06:15pm | Jan 25, 2020 |
सातारा : जिल्ह्यात सध्या दरोड्यांचे सत्र सुरु आहे. त्यामुळे लोकांच्या मनात दहशतीचे वातावरण निर्माण झाले आहे. हे कमी की काय म्हणून सातारा जिल्ह्यात खासगी फायनान्स कंपन्यांची पुन्हा एकदा दादागिरी वाढली असून फायनान्स कंपन्यांचे रेपो बॉयज् दिवसाढवळ्या वाहनधारकांना शस्त्राचा धाक दाखवून त्यांच्याकडून हजारो रुपयांची लूट करीत आहेत. खासगी फायनान्स कंपन्यांच्या वसुली करणार्या गुंडांवर तत्कालीन पोलीस अधीक्षक संदीप पाटील यांच्याप्रमाणेच तेजस्वी सातपुते यांनीही खासगी फायनान्स कंपन्यांची दादागिरी मोडून काढावी, अशी मागणी जिल्ह्यातील खासगी फायनान्स पीडित वाहनधारकांनी केली आहे.
जिल्ह्यात खासगी सावकारांचे कंबरडे मोडलेले आहे. त्यामुळे ते आता डोके वर काढण्याच्या भानगडीत पडत नाहीत. परंतू कायदा हातात घेऊन भररस्त्यात विविध खासगी फायनान्स कंपन्यांचे गुंड (रेपो बॉयज्) कर्जधारक वाहनचालकांना शस्त्रांचा धाक दाखवून, प्रसंगी मारहाण करुन अवैध हप्ता वसुली करीत असल्यामुळे सातारा जिल्ह्यात खरेच कायद्याचे राज्य शिल्लक राहिले आहे काय? असा प्रश्न उपस्थित होत आहे. गेल्यावर्षी खासगी फायनान्स कंपन्यांनी नियुक्त केलेल्या गुंडांच्या जाचाला कंटाळून पनवेल (नवी मुंबई) येथील फायनान्स पीडित वाहनधारक तरुणाने गळफास घेऊन आत्महत्त्या केली होती. त्यामुळे राज्यभर खळबळ उडाली होती. त्यामुळे पोलिसांनीही या खासगी फायनान्स कंपन्याविरोधात दंडुका उगारुन अवैध पद्धतीने वसुली कराल, तर गुन्हे दाखल केले जातील अशी तंबी दिल्यामुळे खासगी फायनान्स कंपन्यांचे रेपो बॉयज् काही काळ अज्ञातवासात गेले होते. परंतू याच खासगी फायनान्स कंपन्यांच्या रेपो बॉयज्नी सातारा जिल्ह्यात पुन्हा एकदा डोके वर काढले आहे. सातारा जिल्ह्यातील कराड, फलटण, सातारा शहरातील वाढे फाटा, बॉम्बे रेस्टॉरंट तसेच आनेवाडी टोलनाका येथेही खासगी फायनान्स कंपन्यांचे हे रेपो बॉयज् हातात कागदाची भेंडोळी घेऊन उभे असतात. एखादा फायनान्स कंपन्यांचा हप्ता थकलेला वाहनधारक दिसल्यास त्याला हे गुंड भरदिवसा गराडा घालून त्याच्या गाडीची चावी काढून घेतात. प्रतिकार केल्यास कायदा हातात घेवून त्याला बेदम मारहाण केली जाते. वरुन त्याची गाडीही ते गुंड ताब्यात घेतात. ‘हप्ता भर, नाहीतर आम्हाला आमचा हप्ता दे’ अशा पद्धतीने त्याला धमकावून त्याची लूटमार केली जाते.
फलटण शहरातील नाना पाटील चौकात मंगळवार पेठेतील गुंडांनी तर हैदोस मांडलेला आहे. सुमारे 10-15 गुंडांचे हे टोळके फलटण शहरात वाहनधारकांची टेहळणी करीत असते. एखादा कर्जदार वाहनधारक दिसल्यास त्याला हे टोळके बेदम मारहाण केल्या असल्याच्या घटना यापूर्वी घडलेल्या आहेत आणि घडतही आहेत. या संदर्भात फलटण शहर पोलीस ठाण्यात अनेक तक्रारीसुद्धा गेलेल्या आहेत. परंतू फलटण पोलिसांनी राजकीय दबावापोटी या तक्रारी दाखल न करुन घेतल्यामुळे फलटण शहरात या रेपो बॉयज्ची दहशत निर्माण झाली आहे.
