कराड : भारतीय जनता पार्टी, शिवसेना, राष्ट्रीय समाज पक्ष, रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया (आठवले गट), शिवसंग्राम आणि रयत क्रांती संघटना महायुतीचे कराड दक्षिण विधानसभा मतदारसंघाचे उमेदवार डॉ. अतुलबाबा भोसले यांच्या प्रचार दौर्याला उंडाळे भागात मतदारांचा भरघोस प्रतिसाद लाभला. गेल्या पाच वर्षांत केंद्रामध्ये व राज्यांमध्ये भाजप सरकारच्या माध्यमातून विविध विकास योजना मतदारसंघात राबविल्या जात आहेत. विकासकाम हेच राजकारण, असे सूत्र बाळगून मी कराड दक्षिणचा सर्वांगीण विकास साधण्यासाठी कटीबद्ध आहे, असे प्रतिपादन डॉ. अतुलबाबा भोसले यांनी यावेळी केले.
उंडाळे भागातील शिंदेवाडी, घारेवाडी, पोतले, किरपे आणि धोंडेवाडी या परिसरात प्रचार दौर्याच्या निमित्ताने भाजपा महायुतीचे उमेदवार डॉ. अतुलबाबा भोसले यांनी मतदारांशी संवाद साधला. गावागावात भाजपा सरकारच्या माध्यमातून विकासगंगा पोहचल्याने मतदारांनी अतुलबाबांचे जोरदार स्वागत केले. ठिकठिकाणी बैठकांच्या माध्यमातून अतुलबाबांनी जनतेशी संवाद साधताना कराड दक्षिणच्या प्रगतीसाठी भाजपाला पाठबळ देण्याचे आवाहन केले.
अतुलबाबा भोसले म्हणाले, गेल्या पाच वर्षांत केलेल्या विकासकामांच्या जोरावर मतदारसंघातील विविध प्रश्न मार्गी लावले. पूर परिस्थितीत पोतले गावावर आलेल्या संकटात कृष्णा उद्योग समूह गावाच्या पाठीशी राहिला आहे. पुराचा सामना करण्यासाठी नदीकाठच्या गावांना पूरसंरक्षण भिंत बांधणे आवश्यक होते. त्यादृष्टीने कराड दक्षिणमधील 6 गावांना पूरसंरक्षण भिंत उभारण्याबाबत भाजप सरकारने भरघोस निधी उपलब्ध केला आहे. विकासाभिमुख कार्याला प्राधान्य देणार्या भाजप सरकारने लोकांना नागरी सुविधा देण्यावर भर दिला आहे. प्रत्येक गावामध्ये रस्ते, पाणी योजना, ड्रेनेज व्यवस्था, समाज मंदिर उभारणी व पथदिवे उभारणी यासारख्या सुविधांवर भर दिल्याने, लोकांच्यामध्ये हे सरकार आपलं सरकार असल्याची भावना निर्माण झाली आहे. यावेळी विविध गावांतील मतदारांनी अतुलबाबांना जाहीर पाठिंबा व्यक्त करत विकासासाठी भाजपाला मतदान करण्याचा निर्धार व्यक्त केला.
पंतप्रधान मोदी यांची सभा म्हणजे उदयनराजे यांच्या विजयाची नांदी |
वाट कशाची पाहता? कामाला लागा |
साताऱ्यात आरटीई प्रवेशासाठी पालकांचा कमी प्रतिसाद |
अफवांवर नाही, हवामान खात्यावर विश्वास ठेवा : हवामान खात्याचे प्रमुख सुनील कांबळे |
घोटाळेबाजांशी कायम लढत राहणार उदयनराजे गरजले |
साताऱ्यातील सुप्रसिद्ध डॉ. रविंद्र हर्षे यांचे दुःखद निधन |
भाजप देशाचे भविष्य तर काँग्रेस भूतकाळ उदयनराजे भोसले यांचा टोला |
कृष्णाबाई यात्रा महोत्सवाचा पालखी मिरवणुकीने शुभारंभ |
गंभीर गुन्हे करणार्या चौघांच्या टोळीला तडीपारीचा दणका |
बेकायदा दारु विक्रीप्रकरणी एकावर कारवाई |
आदेशाचे उल्लंघन केल्याप्रकरणी पाचजणांवर गुन्हा |
अपघातात जखमी केल्याप्रकरणी दुचाकी चालकावर गुन्हा |
वेगवेगळ्या घटनांमध्ये दोनजणी बेपत्ता |
सातारा शहरातील लल्लन टोळीवर मोक्का कारवाई |
कृष्णा खोरे महामंडळामुळे दुष्काळी भागात पाणी : उदयनराजे भोसले |
साताऱ्यातील सुप्रसिद्ध डॉ. रविंद्र हर्षे यांचे दुःखद निधन |
भाजप देशाचे भविष्य तर काँग्रेस भूतकाळ उदयनराजे भोसले यांचा टोला |
कृष्णाबाई यात्रा महोत्सवाचा पालखी मिरवणुकीने शुभारंभ |
गंभीर गुन्हे करणार्या चौघांच्या टोळीला तडीपारीचा दणका |
बेकायदा दारु विक्रीप्रकरणी एकावर कारवाई |
आदेशाचे उल्लंघन केल्याप्रकरणी पाचजणांवर गुन्हा |
अपघातात जखमी केल्याप्रकरणी दुचाकी चालकावर गुन्हा |
वेगवेगळ्या घटनांमध्ये दोनजणी बेपत्ता |
सातारा शहरातील लल्लन टोळीवर मोक्का कारवाई |
कृष्णा खोरे महामंडळामुळे दुष्काळी भागात पाणी : उदयनराजे भोसले |
लोकसभा निवडणुकीच्या मतदानाची वेळ वाढवून मिळावी |
सूर्योदयाच्या मुहूर्तावर हनुमान जन्मोत्सव साजरा |
सणबूरच्या यात्रेत कुस्तीच्या फडात आग्या मोहोळाचा हल्ला |
उदयनराजेंच्या पत्नी दमयंतीराजेंचा काँग्रेसवर गंभीर आरोप |
वाई, जावळी तालुक्यात अवकाळी पाऊस |