03:01am | Oct 08, 2019 |
सातारा : भाजप सरकारने गेल्या पाच वर्षांमध्ये जनतेच्या हिताचे अनेक निर्णय घेवून विकास म्हणजे काय हे दाखवून दिले आहे. त्यामुळेच देशात पुन्हा नरेंद्र मोदींचे सरकार आले असून राज्यातही पुन्हा भारतीय जनता पार्टीचेच सरकार येणार आहे. देश आणि राज्याप्रमाणे आपल्या सातार्याचाही विकास गतीने झाला पाहिजे. या उद्देशानेच दोन्ही राजेंनी भाजपमध्ये प्रवेश केला आहे. आजवर कितीतरी लोकांनी पक्ष बदलले आहेत. मात्र दोन्ही राजांनी पक्षबदल केला म्हणून विरोधकांचा आकांडतांडव सुरु आहे. आपले नाणे खणखणीतच आहे आणि या नाण्याचा आवाज गल्लीपासून दिल्लीपर्यंत पोहतो आणि सगळं हादरवून सोडतो. राजांनी पक्ष सोडला म्हणून विरोधकांच्या पायाखालची वाळू सरकली आहे. मतदारसंघाचा विकास हेच ध्येय दोन्ही राजांनी ठेवले असून या ध्येयपुर्तीसाठी दोघांनाही मताधिक्याकडे विजयी करा, असे आवाहन श्रीमंत छ. सौ. वेदांतिकाराजे भोसले यांनी केले.
करंजे येथील मेहेर देशमुख कॉलनी येथे भारतीय जनता पार्टी, शिवसेना व मित्रपक्ष महायुतीचे सातारा लोकसभा पोटनिवडणूकीचे अधिकृत उमेदवार श्रीमंत छ. उदयनराजे भोसले आणि सातारा- जावली विधानसभा मतदारसंघाचे अधिकृत उमेदवार श्रीमंत छ. शिवेंद्रसिंहराजे भोसले यांच्या प्रचारार्थ आयोजिक कोपरा सभेत सौ. वेदांतिकाराजे बोलत होत्या. यावेळी नगराध्यक्ष सौ. माधवी कदम, नगरसेवक अशोक मोने, निशांत पाटील, श्रीकांत आंबेकर, मनोज शेंडे, राजू भोसले, स्मिता घोडके, ज्ञानेश्वर ङ्गरांदे, विजय काटवटे, माजी नगराध्यक्षा सौ. वैशाली महामुनी, नासीर शेख, प्रकाश बडेकर, जेष्ठ नेते शंकरकाका किर्दत, अतुल चव्हाण, राम हादगे, प्रताप महामुने, बाळासाहेब भुजबळ, सोमनाथ पाटोळे यांच्यासह नागरिक आणि महिला मोठ्या संख्येने उपस्थित होत्या.
राजघराणं आणि सातारकर एक अतुट नातं असून सातारा शहर हे राजघराण्याचं कुटूंब आहे. सर्वजण एकोप्याने राहतांत. दोन्ही राजेंच्या माध्यमातून सातारा शहरात विविध विकासकामे मार्गी लागली आहेत. शहरात सर्व प्रकारच्या शिक्षणाची सोय आहे. आता मेडीकल कॉलेज होणे आवश्यक आहे. त्याचप्रमाणे अजिंक्यतारा किल्ल्यावर शिवस्षृटी, नवीन मोठमोठ्या कंपन्या सातार्यात आणणे, यासारखी मोठी कामे करायची असतील तर, सत्तेशिवाय पर्याय नाही. केंद्रात भाजपची सत्ता आहे आणि आता राज्यातही भाजपतीच सत्ता येणार आहे. पाच वर्षात कधीही तोंड न दाखवणारे पावसाळ्यातील भूछत्राप्रमाणे निवडणूकीत उगवतात. मग त्यांच्या मागं जायचं का विकासाच्या मागं जायचं हे तुम्ही आम्ही ठरवले पाहिजे. आपल्या दोन राजांच्या आणि भाजपच्या माध्यमातूनच शहराचा गतीने विकास होणार आहे. त्यामुळे दोन्ही राजांना विजयी करुन विरोधकांना पुन्हा घरी पाठवा, असे आवाहन सौ. वेदांतिकाराजे यांनी यावेळी केले. यावेळी सौ. कदम, बाळासाहेब भूजबळ, काटवटे, डॅनी पवार, आंबेकर यांनी मनोगत व्यक्त केले. शंकरकाका किर्दत यांनी आभार मानले. कार्यक्रमास करंजे येथील युवक, युवती, ग्रामस्थ आणि महिला मोठ्या संख्येने उपस्थित होते.
