11:15pm | May 23, 2018 |
वडूज : खटाव तालुक्यातील मायणी येथील जगप्रसिद्ध इंदिरा गांधी पक्षी आश्रयस्थान महाराष्ट्रभर प्रसिद्ध आहे. ६५ हेक्टर क्षेत्र असलेल्या या पक्षी आश्रयस्थानात मोठे वनउद्यान आहे. येथे हजारो विविध जातींचे लहान मोठे वृक्ष आहेत. ब्रिटीशकालीन तलावाच्या सभोवार ६५ हेक्टर क्षेत्रात हे उद्यान पसरलेले आहे. तलावात ज्यावेळी पाण्याचा साठा असतो त्यावेळी येथील वृक्षांवर देशी परदेशी पक्षांची फार मोठी गर्दी विसावलेली असते. त्यामुळे पर्यटकांची मोठी गर्दी पक्षी पाहण्यासाठी होत असते.
आज बुधवारी दुपारी अज्ञात व्यक्तीकडून या वनक्षेत्राला आग लावण्यात आली. या आगीवर वन कर्मचारी व ग्रामस्थांकडून वेळीच नियंत्रण मिळवण्यात यश आल्याने मायणीची वनसंपदा वाचविण्यात यश आले. येथील मल्हारपेठ - पंढरपूर रोड लगतच्या दोन्ही बाजुस सुमारे ६५ हेक्टरमध्ये वनक्षेत्र आहे. या वनक्षेत्रामधे विविध झाडांची लागवड करण्यात आली आहे. या वनक्षेत्राच्या मार्गातून मायणीचे पोलीस पाटील प्रशांत कोळी जात होते. त्यांच्या निदर्शनास ही आग आल्यानंतर त्यांनी दूरध्वनीवरून लगेच वन कर्मचाऱ्यांशी संपर्क साधला. व वनक्षेत्राला आग लागल्याची माहिती दिली. त्यावेळी फ्रेंड्स ग्रुपचे अध्यक्ष महेश जाधव व त्यांचे सहकारी हे कुकुडवाड वरून येत होते. त्यांनी लगेच आग लागलेल्या क्षेत्रात जावुन आग विझवण्यास सुरुवात केली. यावेळी वनविभागातील कर्मचारी अभिजीत खाडे, दुर्योधन जाधव, मोहन जाधव ,मल्हारी जाधव, अंकुश पवार दादासाहेब लोखंडे, पत्रकार संदिप कुंभार व दत्ता कोळी, विजय माळी, शुभन माळी, रविद्र देशमुख यांनी एकत्र येऊन तेथील झाडपाल्याने ही आग आटोक्यात आणल्याने मायणीची वनसंपदा वाचविण्यात यश आले आहे. या आगीने रौद्ररूप धारण करण्यापूर्वीच ही आग आटोक्यात आणल्याने फार मोठी वृक्षसंपदा आगीत जळून खाक होण्याचा धोका टळला. तसेच त्यामुळे मायणीचे पक्षी आश्रयस्थान देखील सुरक्षित राहिले आहे.
सराईत गुन्हेगाराने दिली तीन घरफोड्यांची कबुली |
उदयनराजे यांच्या समर्थनार्थ सातार्यात लोटला जनसागर |
शिक्षक हेच सुसंस्कृत समाजनिर्मितीचे जनक |
अजिंक्यतारा कारखान्यावर वादातून झाला गोळीबार |
जनता बँक साताराच्या तज्ज्ञ संचालकपदी सौरभ रायरीकर, राजेंद्र जाधव यांची निवड |
महिलेची गळफास घेवून आत्महत्या |
एकाच्या मृत्यूप्रकरणी कार चालकावर गुन्हा |
संशयित माल जवळ बाळगल्याप्रकरणी एकावर गुन्हा |
राहत्या घरातून युवती बेपत्ता |
वाई, जावळी परिसरात जोरदार अवकाळी पाऊस |
विरोधकांच्या रडीच्या डावाला जनता भुलणार नाही |
महायुतीचे आज सातार्यात जोरदार शक्ती प्रदर्शन |
सातारा जिल्ह्यात राम लल्लाच्या गजराने रामनवमी साजरी |
उदयनराजे यांच्या शक्तीप्रदर्शनासाठी आमदार शिवेंद्रसिंहराजे सज्ज |
सातारा जिल्ह्यात रामनवमी उत्साहात साजरी |
महिलेची गळफास घेवून आत्महत्या |
एकाच्या मृत्यूप्रकरणी कार चालकावर गुन्हा |
संशयित माल जवळ बाळगल्याप्रकरणी एकावर गुन्हा |
राहत्या घरातून युवती बेपत्ता |
वाई, जावळी परिसरात जोरदार अवकाळी पाऊस |
विरोधकांच्या रडीच्या डावाला जनता भुलणार नाही |
महायुतीचे आज सातार्यात जोरदार शक्ती प्रदर्शन |
सातारा जिल्ह्यात राम लल्लाच्या गजराने रामनवमी साजरी |
उदयनराजे यांच्या शक्तीप्रदर्शनासाठी आमदार शिवेंद्रसिंहराजे सज्ज |
सातारा जिल्ह्यात रामनवमी उत्साहात साजरी |
उष्माघातावरील उपचारासाठी सर्व शासकीय रुग्णालयांमध्ये कक्ष स्थापन |
आदर्श आचारसंहितेच्या काटेकोरपणे अंमलबजावणीस सर्वोच्च प्राधान्य : जिल्हाधिकारी डुडी |
श्रीराम नवमी निमित्त राम ध्यान मंदिरात अर्पित कथक नृत्यलयाचा कार्यक्रम |
निवृत्तीवेतनधारक/कुटुंबनिवृत्तीवेतन धारकांना आवाहन |
विविध मोबाईल अॅपच्या माध्यमातून मतदारांना सोई- सुविधा |