खंडाळा : आशियाई महामार्ग ४७ वरील खंबाटकी बोगदा ओलांडल्यानंतर सातारा ते पुणे जाणाऱ्या महामार्गावर असणाऱ्या तीव्र वळणावर ट्रक पलटी होऊन झालेल्या विचित्र अपघातामध्ये दुचाकीचालक जागीच ठार झाला आहे. या अपघातामध्ये सुदर्शन राजेंद्र पवार ( वय १९, रा.मलकापूर ,शाहूवाडी जि.कोल्हापूर) असे जागीच ठार झालेल्या दुचाकीचालकाचे नाव आहे.
याबाबतची घटनास्थळावरून व पोलीसांनी दिलेली माहिती अशी, तासगाव जि.सांगली येथील द्राक्षे घेऊन उल्हासनगर,मुंबई याठिकाणी टेम्पो (क्र.एमएच-१०-एक्यू-३२५७) घेऊन चालक अक्षय धनंजय माळी ( वय २१, रा. तासगाव जि. सांगली) हा क्लिनर राजकुमार समरुद्द धुर्वे याच्याबरोबर घेऊन निघाला होता. दरम्यान, टेम्पो हा खंबाटकी घाटातील बेंगरूटवाडी गावच्या हद्दीमधील बोगदा ओलांडल्यानंतर आला असता त्याठिकाणी असणा-या तीव्र वळणावर ट्रक (क्र.एमएच - ०९-सीए-३८३९) हा पलटी झाल्याचे निदर्शनास आले. यावेळी संबंधित ट्रक पलटी झाल्याने त्यामधील डिझेल महामार्गावर सांडल्याने त्यावरून जाणारे वाहन घसरत असताना टेम्पो हाही घसरत दोन नंबरच्या लाईनमध्ये आला. यावेळी अचानकपणे झालेल्या या घटनेमध्ये संबंधित टेम्पोचा लक्झरीने आरसा तोडत पाठीमागून कंटेनर (क्र.आरजे-१४-जीके-२९७०) ने जोरदार धडक दिली असता साधारणपणे टेम्पो हा १०० ते १५० फूट पुढे घसरत गेला. यावेळी पाठीमागील चालकाच्या बाजूला एक विना नंबरची दुचाकी चाकाखाली येत दुचाकीवरील सुदर्शन राजेंद्र पवार हा गंभीर जखमी झाल्याचे निदर्शनास आले.
दरम्यान, यावेळी अपघाताची माहिती मिळताच रात्रगस्तीवर असलेले शिरवळ पोलीस स्टेशनचे पोलीस निरीक्षक विनायक वेताळ, खंडाळा पोलीस स्टेशनच्या पोलीस उपनिरीक्षक स्वाती पवार यांनी शिरवळ व खंडाळा पोलीस स्टेशनच्या अधिकारी व कर्मचाऱ्यांसहित त्याचप्रमाणे भुईंज महामार्ग पोलीस मदत केंद्राच्या अधिकाऱ्यांनी व कर्मचाऱ्यांनी तत्काळ घटनास्थळी धाव घेतली . यावेळी गंभीर जखमी झालेल्या सुदर्शन पवार याला रुग्णवाहिकेतून खंडाळा येथील रुग्णालयात दाखल करण्यात आले असता डॉक्टरांनी तपासून मृत घोषित केले.यावेळी सुदर्शन पवार याचे मृतदेहाचे शवविच्छेदन खंडाळा येथील ग्रामीण रुग्णालयात करण्यात येऊन मृतदेह नातेवाईकांच्या ताब्यात देण्यात आला. या अपघातामध्ये मोठ्या प्रमाणात वाहनांचे लाखो रुपयांचे नुकसान होत खंबाटकी घाटातील वाहतूक तब्बल चार तास विस्कळीत झाली होती पोलीसांना कसरत करावी लागली.याबाबतची फिर्याद अक्षय माळी याने खंडाळा पोलीस स्टेशनला दिली असून याबाबत मालट्रक चालक मोहन महादेव बेडगे (वय ३०,रा.सकनवाडी,ता.चिकोडी,जि. बेळगाव राज्य कर्नाटक) याच्याविरुद्ध खंडाळा पोलीस स्टेशनला गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या घटनेचा अधिक तपास पोलीस उपनिरीक्षक महेश कदम हे करीत आहे.
कार पलटी होवून चालकाचा मृत्यू |
दुचाकीची पादचाऱ्याला धडक |
विद्यानगर येथील कॅफेवर पोलिसांचा छापा |
बेकायदेशीररित्या पिस्तुल बाळगणाऱ्या इसमाला अटक |
खंडणीबहाद्दर १५ आरोपी जेरबंद |
राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचा 24 वा वर्धापन दिन जिल्हा राष्ट्रवादी कार्यालयात संपन्न |
आनेवाडी टोलनाक्यावर वारकऱ्यांची वाहने रोखली |
रंगकर्मींच्या समस्या सोडविण्यासाठी कटिबद्ध : अभिनेते प्रशांत दामले |
महाराष्ट्र प्रदेश राष्ट्रवादी टॅक्स प्रॅक्टिशनर्स सेलच्यावतीने वर्धापनदिनी पत्रकारांच्या कार्याचा गौरव |
पवारांनी धमकावणाऱ्यांना सुनावलं, 'मी धमकीची चिंता करीत नाही किंवा अशा धमक्यांना घाबरत नाही' |
ज्ञानेश्वर महाराज पालखी सोहळ्यामुळं वाहतुकीत बदल; 'या' पर्यायी मार्गांचा वापर करण्याचं आवाहन |
गणेश मंदिराच्या सभामंडपात अश्वांचा प्रवेश ; विश्वस्त, मंडळाच्या कार्यकर्त्यांतर्फे अश्वांचे पूजन |
नऊ ग्रामपंचायतींच्या इमारत बांधकामाची स्थगिती उठली |
तळबीड पोलिसांकडून 16 लाख 94 हजार रुपयांचा गुटखा जप्त; दोघांवर गुन्हा |
अनोळखी पुरुषाचा मृतदेह आढळला |

सैदापुरात घरफोडी; 65 हजारांचा ऐवज लंपास |
वावदरे येथून एकजण बेपत्ता |
मारहाण केल्याप्रकरणी सहा जणांविरुध्द गुन्हा |
मारहाण करुन दुखापत केल्याप्रकरणी पाच जणांवर गुन्हा |
राजवाडा परिसरात युवकावर कोयत्याने वार |