सातारा पोलीस मुख्यालयात उपनिरीक्षकाला धमकी |
बिग बॉस फेम अभिजीत बिचुकले यांचा अर्ज दाखल |
महाविकास आघाडीच्या उमेदवाराचा पूर्ण ताकतीने प्रचार करणार |
माढयात अभय जगताप यांचे बंड शमले |
सातारा लोकसभा प्रबंधन समितीचे कार्य उत्कृष्ठ |
उदयनराजे भोसले यांची संपत्ती 251 कोटीची |
वादळी वाऱ्यात स्पीड बोट उलटून एकाचा मृत्यू |
निवडणूक स्थिर सर्वेक्षण पथकातील कर्मचाऱ्याला पोलिसाकडून मारहाण |
येणके येथील कुंभार वस्तीतील जल जीवन मिशनअंतर्गतचे काम प्रगतीपथावर |
निवडणुक निरिक्षक आर. अर्जुन व पोलिस निवडणुक निरिक्षक प्रदीप शर्मा यांचे जिल्ह्यात आगमन |
उदयनराजेंना विक्रमी मताधिक्याने निवडून आणण्यासाठी सर्वतोपरी प्रयत्न करणार |
श्री क्षेत्र निनाम येथील सासनकाठीला यात्रेत महत्वाचे स्थान |
मंदार कोल्हटकर, धिरज पाटील यांचे अपघाती निधन |
ट्रकच्या धडकेत दुचाकीस्वाराचा मृत्यू |
राजवाडा परिसरातून सव्वा लाखांच्या सोन्याच्या चैनची चोरी |
उदयनराजे भोसले यांची संपत्ती 251 कोटीची |
वादळी वाऱ्यात स्पीड बोट उलटून एकाचा मृत्यू |
निवडणूक स्थिर सर्वेक्षण पथकातील कर्मचाऱ्याला पोलिसाकडून मारहाण |
येणके येथील कुंभार वस्तीतील जल जीवन मिशनअंतर्गतचे काम प्रगतीपथावर |
निवडणुक निरिक्षक आर. अर्जुन व पोलिस निवडणुक निरिक्षक प्रदीप शर्मा यांचे जिल्ह्यात आगमन |
उदयनराजेंना विक्रमी मताधिक्याने निवडून आणण्यासाठी सर्वतोपरी प्रयत्न करणार |
श्री क्षेत्र निनाम येथील सासनकाठीला यात्रेत महत्वाचे स्थान |
मंदार कोल्हटकर, धिरज पाटील यांचे अपघाती निधन |
ट्रकच्या धडकेत दुचाकीस्वाराचा मृत्यू |
राजवाडा परिसरातून सव्वा लाखांच्या सोन्याच्या चैनची चोरी |
मारहाण प्रकरणी चौघांवर गुन्हा |
ट्रक चालकाला लुटल्याप्रकरणी तीन अज्ञातांवर गुन्हा |
महिलेचा विनयभंग केल्याप्रकरणी एकावर गुन्हा |
सराईत गुन्हेगाराने दिली तीन घरफोड्यांची कबुली |
उदयनराजे यांच्या समर्थनार्थ सातार्यात लोटला जनसागर |