04:37pm | Mar 05, 2019 |
कराड : कामगारांमध्ये त्यांच्यासाठी असलेल्या योजना, उपक्रम व माहिती याबाबत जागृती करण्यासाठी महाराष्ट्र कामगार कल्याण मंडळाने आयोजित केलेला मेळाव्याचा उपक्रम स्तुत्य असून याचा लाभ घेवून कामगारांनी आपले भविष्य उज्ज्वल बनवावे, असे उद्गार अर्बन कुटुंबप्रमुख सुभाषराव जोशी यांनी काढले.
कराड येथील कराड अर्बन बँकेच्या शताब्दी सभागृहात महाराष्ट्र कामगार कल्याण मंडळ (गट कार्यालय, कोल्हापूर) यांच्या वतीने आयोजित कृतिशिल कामगार व आस्थापना प्रतिनिधींचा सन्मान सोहळा व कामगार प्रबोधन मेळाव्याच्या उद्घाटनप्रसंगी ते बोलत होते. यावेळी कराड अर्बन बँकेचे अध्यक्ष डॉ. सुभाष एरम, उपाध्यक्ष समीर जोशी, कराड मॅन्युफॅक्चरर्स असोसिएशनचे अध्यक्ष जितेंद्र जाधव, मुख्य कार्यकारी अधिकारी सीए. दिलीप गुरव, कामगार कल्याण अधिकारी विजय शिंगाडे, कराड अर्बन बँकेच्या प्रशासन विभागाचे उप महाव्यवस्थापक महेश वेल्हाळ, ट्रेझरी विभागाचे उप महाव्यवस्थापक सलीम शेख, कराड बार असोसिएशनचे माजी अध्यक्ष ऍड. भीमराव शिंदे यांच्यासह राज्यातील विविध ठिकाणाहून कामगार, त्यांचे कुटुंबीय, कामगार संघटनेचे नेते, आस्थापना प्रतिनिधी, प्रतिष्ठित नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.
सुभाषराव जोशी पुढे म्हणाले, कामगार नेते नारायण मेघाजी लोखंडे यांच्या दूरदृष्टीमुळे आज कामगारांना योग्य तो न्याय मिळत आहे. शासनाने कामगारांसाठी व त्यांच्या कुटुंबियांसाठी विविध कल्याणकारी योजना सुरु केल्या आहेत. या योजना लाभाथ्र्यांपर्यंत पोहोचणे गरजेचे आहे. कराड अर्बन बँक नेहमीच अशा स्वरुपाच्या सामाजिक कार्यात पुढाकार घेत असते. प्रारंभी कामगार नेते नारायण मेघाजी लोखंडे यांच्या प्रतिमेस पुष्पहार घालून पूजन करण्यात आले. यावेळी महाराष्ट्र कामगार कल्याण मंडळाच्या वतीने प्रकाशित करण्यात आलेल्या मुखपत्राचे मान्यवरांच्या हस्ते प्रकाशन करण्यात आले. तसेच या मेळाव्यामध्ये कुर्डूवाडी (जि. सोलापूर) येथील डॉ. जयंत करंदीकर यांचे ’सुखी जीवनाची गुरुगिल्ली’ या विषयावर व्याख्यान झाले. यातून त्यांनी कामगारांचे प्रबोधन केले. याप्रसंगी मान्यवरांच्या हस्ते कृतिशिल कामगार व आस्थापना प्रतिनिधींचा सत्कार करण्यात आला. प्रारंभी कामगार कल्याण अधिकारी विजय शिंगाडे यांनी प्रास्ताविक व स्वागत केले. कराड, सातारा परिसरात कामगारांची संख्या जास्त आहे. त्यांच्यापर्यंत शासकीय योजनांची माहिती व उपक्रम पोहोचावेत यासाठी या मेळाव्याचे आयोजन केले असल्याचे त्यांनी सांगितले. या मेळाव्यामध्ये कामगार कल्याण मंडळाचे कोल्हापूर येथील केंद्र संचालक संघसेन जगतकर यांनी पॉवर पॉईट प्रेझेंटेशनच्या सादरीकणातून कामगार कल्याणच्या विविध योजनांची माहिती दिली.
