02:36am | Jan 24, 2020 |
कराड : मलकापूर नगरपालिकेने केलेल्या मालमता करवाढीच्या आणि सत्ताधार्यांच्या भ्रष्ट, एकाधिकारशाही कारभाराविरोधात भाजपच्या नगरसेवकांनी नागरीकांसह बुधवारी लाक्षणिक उपोषण केले. भाजपचे सरचिटणीस डॉ. अतुल भोसले यांनी सायंकाळी उपोषणस्थळी येऊन आंदोलकांशी चर्चा केली. तसेच आंदोलकांना लिंबू-सरबत दिल्यानंतर उपोषणाची सांगता झाली. मलकापूर नगरपालिका सत्ताधार्यांच्या एककलमी कारभाराला योग्य मार्गाने विरोध करणार असल्याचे भाजप सरचिटणीस डॉ.अतुल भोसले यांनी पत्रकारांशी बोलताना सांगितले.
पालिकेचा कारभार अकार्यक्षम पद्धतीने सुरू असल्याचा आरोप करत विरोधी नगरसेवकांसह भाजपा पदाधिकारी बुधवारी पालिकेसमोर उपोषणाला बसले होते. पालिकेने बांधकाम व्यावसायिकांची सुरू केलेली पिळवणूक थांबवावी, या मागणीसह 19 टक्के कर वाढ मागे घ्यावी, अन्यथा आंदोलन तीव्र करण्याचा इशारा शेतीमित्र अशोकराव थोरात यांनी दिला. विरोधी पक्षाच्या गटनेत्या नूरजहाँ मुल्ला, नगरसेवक अजित थोरात, दीनेश रैनाक, निर्मला काशिद, राजू मुल्ला, भाजपचे तालुकाध्यक्ष धनाजी पाटील, आबासाहेब गावडे, सुरेश खिलारे, डॉ.सारिका गावडे यांच्यासह विरोधी गटाचे कार्यकर्ते आणि नागरीकही उपोषणात सहभागी झाले होते.
सत्ताधार्यांनी केलेली मालमत्ता करवाढ अन्यायकारक आहे. ती रद्द न झाल्यास अन्य नगरपालिकांच्या तुलनेत मलकापूरच्या नागरीकांना मोठा आर्थिक भुर्दंड सोसावा लागणार आहे. मलकापुरात रोगराई पसरली असून कोणत्याही उपाययोजना नाहीत. इथे रहायला यायचे म्हणजे मृत्यूला कवटाळण्यासारखे आहे. भुयारी गटर योजना कुचकामी आहे. मुस्लीम समाजासाठी दफनभूमी नाही. चोवीस तास योजनेतून नागरीकांना दुषित पाण्याचा पुरवठा होत आहे. हे पाणी बंद करावे. जिल्हाधिकार्यांनी पालिकेच्या कारभाराची चौकशी करावी. बांधकाम व्यावसायिकांची पिळवणूक थांबवावी. महामार्गावरील भाजी मंडई बंद करून वाहतूक कोंडी फोडावी. स्वच्छता अभियानावर फक्त उधळपट्टी सुरू आहे. आधी गल्लीबोळात स्वच्छता करावी, अशा मागण्यांसाठी भाजपच्यावतीने हे लाक्षणिक उपोषण करण्यात आले.
या उपोषणला सहकार परिषदेचे माजी अध्यक्ष शेखर चरेगावकर, भाजपाचे जिल्हाध्यक्ष विक्रम पावसकर, कृष्णा कारखान्याचे संचालक दयानंद पाटील, शिवसेना तालुकाध्यक्ष नितीन काशिद, मलकापूर शहरप्रमुख सूर्यकांत मानकर, भाजपाचे तालुकाध्यक्ष धनाजी पाटील यांनी भेट दिली. सायंकाळी भाजपचे सरचिटणीस डॉ. अतुल भोसले यांनी उपोषस्थळी येऊन आपण आंदोलकांच्या पाठिशी आहोत, असे सांगितले. तसेच नगरपालिकेच्या कारभाराला योग्य मार्गाने विरोध करणार असल्याचे सांगितले. डॉ.भोसले यांच्या हस्ते सरबत घेऊन आंदोलकांनी एक दिवसाचे लाक्षणिक उपोषण मागे घेतले. भाजपचे नगरसेवक चांगल्या कामाला साथ करतील. परंतु, अन्यायाला त्यांचा तीव्र विरोध राहील. आजच्या उपोषणाचा आणि भाजप नगरसेवकांच्या मागण्यांचा मलकापूर नगरपालिकेचे सत्ताधारी जरूर विचार करतील, असा विश्वासही डॉ.भोसले यांनी व्यक्त केला.
