कोरेगाव : मराठा आरक्षणासाठी सातारा जिल्ह्यात आरपारची लढाई सुरु झाली असून औरंगाबाद येथे गोदावरी नदीच्या पात्रात मराठा आरक्षणासाठी काकासाहेब शिंदे या युवकाने जलसमाधी घेतली. या घटनेच्या पार्श्वभूमीवर मराठा आरक्षणाला पाठिंबा देण्यासाठी आणि हुतात्मा झालेल्या शिंदे यांना श्रद्धांजली अर्पण करण्यासाठी कोरेगाव शहरात कडकडीत बंद पाळण्यात आला.
याबाबत अधिक माहिती अशी की, राज्यभर मराठा समाजाला आरक्षण मिळावे म्हणून जनआंदोलन सुरु झाले आहे. मराठा आरक्षणासाठी मराठा समाजाची आरपारची लढाई सुरु झाली आहे. मुंबईतील मराठा समाजाच्या महामोर्चावेळी दिलेली आश्वासने शासनाने पाळलेली नाहीत. ओबीसी समाजाप्रमाणे कोणत्याच सवलती मराठा समाजाला मिळत नाहीत. आण्णा साहेब पाटील महामंडळातून मराठा समाजाला कर्जे मिळत नाहीत. 50 टक्के शुल्क भरुन शैक्षणिक प्रवेश मिळत नाहीत. त्यातच मेगा शासकीय भरतीचा घाट शासनाने घातला आहे. आरक्षणाचा प्रश्न सोडून मराठा समाजाची फसवणूक करण्याचे काम शासन करीत आहे. त्यामुळे मराठा समाजाच्या आरक्षणासाठी राज्यभर आंदोलने सुरु झाली आहेत. या आंदोलनात मराठा आरक्षणासाठी कोरेगाव शहरात कडकडीत बंद पाळण्यात आला.
कोरेगाव शहरातील जळगाव नाका, आझाद चौक, नवीन एसटी स्टँड परिसर, बाजारपेठ, सातारा-पंढरपूर मेन रोड, जुना मोटर स्टँड परिसर, हुतात्मा स्मारक परिसर पेट्रोलपंप, सज्जनपुरा, शिवाजीनगर, कुमठे फाटा, सुभाषनगर, संभाजीनगर, कापड पेठ, शांतीनगर, आदर्श नगर, एकंबे रोड परिसरातील सर्व दुकाने बंद ठेवण्यात आली होती. उपहार गृहे, भाजीमंडई, पान टपर्या, गॅरेज, सिनेमागृह, मटण मार्केट आदींसह अनेक दुकाने मराठा आरक्षणाला पाठिंबा देण्यासाठी बंद होती. कोरेगाव शहरातील ग्रामस्थांनी मराठा समाजाच्या आरक्षणासाठी जलसमाधी घेणार्या काकासाहेब शिंदे या युवकास हुतात्मा स्मारक परिसरात श्रद्धांजली वाहण्यात आली. मराठा समाजासह सर्वच समाजातील ग्रामस्थांनी मराठा समाजाला आरक्षणासाठी पाठिंबा व्यक्त केला. मोठ्या पोलीस बंदोबस्तात मराठा समाजासाठी करण्यात आलेला हा बंद यशस्वीपणे पाळला गेला.
सराईत गुन्हेगाराने दिली तीन घरफोड्यांची कबुली |
उदयनराजे यांच्या समर्थनार्थ सातार्यात लोटला जनसागर |
शिक्षक हेच सुसंस्कृत समाजनिर्मितीचे जनक |
अजिंक्यतारा कारखान्यावर वादातून झाला गोळीबार |
जनता बँक साताराच्या तज्ज्ञ संचालकपदी सौरभ रायरीकर, राजेंद्र जाधव यांची निवड |
महिलेची गळफास घेवून आत्महत्या |
एकाच्या मृत्यूप्रकरणी कार चालकावर गुन्हा |
संशयित माल जवळ बाळगल्याप्रकरणी एकावर गुन्हा |
राहत्या घरातून युवती बेपत्ता |
वाई, जावळी परिसरात जोरदार अवकाळी पाऊस |
विरोधकांच्या रडीच्या डावाला जनता भुलणार नाही |
महायुतीचे आज सातार्यात जोरदार शक्ती प्रदर्शन |
सातारा जिल्ह्यात राम लल्लाच्या गजराने रामनवमी साजरी |
उदयनराजे यांच्या शक्तीप्रदर्शनासाठी आमदार शिवेंद्रसिंहराजे सज्ज |
सातारा जिल्ह्यात रामनवमी उत्साहात साजरी |
महिलेची गळफास घेवून आत्महत्या |
एकाच्या मृत्यूप्रकरणी कार चालकावर गुन्हा |
संशयित माल जवळ बाळगल्याप्रकरणी एकावर गुन्हा |
राहत्या घरातून युवती बेपत्ता |
वाई, जावळी परिसरात जोरदार अवकाळी पाऊस |
विरोधकांच्या रडीच्या डावाला जनता भुलणार नाही |
महायुतीचे आज सातार्यात जोरदार शक्ती प्रदर्शन |
सातारा जिल्ह्यात राम लल्लाच्या गजराने रामनवमी साजरी |
उदयनराजे यांच्या शक्तीप्रदर्शनासाठी आमदार शिवेंद्रसिंहराजे सज्ज |
सातारा जिल्ह्यात रामनवमी उत्साहात साजरी |
उष्माघातावरील उपचारासाठी सर्व शासकीय रुग्णालयांमध्ये कक्ष स्थापन |
आदर्श आचारसंहितेच्या काटेकोरपणे अंमलबजावणीस सर्वोच्च प्राधान्य : जिल्हाधिकारी डुडी |
श्रीराम नवमी निमित्त राम ध्यान मंदिरात अर्पित कथक नृत्यलयाचा कार्यक्रम |
निवृत्तीवेतनधारक/कुटुंबनिवृत्तीवेतन धारकांना आवाहन |
विविध मोबाईल अॅपच्या माध्यमातून मतदारांना सोई- सुविधा |