हा कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी सागरमाळ, कोल्हापूर येथील वेंैद्र संचालक चंद्रकांत घारगे, इस्लामपूर येथील केंद्र संचालक सचिन खराडे, पुैलेवाडी, कोल्हापूर येथील वेंैद्र संचालक दीपक गावराखे, वेंैद्र सेवक विजय खराडे, दीपक मोरे, अभिजित भोई, अर्चना माळी यांनी प्रयत्न केले. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन कल्याण निरीक्षक राजेंद्र निकम यांनी केले. कार्यक्रमाचे संयोजक कामगार कल्याण विभागाचे कराड येथील वेंैद्र संचालक संदीप कांबळे यांनी आभार मानले.
साताऱ्यात मेघगर्जनेसह बरसल्या पावसाच्या सरी |
जनता बँकेत पुर्नगठीत बोर्ड ऑफ मॅनेजमेंटच्या चेअरमनपदी विनोद कुलकर्णी |
बोंडारवाडीसह धरणांची कामे मार्गी लावणार उदयनराजेंचे आश्वासन |
दलित महासंघ,पॅंथरचा उदयनराजेंना जाहीर पाठींबा |
सातारकरांना बाहेरच्यांनी स्वाभिमान शिकवू नये |
साताऱ्यात कोट्यावधीची कामे हीच आपली जमेची बाजू |
जुगार प्रकरणी एकावर कारवाई |
नोकरीच्या अमिषाने सुमारे पावणे सहा लाखांची फसवणूक |
शहरातील दोन वेगवेगळ्या घटनांमध्ये दोनजण बेपत्ता |
विवाहितेला आत्महत्येस प्रवृत्त केल्याप्रकरणी पती विरुध्द गुन्हा |
शाहूनगर येथे घरफोडी |
पंतप्रधान मोदी यांची सभा म्हणजे उदयनराजे यांच्या विजयाची नांदी |
वाट कशाची पाहता? कामाला लागा |
साताऱ्यात आरटीई प्रवेशासाठी पालकांचा कमी प्रतिसाद |
अफवांवर नाही, हवामान खात्यावर विश्वास ठेवा : हवामान खात्याचे प्रमुख सुनील कांबळे |
साताऱ्यात कोट्यावधीची कामे हीच आपली जमेची बाजू |
जुगार प्रकरणी एकावर कारवाई |
नोकरीच्या अमिषाने सुमारे पावणे सहा लाखांची फसवणूक |
शहरातील दोन वेगवेगळ्या घटनांमध्ये दोनजण बेपत्ता |
विवाहितेला आत्महत्येस प्रवृत्त केल्याप्रकरणी पती विरुध्द गुन्हा |
शाहूनगर येथे घरफोडी |
पंतप्रधान मोदी यांची सभा म्हणजे उदयनराजे यांच्या विजयाची नांदी |
वाट कशाची पाहता? कामाला लागा |
साताऱ्यात आरटीई प्रवेशासाठी पालकांचा कमी प्रतिसाद |
अफवांवर नाही, हवामान खात्यावर विश्वास ठेवा : हवामान खात्याचे प्रमुख सुनील कांबळे |
घोटाळेबाजांशी कायम लढत राहणार उदयनराजे गरजले |
साताऱ्यातील सुप्रसिद्ध डॉ. रविंद्र हर्षे यांचे दुःखद निधन |
भाजप देशाचे भविष्य तर काँग्रेस भूतकाळ उदयनराजे भोसले यांचा टोला |
कृष्णाबाई यात्रा महोत्सवाचा पालखी मिरवणुकीने शुभारंभ |
गंभीर गुन्हे करणार्या चौघांच्या टोळीला तडीपारीचा दणका |