सातारा : सातारा पोलिस दलामध्ये ‘निर्भया पोलिस चौकी’ हा स्तुत्य उपक्रम बनला असून चौकीसह, पोलिस अधिकारी, कर्मचारी, 30 सीसीटीव्ही कॅमेरे यामुळे परिसरातील छेडछाडीला 100 टक्के आळा बसेल, असा विश्वास कोल्हापूर परिक्षेत्राचे विशेष पोलिस महानिरीक्षक (आयजी) विश्वास नांगरे-पाटील यांनी व्यक्त केला.
मंगळवारी दुपारी येथील यशवंतराव चव्हाण सायन्स इन्स्टिट्युट कॉलेजसमोरील निर्भया पोलिस चौकीचे त्यांच्या हस्ते उद्घाटन करण्यात आले. यावेळी पोलिस अधीक्षक पंकज देशमुख उपस्थित होते.
आयजी विश्वास नांगरे-पाटील म्हणाले, सातार्यात छत्रपती शिवाजी कॉलेज, वायसी, डीजी, बी.एड.कॉलेज व अण्णासाहेब कल्याणी विद्यालय असा विस्तीर्ण परिसर आहे. जवळपास 30 हजार मुले-मुले या परिसरात रोज येत-जात असतात. यापूर्वी गर्दीचा गैरफायदा घेवून अनेक हुल्लडबाज युवक युवतींची छेड काढत होते. याशिवाय बेदरकार दुचाकी, चारचाकी वाहनांची वर्दळ होती. या सर्व वातावरणातून युवतींना सुरक्षितता वाटावी यासाठी गेल्या तीन वर्षापासून विविध योजना राबवल्या गेल्या.
निर्भया पथक हा सुरुवातीचा टप्पा होता. महिला पोलिसांचा या परिसरात प्रेझेंन्स राहिल्याने हळहळू परिसर सुरक्षित झाला. आज या टप्प्यावर राज्यातील पहिली निर्भया पोलिस चौकीची स्थापना होणे ही मोठी बाब आहे. निर्भया पोलिस चौकीबरोरबच आता या परिसरात सुमारे 30 सीसीटीव्हीच्या कॅमेर्यांची नजर राहणार आहे. यापूर्वी पोलिसांकडे छुपे कॅमेरे होते. या सर्व पार्श्वभूमीवर सातार्यातील महाविद्यालयीन युवतींना सुरक्षित वातावरण मिळून 100 टक्के छेडछाडीला आळा बसेल, असा विश्वास आयजी विश्वास नांगरे-पाटील यांनी व्यक्त केला. निर्भया पोलिस चौकीचे उद्घाटन झाल्यानंतर त्यांनी युवकांशी हॉलमध्ये संवाद साधला.
महिलेचा विनयभंग केल्याप्रकरणी एकावर गुन्हा |
सराईत गुन्हेगाराने दिली तीन घरफोड्यांची कबुली |
उदयनराजे यांच्या समर्थनार्थ सातार्यात लोटला जनसागर |
शिक्षक हेच सुसंस्कृत समाजनिर्मितीचे जनक |
अजिंक्यतारा कारखान्यावर वादातून झाला गोळीबार |
जनता बँक साताराच्या तज्ज्ञ संचालकपदी सौरभ रायरीकर, राजेंद्र जाधव यांची निवड |
महिलेची गळफास घेवून आत्महत्या |
एकाच्या मृत्यूप्रकरणी कार चालकावर गुन्हा |
संशयित माल जवळ बाळगल्याप्रकरणी एकावर गुन्हा |
राहत्या घरातून युवती बेपत्ता |
वाई, जावळी परिसरात जोरदार अवकाळी पाऊस |
विरोधकांच्या रडीच्या डावाला जनता भुलणार नाही |
महायुतीचे आज सातार्यात जोरदार शक्ती प्रदर्शन |
सातारा जिल्ह्यात राम लल्लाच्या गजराने रामनवमी साजरी |
उदयनराजे यांच्या शक्तीप्रदर्शनासाठी आमदार शिवेंद्रसिंहराजे सज्ज |
जनता बँक साताराच्या तज्ज्ञ संचालकपदी सौरभ रायरीकर, राजेंद्र जाधव यांची निवड |
महिलेची गळफास घेवून आत्महत्या |
एकाच्या मृत्यूप्रकरणी कार चालकावर गुन्हा |
संशयित माल जवळ बाळगल्याप्रकरणी एकावर गुन्हा |
राहत्या घरातून युवती बेपत्ता |
वाई, जावळी परिसरात जोरदार अवकाळी पाऊस |
विरोधकांच्या रडीच्या डावाला जनता भुलणार नाही |
महायुतीचे आज सातार्यात जोरदार शक्ती प्रदर्शन |
सातारा जिल्ह्यात राम लल्लाच्या गजराने रामनवमी साजरी |
उदयनराजे यांच्या शक्तीप्रदर्शनासाठी आमदार शिवेंद्रसिंहराजे सज्ज |
सातारा जिल्ह्यात रामनवमी उत्साहात साजरी |
उष्माघातावरील उपचारासाठी सर्व शासकीय रुग्णालयांमध्ये कक्ष स्थापन |
आदर्श आचारसंहितेच्या काटेकोरपणे अंमलबजावणीस सर्वोच्च प्राधान्य : जिल्हाधिकारी डुडी |
श्रीराम नवमी निमित्त राम ध्यान मंदिरात अर्पित कथक नृत्यलयाचा कार्यक्रम |
निवृत्तीवेतनधारक/कुटुंबनिवृत्तीवेतन धारकांना आवाहन |