12:00am | Apr 07, 2020 |
फलटण : सध्या देशामध्ये कोरोना विषाणूच्या प्रादुर्भावाच्या अनुषंगाने सर्वत्र टाळेबंदी जाहीर केली आहे. सातारा जिल्हाधिकार्यांनी कलम 144 व 337 नुसार जमाव व संचारबंदी लागू केली आहे. असे असतानाही सासवड, ता. फलटण येथील सरपंच व ग्रामसेवकांनी जिल्हाधिकार्यांचे आदेश डावलून गटाराच्या पाईपलाईनचे काम सुरु ठेवून कोरोना प्रादुर्भावाला निमंत्रणाचे कृत्य केले आहे. त्यामुळे संबंधितांवर कठोर कारवाई करण्याची मागणी करण्यात आली आहे.
याबाबत माहिती अशी की, सासवड, ता. फलटण येथे कोरोना प्रादुर्भावाच्या अनुषंगाने टाळेबंदी असतानाही गावचे सरपंच, ग्रामसेवक व ठेकेदाराने जिल्हाधिकार्यांचा आदेश डावलून सुमारे पाचपेक्षा अधिक कामगारांना गटाराच्या पाईपलाईन कामावर जुंपून जमाव व संचारबंदी आदेशाचे उल्लंघन केले आहे. जिल्ह्यात आजपावेतो सुमारे पाच कोरोनाचे रुग्ण सापडलेले आहेत. त्यातच एका रुग्णाचा मृत्यूही झालेला आहे. असे असताना केवळ पैश्याच्या हव्यासापोटी सासवड गावच्या सरपंच, ग्रामसेवकांनी ठेकेदाराला हाताशी धरुन परगावातील कामगारांना कामाला जुंपून कोरोना संसर्गाची भीती न बाळगता संपूर्ण गावाला वेठीस धरण्याचे काम केले आहे. त्यामुळे या तिघांवरही शासकीय आदेशाचे उल्लंघन केल्याप्रकरणी कठोर कारवाई करण्यात यावी, अशी मागणी राजेंद्र काकडे, किरण जाधव यांनी फलटण उप विभागीय अधिकार्यांकडे अर्जाद्वारे केली आहे.
मंदार कोल्हटकर, धिरज पाटील यांचे अपघाती निधन |
ट्रकच्या धडकेत दुचाकीस्वाराचा मृत्यू |
राजवाडा परिसरातून सव्वा लाखांच्या सोन्याच्या चैनची चोरी |
मारहाण प्रकरणी चौघांवर गुन्हा |
ट्रक चालकाला लुटल्याप्रकरणी तीन अज्ञातांवर गुन्हा |
महिलेचा विनयभंग केल्याप्रकरणी एकावर गुन्हा |
सराईत गुन्हेगाराने दिली तीन घरफोड्यांची कबुली |
उदयनराजे यांच्या समर्थनार्थ सातार्यात लोटला जनसागर |
शिक्षक हेच सुसंस्कृत समाजनिर्मितीचे जनक |
अजिंक्यतारा कारखान्यावर वादातून झाला गोळीबार |
जनता बँक साताराच्या तज्ज्ञ संचालकपदी सौरभ रायरीकर, राजेंद्र जाधव यांची निवड |
महिलेची गळफास घेवून आत्महत्या |
एकाच्या मृत्यूप्रकरणी कार चालकावर गुन्हा |
संशयित माल जवळ बाळगल्याप्रकरणी एकावर गुन्हा |
राहत्या घरातून युवती बेपत्ता |

वाई, जावळी परिसरात जोरदार अवकाळी पाऊस |
विरोधकांच्या रडीच्या डावाला जनता भुलणार नाही |
महायुतीचे आज सातार्यात जोरदार शक्ती प्रदर्शन |
सातारा जिल्ह्यात राम लल्लाच्या गजराने रामनवमी साजरी |
उदयनराजे यांच्या शक्तीप्रदर्शनासाठी आमदार शिवेंद्रसिंहराजे सज्ज |