कराड : कोल्हापूर नाक्यावर भीषण अपघातात नऊ वर्षाच्या सोनाक्षी शेटे या शालेय विद्यार्थिनीचा मृत्यू झाल्यानंतर उड्डाणपुलाच्या मागणीसाठी सर्वसामान्य नागरिक आक्रमक झाले आहेत. सोनाक्षीचा हकनाक बळी गेल्याने कराड, मलकापूरसह तालुक्यातील शंभरावर शाळांच्या विद्यार्थी.विद्यार्थिनींनी उड्डाणपुल झालाच पाहिजे अशी मागणी लावून धरली आहे. उड्डाण पूल कृती समितीच्या लढयाला पाठबळ देण्यासाठी 23 नोव्हें. रोजी सर्वच शाळांमध्ये उड्डाण पुलासाठी आणि सोनाक्षी शेटेला श्रध्दांजली वाहण्यासाठी सामूहिक प्रार्थनेचे आयोजन करण्यात आले आहे.
कोल्हापूर नाक्यावर कोल्हापूर ते पुणे लेनवर उड्डाण पूल नसल्याने कराड शहरात येणार्या वाहनधारकांना भीषण अपघाताचा सामना करावा लागत आहे. कोल्हापूर नाक्यावर होणारी वाहतूक कोंडी हा अत्यंत संवेदनशील प्रश्न बनला आहे. यावर कायमचा उपाय म्हणून कोल्हापूर पुणे लेनवर उड्डाणपुलाचा प्रस्ताव सहापदरीकरणात मंजूर आहे. मात्र त्याचे काम सुरु नाही. गत आठवडयात सोनाक्षी शेटे या चिमुकल्या मुलीचा कोल्हापूर नाक्यावर अपघातात मृत्यू झाला. भविष्यातही असे अपघात होण्याची भीती आहे. कराड ग्रामीण भाग आणि मलकापूरधून लाखो वाहनधारकांसह लाखो शालेय विद्यार्थी.विद्यार्थिनी कोल्हापूर नाक्यावरुन प्रवास करत असतात. कोल्हापूर नाक्यावर उड्डाणपूल झालाच पाहिजे या मागणीसाठी सर्वपक्षीय कृती समिती स्थापन करण्यात आली आहे.
कृती समितीच्या माध्यमातून बुधवारी प्रशासक व पोलीस अधिकारी यांची बैठक होणार आहे. दरम्यान, उड्डाण पुलासाठीच्या सनदशीर आंदोलनात आता शालेय विद्यार्थी-विद्यार्थिनींनीही सहभाग घेतला आहे. शनिवारी 23 नोव्हें रोजी कराड, मलकापूरसह तालुक्यात सर्वच शाळांमध्ये उड्डाणपुलाच्या मागणीसाठी आणि सोनाक्षी शेटे हिला श्रध्दांजली वाहण्यासाठी प्रार्थना होणार आहे. यामुळे उड्डाणपुलाच्या आंदोलनाच्या मागणीला आणखी बळ मिळाले आहे.
कोल्हापूरला निघालेली खासगी ट्रॅव्हल्स झाली पलटी |
पुण्यातील पीएमटीच्या बसचालकाची सोनगाव येथे आत्महत्या |
झाड मारल्याप्रकरणी सातार्यात दोन गुन्हे दाखल |
अदानी ग्रुपचा वीज प्रकल्प रद्द करण्याठी प्रकल्पग्रस्त जिल्हाधिकारी कार्यालयावर काढणार मोर्चा |
प्रतापसिंह नगरात अतिक्रमणांसह लल्लन आणि युवराजच्या दहशतीवर जिल्हा प्रशासनाचा बुलडोझर |
पाच नॅशनल पुरस्कार मिळवून श्लोक घोरपडे कोल्हापूर येथील स्पर्धेत मारणार बाजी |
'आयडियल' मतदारसंघाचे 'आयडॉल' आमदार |
आचारसंहिता काळात लोकशाही दिनाचे आयोजन होणार नाही : नागेश पाटील |
पोक्सोंतर्गत एकावर गुन्हा |
कुऱ्हाडीने वार केल्या प्रकरणी एकावर गुन्हा |
अवैधरित्या दारू विक्री प्रकरणी एकावर कारवाई |
अंमली पदार्थाचे सेवन केल्याप्रकरणी एकावर गुन्हा |
राहत्या घरातून युवक बेपत्ता |
वडूज येथे बांधकाम विभागाचा अभियंता लाचलुचपतच्या जाळ्यात |
मल्हारपेठेत शाहूपुरी पोलिसांनी पकडला पावणेदोन लाखाचा गुटखा |
पाच नॅशनल पुरस्कार मिळवून श्लोक घोरपडे कोल्हापूर येथील स्पर्धेत मारणार बाजी |
'आयडियल' मतदारसंघाचे 'आयडॉल' आमदार |
आचारसंहिता काळात लोकशाही दिनाचे आयोजन होणार नाही : नागेश पाटील |
पोक्सोंतर्गत एकावर गुन्हा |
कुऱ्हाडीने वार केल्या प्रकरणी एकावर गुन्हा |
अवैधरित्या दारू विक्री प्रकरणी एकावर कारवाई |
अंमली पदार्थाचे सेवन केल्याप्रकरणी एकावर गुन्हा |
राहत्या घरातून युवक बेपत्ता |
वडूज येथे बांधकाम विभागाचा अभियंता लाचलुचपतच्या जाळ्यात |
मल्हारपेठेत शाहूपुरी पोलिसांनी पकडला पावणेदोन लाखाचा गुटखा |
आज जिल्ह्यात उदयनराजेंची होणार ग्रँड एन्ट्री |
सातारा लोकसभेवर अजितदादांच्या राष्ट्रवादीचा दावा कायम |
पाटखळ येथील नूतन तलाठी कार्यालयाचे अतिक्रमण |
मेक इन इंडिया पॉलिसीमुळे ‘मॅक्सिको’ होण्याची भीती? |
चक्क अप्पर जिल्हाधिकारी निवासस्थाना बाहेरचे झाड जाळण्याचा प्रयत्न |