- अजित जगताप
सातारा : कोरोना विषाणू संसर्ग रोखण्यासाठी आरोग्य विभाग, पोलीस, जिल्हा प्रशासन आटोकाट प्रयत्न करीत आहे. सुमारे शंभरजणांच्या कोरोना संसर्ग तपासणी रिपोर्ट निगेटिव्ह आले आहेत. तर 3 रुग्ण कोरोना बाधित आढळले आहेत. ‘कोरोना हटाव, सातारा बचाव’ यासाठी आता पीपीआय किट आरोग्य विभागाकडे दाखल झाले आहे. आज दुपारी सातारचे जिल्हाधिकारी शेखर सिंह यांनी शासकीय विश्रामगृह येथे जिल्हा परिषदेचे अतिरिक्त सीईओ व आरोग्य अधिकारी यांच्याकडून या किटबाबत माहिती घेतली.
याबाबत माहिती अशी की, सातारा जिल्ह्यामध्ये आतापर्यंत दिनांक 3.4.2020 रोजी सायं. 5 वाजताची सातारा जिल्हा करोना 19 (कोव्हिड 19) ची आकडेवारी अशी - एकूण दाखल - 166, जिल्हा शासकीय रुग्णालयात - 79, कृष्णा हॉस्पीटल कराड मध्ये - 86, खाजगी हॉस्पीटलमध्ये - 1, कोरोना नमुने घेतलेले - 166, कोरोना बाधित अहवाल - 3, कोरोना अबाधित अहवाल - 105, अहवाल प्रलंबित - 58, डिस्चार्ज दिलेले - 105, सद्यस्थितीत दाखल - 61, आलेली प्रवाशी संख्या (दिनांक 2.4.2020) - 578, होम क्वारान्टीनमध्ये असलेल्या व्यक्ती - 578, होम क्वारान्टीन पैकी 14 दिवस पूर्ण झालेल्या व्यक्ती - 422, होम क्वारान्टीन पैकी 14 दिवस पूर्ण न झालेल्या व्यक्ती - 156, संस्थेमध्ये अलगीकरण केलेले - 55, यापैकी डिस्जार्ज केलेले - 19, यापैकी शासकीय रुग्णालय जनरल वार्डात - 1, अद्याप दाखल - 35 अशी संख्या आहे. त्यामुळे कोरोना नियंत्रणात असला तरी लोकांनी अनावश्यकपणे घरातून बाहेर पडणे टाळले पाहिजे यासाठी पोलीस यंत्रणा रस्त्यावर उतरली आहे. त्यांचेसुद्धा कुटूंब आहे. तरीही हे पोलीस बांधव कर्तव्य बजावत आहेत. त्याचबरोबर आरोग्य विभाग, पुरवठा विभाग, प्रसारमाध्यमे जागरुकतेने काम करीत आहेत.
सातारा जिल्हा हा भौगोलिकदृष्ट्या असमतल आहे. अशावेळी कोरोना विरोधातील युद्ध जिंकण्यासाठी प्रत्यक्ष फिल्डवर असणार्या आरोग्य विभागाला सर्वाधिक काळजी घेणे अपरिहार्य आहे. सातारा जिल्ह्यासाठी एन 95 मास्क -20 हजार, पीपीआय किट - दीड हजार व ट्रिपल मास्क 1 लाख आणि सॅनिटायझरच्या 4 हजार बाटल्या असे कोरोना विषाणू संसर्गामध्ये आरोग्यासाठी आवश्यक असणारे साहित्य प्राप्त झाले आहे. सातारा जिल्हा परिषदेचे अतिरिक्त मुख्य कार्यकारी अधिकारी संतोष धोत्रे, जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. अनिरुद्ध आठल्ये, जिल्हा ग्रामीण आरोग्य यंत्रणेचे अधिकारी विजय गायकवाड, औषध निर्माण अधिकारी शहाजी गुजर यांनी त्याचे जिल्हाभर वितरण सुरु केले असून याबाबत जिल्हाधिकारी शेखर सिंह यांचे मार्गदर्शन घेतले आहे. कोरोना संसर्गाला आटोक्यात आणण्यासाठी सर्व यंत्रणा सज्ज झाली असून लोकांमध्येही सध्या नियम पाळण्याची मानसिकता निर्माण झाली आहे. त्यामुळे सुमारे 70 टक्के रस्त्यावरील अनावश्यक गर्दी कमी झाली असल्याचे दिसत आहे.
