सातारा : कोरेगाव तालुक्यातील वाठार स्टेशन येथील तीन अल्पवयीन मुलांना विहिरीवरील पंपाच्या इलेक्टिक केबल चोरी प्रकरणी आज सापळा रचून वाठार स्टेशन पोलिसांनी अटक केली.त्यांची ओळख झाली आहे. त्यांना चोरी करण्यासाठी कोणी प्रवृत्त केले याचा शोध घेतला जात आहे.
याबाबत अधिक माहिती अशी की, गेले कित्येक दिवस वाठार स्टेशन परिसरात शेतकऱ्यांच्या विहिरीवरील पंपाच्या केबल चोरीचे प्रमाण दिवसेंदिवस वाढत चालले होते अनेक शेतकरी या केबल चोरीमुळे हैराण झाल्याचे चित्र वाठार स्टेशन पंचक्रोशीमध्ये पहावयास मिळत होते. अशीच विहिरीवरील पंपाची केबल चोरीची तक्रार येथीलच भरत बबन अहिरेकर यांनी वाठार पोलीस ठाण्यात दिली होती. त्याअनुषंगाने वाठार पोलीस ठाण्याचे कर्मचारी तपास करत असताना त्यांना येथीलच एका भटक्या जमाती वस्ती मधील तीन मुले या केबल चोरीमध्ये असल्याची माहिती मिळाली लगेचच स.पो.नि.मारुती खेडकर यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस कर्मचारी ज्ञानदेव चोरट, विठ्ठल पवार, श्रीकांत खरात, सचिन जगताप, तुषार आडके यांनी सापळा रचून या तीन अल्पवयीन मुलांना अटक केली या केबल चोरी प्रकरणी त्यांच्याकडे तपास केला असता त्यांनी चोरी केल्याचे कबूल केले व या मुलांकडून ३५०० रुपयांची विहिरीवरील पंपाची इलेक्टिक केबल हस्तगत करण्यात आली. सदर मुलांकडून अजून कोणकोणत्या ठिकाणी चोरी करण्यात आली आहे ?याबाबत वाठार पोलीस कसून चौकशी करत आहेत.सध्या अल्पवयीन गुन्हगारांची संख्या वाढली असून त्यामागे काही ठिकाणी भंगार व्यवसायिकांचा हात असल्याची चर्चा सुरू झाली आहे. त्यादृष्टीने पोलिसांनी तपासणी करावी लागेल अशी अपेक्षा व्यक्त होत आहे.
संशयित माल जवळ बाळगल्याप्रकरणी एकावर गुन्हा |
राहत्या घरातून युवती बेपत्ता |
वाई, जावळी परिसरात जोरदार अवकाळी पाऊस |
विरोधकांच्या रडीच्या डावाला जनता भुलणार नाही |
महायुतीचे आज सातार्यात जोरदार शक्ती प्रदर्शन |
सातारा जिल्ह्यात राम लल्लाच्या गजराने रामनवमी साजरी |
उदयनराजे यांच्या शक्तीप्रदर्शनासाठी आमदार शिवेंद्रसिंहराजे सज्ज |
सातारा जिल्ह्यात रामनवमी उत्साहात साजरी |
उष्माघातावरील उपचारासाठी सर्व शासकीय रुग्णालयांमध्ये कक्ष स्थापन |
आदर्श आचारसंहितेच्या काटेकोरपणे अंमलबजावणीस सर्वोच्च प्राधान्य : जिल्हाधिकारी डुडी |
श्रीराम नवमी निमित्त राम ध्यान मंदिरात अर्पित कथक नृत्यलयाचा कार्यक्रम |
निवृत्तीवेतनधारक/कुटुंबनिवृत्तीवेतन धारकांना आवाहन |
विविध मोबाईल अॅपच्या माध्यमातून मतदारांना सोई- सुविधा |
45- सातारा लोकसभेसाठी 6 नामनिर्देशनपत्र दाखल |
जिल्हाधिकारी कार्यालयाबाहेरुन सव्वादोन तोळ्याच्या चैनची चोरी |

महिलेला मारहाण केल्याप्रकरणी एकावर गुन्हा |
बॉम्बे रेस्टॉरंट परिसरात आढळला बेवारस मृतदेह |
लोखंडी रॉडने मारहाण केल्याप्रकरणी तिघांवर गुन्हा |
भाजप कार्यालयात उदयनराजे यांचे स्वागत |
माझ्यावरील आरोप हा राजकीय षडयंत्राचा भाग |