सुमारे दोन वर्षापूर्वी सातारा जिल्ह्यात खासगी फायनान्स कंपन्यांच्या रेपो बॉयज्नी अशाचप्रकारे उच्छाद मांडला होता. मात्र तत्कालीन पोलीस अधीक्षक संदीप पाटील यांनी कायद्याचा दंडुका उगारुन खबरदार, अवैधरित्या कायदा हातात घेऊन वाहनधारकांची लूटमार कराल तर मोक्का लावेन, असा दम भरल्यामुळे अनेक फायनान्स कंपन्यांचे गुंड बिळात लपून बसले होते. मात्र संदीप पाटील यांची सुमारे दीड वर्षापूर्वी बदली झाल्यामुळे या रेपो बॉयज्नी पुन्हा एकदा डोके वर काढले आहे. सातारा जिल्ह्यात दिवसाढवळ्या यांनी अवैध पद्धतीने वाहनधारकांकडून वसुली करुन लुटमार चालवलेली आहे. संदीप पाटील यांच्याप्रमाणेच डॅशिंग लेडी सिंघम तेजस्वी सातपुते यांनीसुद्धा कायद्याचा आसूड उगारुन खासगी फायनान्स कंपन्यांच्या गुंडांवर (रेपो बॉयज्) मोक्कास्त्र डागावे, अशी मागणी अवैध वसूली पीडित वाहनधारकांकडून होऊ लागली आहे.
स्विगी परवडले, पण रेपो बॉयज् नकोत!
काल दि. 24 रोजी स्विगी या खाद्य पदार्थांची डिलिव्हरी करणार्या युवकाने तब्बल 40 घरे फोडून सुमारे वीस लाखांचे सोन्या-चांदीचे दागिने तसेच महागड्या वस्तूंवर डाका टाकल्याचे उघडकीस आले आहे. परंतू असे अनेक रेपो बॉयज् सातारा जिल्ह्यात वाहनधारकांची वाटमारी करीत आहेत. या वाहनधारकांकडून अवैधरित्या ते लाखो रुपयांची वसुली करीत आहेत. फायनान्स कंपन्यांच्या नावावर चाललेला हा गोरखधंदा गेल्या दीड वर्षात भलताच फोफावला असल्यामुळे स्विगी बॉयज् परवडले पण रेपो बॉयज् नकोत, अशा भावना अनेकांनी ‘सातारा टुडे’कडे व्यक्त केल्या आहेत.
खासगी फायनान्स, स्विगी झोमॅटो सह टोल नाक्यावरील कर्मचार्यांची चारित्र्य पडताळणी करण्यात यावी
सातारा जिल्ह्यात बजाज, टाटा, श्रीराम, महिंद्रा, इंडसइंड सह वाहनांसाठी इतर खासगी कंपन्या फायनान्स करतात. वर्षाला कोट्यवधी रुपयांचा व्यवसाय या कंपन्या करीत असतात. मात्र अनेकदा काही वाहनधारक आपल्या वाहन कर्जाचे हप्ते वेळेत देऊ शकत नसल्यामुळे या खासगी फायनान्स कंपन्यांनी सातारा शहरातील अनेक नामचीन गुंडांना हप्ते वसुलीसाठी रेपो एजन्सीज दिलेल्या आहेत. त्यामुळे अनेक गंभीर गुन्हे दाखल असलेले गुंड या रेपो एजन्सीजमध्ये रोजंदारीवर काम करीत आहेत. हे गुंड निर्ढावलेले असल्यामुळे ते अनेकदा वाहनधारकांकडून वसुली करीत असताना कायदा हातात घेवून त्या वाहनधारकांच्या घरात अनाधिकाराने प्रवेश करुन त्यांना मारहाण करुन त्यांच्याकडून अवैध पद्धतीने हप्ता वसुली करीत असतात. वास्तविक या गुंडांकडे फायनान्स कंपन्यांचे कोणतेही नियुक्तीपत्रही नसते. असे असतानाही ते थेट कोणाच्याही घरात घुसून अथवा भर रस्त्यात वाहनधारकाची लूटमार करतात. स्विगी व झोमॅटो या कंपन्यांचे डिलिव्हरी बॉयज् डिलिव्हरी देण्यासाठी थेट घरात जातात. त्यामुळे त्यांना एखाद्या घराची सहज रेकी करता येते. तसेच जिल्ह्यातील आनेवाडी व तासवडे टोल नाक्यावर टोल व्यवस्थापनाने टोल वसूल करण्यासाठी अनेक गुंड प्रवृत्तीचे लोक नियुक्त केल्यामुळे टोल नाक्यावरही दादागिरी करुन वाहनचालकांना मारहाण करुन त्यांची लूट केल्याच्या घटनाही यापूर्वी घडलेल्या आहेत. पासपोर्ट तसेच इतर शासकीय कामांसाठी पोलिसांकडून चारित्र्य पडताळणी करणे बंधनकारक आहे. याच धर्तीवर थेट जनतेशी संपर्क येत असलेल्या खासगी फायनान्स, स्विगी, झोमॅटोसह जिल्ह्यातील टोलनाक्यावर नियुक्त केलेल्या कर्मचार्यांची चारित्र्य पडताळणी केली तर जिल्ह्यातील क्राईमरेटही कमी होण्यास मदत होणार आहे.
