धेत मारणार बाजी |
'आयडियल' मतदारसंघाचे 'आयडॉल' आमदार |
आचारसंहिता काळात लोकशाही दिनाचे आयोजन होणार नाही : नागेश पाटील |
पोक्सोंतर्गत एकावर गुन्हा |
कुऱ्हाडीने वार केल्या प्रकरणी एकावर गुन्हा |
अवैधरित्या दारू विक्री प्रकरणी एकावर कारवाई |
अंमली पदार्थाचे सेवन केल्याप्रकरणी एकावर गुन्हा |
राहत्या घरातून युवक बेपत्ता |
वडूज येथे बांधकाम विभागाचा अभियंता लाचलुचपतच्या जाळ्यात |
मल्हारपेठेत शाहूपुरी पोलिसांनी पकडला पावणेदोन लाखाचा गुटखा |
आज जिल्ह्यात उदयनराजेंची होणार ग्रँड एन्ट्री |
'आयडियल' मतदारसंघाचे 'आयडॉल' आमदार |
आचारसंहिता काळात लोकशाही दिनाचे आयोजन होणार नाही : नागेश पाटील |
पोक्सोंतर्गत एकावर गुन्हा |
कुऱ्हाडीने वार केल्या प्रकरणी एकावर गुन्हा |
अवैधरित्या दारू विक्री प्रकरणी एकावर कारवाई |
अंमली पदार्थाचे सेवन केल्याप्रकरणी एकावर गुन्हा |
राहत्या घरातून युवक बेपत्ता |
वडूज येथे बांधकाम विभागाचा अभियंता लाचलुचपतच्या जाळ्यात |
मल्हारपेठेत शाहूपुरी पोलिसांनी पकडला पावणेदोन लाखाचा गुटखा |
आज जिल्ह्यात उदयनराजेंची होणार ग्रँड एन्ट्री |
सातारा लोकसभेवर अजितदादांच्या राष्ट्रवादीचा दावा कायम |
पाटखळ येथील नूतन तलाठी कार्यालयाचे अतिक्रमण |
मेक इन इंडिया पॉलिसीमुळे ‘मॅक्सिको’ होण्याची भीती? |
चक्क अप्पर जिल्हाधिकारी निवासस्थाना बाहेरचे झाड जाळण्याचा प्रयत्न |
अजित वाकनीस यांचे निधन |