शाहूपुरी पोलिस ठाण्याच्या हद्दीत आढळला अनोळखी पुरुषाचा मृतदेह |
सातारा शहरातून दोनजणी बेपत्ता |
डॉ आंबेडकर जयंती समारोह अध्यक्षपदी संजय गाडे यांची निवड |
शरद पवारांच्या डावपेचाकडे महाराष्ट्राचे लक्ष |
कराडला रविवारी इंडिया आघाडीचा मेळावा |
पश्चिम महाराष्ट्रात दि. २९ ते ३१ पर्यंत महावितरणचे वीजबिल भरणा केंद्र सुरू |
करंजे पेठतील थकबाकीदाराची पालिकेकडून मालमत्ता केली सील |
साताऱ्यात लोकसभेबाबत शुक्रवारी शरद पवारांची बैठक |
जमिनीच्या वादातून धारदार शस्त्राने एकाचा खून |
लोकसभा सार्वत्रिक निवडणूक-2024 |
कोल्हापूरला निघालेली खासगी ट्रॅव्हल्स झाली पलटी |
पुण्यातील पीएमटीच्या बसचालकाची सोनगाव येथे आत्महत्या |
झाड मारल्याप्रकरणी सातार्यात दोन गुन्हे दाखल |
अदानी ग्रुपचा वीज प्रकल्प रद्द करण्याठी प्रकल्पग्रस्त जिल्हाधिकारी कार्यालयावर काढणार मोर्चा |
प्रतापसिंह नगरात अतिक्रमणांसह लल्लन आणि युवराजच्या दहशतीवर जिल्हा प्रशासनाचा बुलडोझर |
पश्चिम महाराष्ट्रात दि. २९ ते ३१ पर्यंत महावितरणचे वीजबिल भरणा केंद्र सुरू |
करंजे पेठतील थकबाकीदाराची पालिकेकडून मालमत्ता केली सील |
साताऱ्यात लोकसभेबाबत शुक्रवारी शरद पवारांची बैठक |
जमिनीच्या वादातून धारदार शस्त्राने एकाचा खून |
लोकसभा सार्वत्रिक निवडणूक-2024 |
कोल्हापूरला निघालेली खासगी ट्रॅव्हल्स झाली पलटी |
पुण्यातील पीएमटीच्या बसचालकाची सोनगाव येथे आत्महत्या |
झाड मारल्याप्रकरणी सातार्यात दोन गुन्हे दाखल |
अदानी ग्रुपचा वीज प्रकल्प रद्द करण्याठी प्रकल्पग्रस्त जिल्हाधिकारी कार्यालयावर काढणार मोर्चा |
प्रतापसिंह नगरात अतिक्रमणांसह लल्लन आणि युवराजच्या दहशतीवर जिल्हा प्रशासनाचा बुलडोझर |
पाच नॅशनल पुरस्कार मिळवून श्लोक घोरपडे कोल्हापूर येथील स्पर्धेत मारणार बाजी |
'आयडियल' मतदारसंघाचे 'आयडॉल' आमदार |
आचारसंहिता काळात लोकशाही दिनाचे आयोजन होणार नाही : नागेश पाटील |
पोक्सोंतर्गत एकावर गुन्हा |
कुऱ्हाडीने वार केल्या प्रकरणी एकावर गुन्हा |