थकीत कर्जवसुलीसाठी रेपो बॉयज्ला हवी आयआयबीएफ ची मान्यता
खासगी फायनान्स कंपन्यांचे हप्ते थकवलेल्या वाहनांची रिकव्हरी करण्यासाठी इंडियन इन्स्टिट्यूट ऑफ बँकिंग ऍण्ड फायनान्स (आयआयबीएफ)ची परिक्षा देऊन याबाबतचे प्रमाणपत्र संबंधित रेपो बॉयज् अथवा रिकव्हरी एजंटला मिळायला हवे. तरच तो हप्ते थकलेल्या वाहनांची रिकव्हरी करण्यास पात्र असतो. मात्र, सातारा जिल्ह्यात एक-दोन रिकव्हरी एजंट सोडल्यास कोणत्याही रिकव्हरी एजंट अथवा रेपो बॉयज्कडे आयआयबीएफचे प्रमाणपत्र नाही. सातारा जिल्ह्यात खासगी फायनान्स कंपन्यांच्या वसुलीच्या नावाखाली गंभीर गुन्हे दाखल असलेले शेकडो गुंड रेपो बॉयज् म्हणून गाड्या ताब्यात घेण्याचे काम करीत आहेत. अशावेळी वाहनधारकांनी विरोध केल्यास त्याला मारहाण केल्याच्या घटनाही यापूर्वी घडलेल्या आहेत. त्यामुळे सातारा पोलिसांनी खासगी फायनान्स कंपन्यांच्या नावाखाली वाहनधारकांची लूटमार करणार्या रेपो बॉयज् ची रिझर्व्ह बँक ऑफ इंडियाच्या नियमानुसार रिकव्हरीसाठी देण्यात येणारी आयआयबीएफची परिक्षा दिली आहे काय व त्याचे प्रमाणपत्र त्याच्याजवळ आहे काय? याची तपासणी केल्यास अनेक रेपो बॉयज् कडे हे प्रमाणपत्रच नसल्यामुळे सातार्यात सुरु असलेल्या खासगी फायनान्स कंपन्यांच्या लुटमारीचा पर्दाफाश होणार आहे.
सराईत गुन्हेगाराने दिली तीन घरफोड्यांची कबुली |
उदयनराजे यांच्या समर्थनार्थ सातार्यात लोटला जनसागर |
शिक्षक हेच सुसंस्कृत समाजनिर्मितीचे जनक |
अजिंक्यतारा कारखान्यावर वादातून झाला गोळीबार |
जनता बँक साताराच्या तज्ज्ञ संचालकपदी सौरभ रायरीकर, राजेंद्र जाधव यांची निवड |
महिलेची गळफास घेवून आत्महत्या |
एकाच्या मृत्यूप्रकरणी कार चालकावर गुन्हा |
संशयित माल जवळ बाळगल्याप्रकरणी एकावर गुन्हा |
राहत्या घरातून युवती बेपत्ता |
वाई, जावळी परिसरात जोरदार अवकाळी पाऊस |
विरोधकांच्या रडीच्या डावाला जनता भुलणार नाही |
महायुतीचे आज सातार्यात जोरदार शक्ती प्रदर्शन |
सातारा जिल्ह्यात राम लल्लाच्या गजराने रामनवमी साजरी |
उदयनराजे यांच्या शक्तीप्रदर्शनासाठी आमदार शिवेंद्रसिंहराजे सज्ज |
सातारा जिल्ह्यात रामनवमी उत्साहात साजरी |
महिलेची गळफास घेवून आत्महत्या |
एकाच्या मृत्यूप्रकरणी कार चालकावर गुन्हा |
संशयित माल जवळ बाळगल्याप्रकरणी एकावर गुन्हा |
राहत्या घरातून युवती बेपत्ता |
वाई, जावळी परिसरात जोरदार अवकाळी पाऊस |
विरोधकांच्या रडीच्या डावाला जनता भुलणार नाही |
महायुतीचे आज सातार्यात जोरदार शक्ती प्रदर्शन |
सातारा जिल्ह्यात राम लल्लाच्या गजराने रामनवमी साजरी |
उदयनराजे यांच्या शक्तीप्रदर्शनासाठी आमदार शिवेंद्रसिंहराजे सज्ज |
सातारा जिल्ह्यात रामनवमी उत्साहात साजरी |
उष्माघातावरील उपचारासाठी सर्व शासकीय रुग्णालयांमध्ये कक्ष स्थापन |
आदर्श आचारसंहितेच्या काटेकोरपणे अंमलबजावणीस सर्वोच्च प्राधान्य : जिल्हाधिकारी डुडी |
श्रीराम नवमी निमित्त राम ध्यान मंदिरात अर्पित कथक नृत्यलयाचा कार्यक्रम |
निवृत्तीवेतनधारक/कुटुंबनिवृत्तीवेतन धारकांना आवाहन |
विविध मोबाईल अॅपच्या माध्यमातून मतदारांना सोई- सुविधा |