शाहूपुरी पोलिस ठाण्याच्या हद्दीत आढळला अनोळखी पुरुषाचा मृतदेह |
सातारा शहरातून दोनजणी बेपत्ता |
डॉ आंबेडकर जयंती समारोह अध्यक्षपदी संजय गाडे यांची निवड |
शरद पवारांच्या डावपेचाकडे महाराष्ट्राचे लक्ष |
कराडला रविवारी इंडिया आघाडीचा मेळावा |
पश्चिम महाराष्ट्रात दि. २९ ते ३१ पर्यंत महावितरणचे वीजबिल भरणा केंद्र सुरू |
करंजे पेठतील थकबाकीदाराची पालिकेकडून मालमत्ता केली सील |
साताऱ्यात लोकसभेबाबत शुक्रवारी शरद पवारांची बैठक |
जमिनीच्या वादातून धारदार शस्त्राने एकाचा खून |
लोकसभा सार्वत्रिक निवडणूक-2024 |
कोल्हापूरला निघालेली खासगी ट्रॅव्हल्स झाली पलटी |
पुण्यातील पीएमटीच्या बसचालकाची सोनगाव येथे आत्महत्या |
झाड मारल्याप्रकरणी सातार्यात दोन गुन्हे दाखल |
अदानी ग्रुपचा वीज प्रकल्प रद्द करण्याठी प्रकल्पग्रस्त जिल्हाधिकारी कार्यालयावर काढणार मोर्चा |
प्रतापसिंह नगरात अतिक्रमणांसह लल्लन आणि युवराजच्या दहशतीवर जिल्हा प्रशासनाचा बुलडोझर |
पश्चिम महाराष्ट्रात दि. २९ ते ३१ पर्यंत महावितरणचे वीजबिल भरणा केंद्र सुरू |
करंजे पेठतील थकबाकीदाराची पालिकेकडून मालमत्ता केली सील |
साताऱ्यात लोकसभेबाबत शुक्रवारी शरद पवारांची बैठक |
जमिनीच्या वादातून धारदार शस्त्राने एकाचा खून |
लोकसभा सार्वत्रिक निवडणूक-2024 |
कोल्हापूरला निघालेली खासगी ट्रॅव्हल्स झाली पलटी |
पुण्यातील पीएमटीच्या बसचालकाची सोनगाव येथे आत्महत्या |
झाड मारल्याप्रकरणी सातार्यात दोन गुन्हे दाखल |
अदानी ग्रुपचा वीज प्रकल्प रद्द करण्याठी प्रकल्पग्रस्त जिल्हाधिकारी कार्यालयावर काढणार मोर्चा |
प्रतापसिंह नगरात अतिक्रमणांसह लल्लन आणि युवराजच्या दहशतीवर जिल्हा प्रशासनाचा बुलडोझर |
पाच नॅशनल पुरस्कार मिळवून श्लोक घोरपडे कोल्हापूर येथील स्पर्धेत मारणार बाजी |
'आयडियल' मतदारसंघाचे 'आयडॉल' आमदार |
आचारसंहिता काळात लोकशाही दिनाचे आयोजन होणार नाही : नागेश पाटील |
पोक्सोंतर्गत एकावर गुन्हा |
कुऱ्हाडीने वार केल्या प्रकरणी एकावर गुन्हा |