09:09pm | Apr 25, 2020 |
सातारा : लॉक डाऊनमुळे सातारा शहरातील ऐतिहासिक वास्तू म्हणून नावलौकिक प्राप्त झालेल्या सर्किट हाऊसची विविध पक्ष, संघटनांच्या कार्यकर्त्यांच्या जाचहाटातून चांगलीच सुटका झाली असल्याचे मानण्यात येते. गेल्या २५ दिवसात एकही पदाधिकारी सर्किट हाऊसकडे फिरकला नसल्यामुळे एरव्ही चार आण्याच्या कोंबडीसाठी बारा आण्याचा मसाला आणायला लागणाऱ्या कर्मचाऱ्यांनी मात्र निश्वास सोडला आहे.
सातारा येथील सदर बझार येथे ब्रिटिश कालीन ऐतिहासिक वास्तूची उभारणी करण्यात आली होती. ब्रिटिशांना विश्रांती करण्यासाठी या वास्तूची निर्मिती प्रामुख्याने करण्यात आली होती. कालांतराने सार्वजनिक बांधकाम विभागाच्या अखत्यारित या वास्तूला सर्किट हाऊसचा दर्जा देण्यात आला. विविध पक्षाचे केंद्रीय मंत्री, खासदार, मंत्री, आमदारांसाठी हे सर्किट हाऊस राखीव ठेवण्यात आले. त्यांच्या दिमतीसाठी खान साब आणि पुरेसा कर्मचारी वर्ग नेमण्यात आला.
गेल्या काही वर्षांमध्ये विविध राजकीय पक्षांच्या, संघटनेच्या पदाधिकाऱ्यांचा वावर मोठ्या प्रमाणावर वाढू लागला. पत्रकार परिषदा, बैठका, जेवणावळी झडू लागल्या. दिवसेंदिवस या प्रमाणात मोठ्या प्रमाणावर वाढ होऊ लागली. ऊठसूट कोणीही याठिकाणी येत विविध संघटनांची नावे सांगून पाव्हुणचार झोडू लागले. कर्मचाऱ्यांनी विरोध केलाच तर साहेब, बाबा, दादा, बापू अशा बड्या नेत्यांची नावे घेऊन, वेळप्रसंगी तेथील कर्मचाऱ्यांची बोळवण करण्यात येत होती. असे काही आपणच पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष असल्याचा आव आणत अनेक जण कर्मचाऱ्यांना सुट उघडून दे, पाणी आण, स्पेशल चहा पाठव असे फर्मान सोडू लागल्यामुळे तेथील कर्मचाऱ्यांना नोकरी कमी आणि लष्कराच्या भाकरी जास्त भाजाव्या लागत होत्या. तक्रार अथवा विरोध केल्यास आपली नोकरी जाईल या भीतीने तेथील कर्मचारी तोंड दाबून बुक्क्याचा मार सहन करत होते.
एखाद्या पक्षाच्या पदाधिकाऱ्यांनी सर्किट हाऊस येथे पत्रकार परिषद घेतल्यास तेथील कर्मचाऱ्यांना त्याबाबत माहिती नसायची हा सर्किट हाउसचा इतिहास आहे. उलटेच माध्यमांच्या प्रतिनिधींकडे आज कोणाची पत्रकार परिषद आहे, अशी विचारणा करण्याची वेळ त्यांच्यावर येत असे यावरूनच विविध पक्षाच्या पदाधिकाऱ्यांनी सर्किट हाऊसच्या अटी नियम व शर्ती कशा बासनात गुंडाळून ठेवल्या आहेत. हे पाहायला मिळत होते.
या सर्व घटना घडत असतानाच साताऱ्यात कोरोनाच्या पार्श्वभूमीवर संचारबंदी म्हणजेच लॉक डाऊन जाहीर करण्यात आला. सर्वच राजकीय पक्ष आणि विविध संघटनांच्या राजकीय उपक्रमांना आपोआपच खो बसला. खबरदारीचा उपाय म्हणून कार्यकर्त्यांनी सर्किट हाऊसकडे पाठ फिरवली. पत्रकार परिषदा, बैठका, मेळावे, दौरै यांना पूर्णविराम मिळाल्यामुळे लॉक डाऊन उठेपर्यंत का होईना कार्यकर्त्यांच्या जाच हाटातून सर्किटाऊसची मुक्तता झाली. चार आण्याच्या कोंबडीसाठी बारा आण्याचा मसाला आणण्यासाठी कर्मचाऱ्यांना करावी लागणारी पायपीट ही थांबल्यामुळे त्यांनी निश्वास सोडला आहे.
महाराष्ट्र अंधश्रद्धा निर्मूलन समितीचे राज्यस्तरीय पुरस्कार जाहीर |
सातारा जिल्ह्याच्या पश्चिम भागात पावसाचा जोर |
प्रकल्पग्रस्तांच्या जमिनीसाठी रमेश उबाळे यांचे जिल्हाधिकारी कार्यालयासमोर उपोषण |
केंद्रीय गृहमंत्री अजयकुमार मिश्रा उद्या सातारा जिल्हा दौऱ्यावर |
साताऱ्यात ८ रोजी काँग्रेस अल्पसंख्याक विभागाचा मेळावा |
शबरी आदिवासी वित्त व विकास महामंडळाकडे व्यवसाय सुरु करण्यासाठी |
माहिती अधिकार दिन 27 सप्टेंबर रोजी होणार साजरा |
शेडनेट, हरितगृहासाठी शेतकऱ्यांनी अर्ज करावेत |
चार मतदान केंद्र पुनर्गठित करण्याचा प्रस्ताव जिल्हाधिकाऱ्यांकडे सादर |
व्हेल माशाच्या उलटी तस्करी प्रकरणी |
खेकड्यांच्या स्थलांतरावर होणार संशोधन! |
अँटीकरप्शनच्या उज्वल वैद्य यांची मुंबईला बदली |
एकावर पोक्सोंतर्गत गुन्हा |
जबरी चोरीसह खंडणी प्रकरणी दोघांवर गुन्हा |
अपघातासह गाडीचे नुकसान केल्याप्रकरणी रिक्षा चालकावर गुन्हा |
शबरी आदिवासी वित्त व विकास महामंडळाकडे व्यवसाय सुरु करण्यासाठी |
माहिती अधिकार दिन 27 सप्टेंबर रोजी होणार साजरा |
शेडनेट, हरितगृहासाठी शेतकऱ्यांनी अर्ज करावेत |
चार मतदान केंद्र पुनर्गठित करण्याचा प्रस्ताव जिल्हाधिकाऱ्यांकडे सादर |
व्हेल माशाच्या उलटी तस्करी प्रकरणी |
खेकड्यांच्या स्थलांतरावर होणार संशोधन! |
अँटीकरप्शनच्या उज्वल वैद्य यांची मुंबईला बदली |
एकावर पोक्सोंतर्गत गुन्हा |
जबरी चोरीसह खंडणी प्रकरणी दोघांवर गुन्हा |
अपघातासह गाडीचे नुकसान केल्याप्रकरणी रिक्षा चालकावर गुन्हा |
अल्पवयीन मुलीची गळफास घेऊन आत्महत्या |
मोटर सायकल वरून पडून एकाचा मृत्यू |
सातारा शहरातील 61 जणांवर तडीपारीची कारवाई |
इलेक्ट्रिक मोटार चोरणारी टोळी सातारा जिल्ह्यातून तडीपार |
नमस्कार सातारकर, हे आहे हिंदवी 89.6... |