02:58am | Aug 11, 2019 |
सातारा : सोमवार पेठ, फलटण येथील माजी नगरसेवक सोमा गंगाराम जाधव व त्याचा नगरसेवक मुलगा विक्रम सोमा जाधव यांच्यावर लोकशाहीर अण्णाभाऊ साठे जयंती कार्यक्रमावर हल्ला केल्याप्रकरणी गुन्हा दाखल करुन अटकेची मागणी सोमवार पेठ, फलटण येथील महिलांनी जिल्हा पोलीस अधीक्षक तेजस्वी सातपुते यांच्याकडे निवेदनाद्वारे केली आहे.
निवेदनात असे म्हटले आहे की, 5 ऑगस्ट 2019 रोजी सोमवार पेठ, फलटण येथे लोकशाहीर अण्णाभाऊ साठे जयंती कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. कार्यक्रम सुरु असताना रात्री साडेनऊ च्या दरम्यान सोमवार पेठेतील 10 ते 15 जणांच्या टोळक्याने जयंती कार्यक्रमावर हल्ला केला होता. या हल्ल्यामध्ये लहान मुलांसह महिलाही जखमी झाल्या होत्या. त्यानंतर सोमवार पेठेत तणावाचे वातावरण निर्माण झाले होते. पोलिसांनी खबरदारी म्हणून सोमवार पेठेत बंदोबस्त ठेवला होता. यानंतर 8 संशयित आरोपींवर जयंती कार्यक्रमावर हल्ला केल्याप्रकरणी ऍट्रोसिटी अन्वये गुन्हा दाखल करण्यात आला होता. मात्र या जयंती कार्यक्रम हल्ला प्रकरणातील सूत्रधारांवर गुन्हा दाखल करण्यात यावा, अशी मागणी फिर्यादीने केली होती. मात्र यातील मुख्य सूत्रधार माजी नगरसेवक सोमा गंगाराम जाधव व त्याचा नगरसेवक मुलगा विक्रम सोमा जाधव यांच्यावर गुन्हा दाखल करण्यास पोलिसांनी टाळाटाळ केली होती. उलट, फिर्यादीसह पाचजणांवर फलटण पोलीस ठाण्यात विनयभंगाचा खोटा गुन्हा दाखल करण्यात आला होता. तसेच या प्रकरणातील सूत्रधार सोमा जाधव व विक्रम जाधव यांनी सोमवार पेठेतील अनेक रहिवाशांकडून जिवे मारण्याची धमकी देत, दमदाटी करुन आधारकार्डच्या झेरॉक्स तसेच कोर्या कागदावर सह्या घेतल्या आहेत, असा आरोपही निवेदनातून करण्यात आला आहे.
2011 साली सोमा जाधव व विक्रम जाधव यांनी स्वत:च्या फायद्यासाठी सोमवार पेठ व मंगळवार पेठेत जातीय दंगल घडवून आणली होती. त्यामुळे फलटण शहरामध्ये काही दिवस संचारबंदी लागू करण्यात आली होती. या प्रकारामुळे फलटणमधील सामाजिक वातावरण दूषित झाले होते. सोमा व विक्रम जाधव यांचा अवैध खासगी सावकारीचा मोठा व्यवसाय आहे. अवैध खासगी सावकारीच्या माध्यमातून या दोघांनीही मोठी काळी संपत्ती कमावली आहे. याच जोरावर ते सोमवार पेठेत गुंडगिरी करतात. त्यांच्या गुंडगिरीमुळे सामान्य लोकांचे जिणे असह्य झाले आहे. परवा झालेल्या लोकशाहीर अण्णाभाऊ साठे जयंती कार्यक्रमावर हल्ला घडवून जातीय दंगल घडविण्याचा त्यांचा डाव होता. या माध्यमातून त्यांना सोमवार पेठेतील सर्व्हे नं. 6 या जागेवर गेल्या पन्नास वर्षांपासून वास्तव्यास असलेल्या 90 कुटूंबांना हुसकावून लावायचे आहे. वास्तविक फलटण नगरपालिकेने या जागेवर बोगस दस्तावेजांचा वापर करीत याठिकाणी आरक्षण टाकले आहे. राजकीय फायदा उचलण्यासाठी सोमा जाधव व विक्रम जाधव यांनी लोकशाहीर अण्णाभाऊ साठे जयंती कार्यक्रमावर हल्ला घडवून आणलेला आहे. तेच या मागचे सूत्रधार आहेत. त्यामुळे त्यांच्यावर कठोर कारवाई करुन अटक करण्यात यावी, अशा आशयाचे निवेदन सोमवार पेठ, फलटण येथील महिलांनी जिल्हा पोलीस प्रमुख तेजस्वी सातपुते यांना दिले आहे.
साताऱ्यात मेघगर्जनेसह बरसल्या पावसाच्या सरी |
जनता बँकेत पुर्नगठीत बोर्ड ऑफ मॅनेजमेंटच्या चेअरमनपदी विनोद कुलकर्णी |
बोंडारवाडीसह धरणांची कामे मार्गी लावणार उदयनराजेंचे आश्वासन |
दलित महासंघ,पॅंथरचा उदयनराजेंना जाहीर पाठींबा |
सातारकरांना बाहेरच्यांनी स्वाभिमान शिकवू नये |
साताऱ्यात कोट्यावधीची कामे हीच आपली जमेची बाजू |
जुगार प्रकरणी एकावर कारवाई |
नोकरीच्या अमिषाने सुमारे पावणे सहा लाखांची फसवणूक |
शहरातील दोन वेगवेगळ्या घटनांमध्ये दोनजण बेपत्ता |
विवाहितेला आत्महत्येस प्रवृत्त केल्याप्रकरणी पती विरुध्द गुन्हा |
शाहूनगर येथे घरफोडी |
पंतप्रधान मोदी यांची सभा म्हणजे उदयनराजे यांच्या विजयाची नांदी |
वाट कशाची पाहता? कामाला लागा |
साताऱ्यात आरटीई प्रवेशासाठी पालकांचा कमी प्रतिसाद |
अफवांवर नाही, हवामान खात्यावर विश्वास ठेवा : हवामान खात्याचे प्रमुख सुनील कांबळे |
साताऱ्यात कोट्यावधीची कामे हीच आपली जमेची बाजू |
जुगार प्रकरणी एकावर कारवाई |
नोकरीच्या अमिषाने सुमारे पावणे सहा लाखांची फसवणूक |
शहरातील दोन वेगवेगळ्या घटनांमध्ये दोनजण बेपत्ता |
विवाहितेला आत्महत्येस प्रवृत्त केल्याप्रकरणी पती विरुध्द गुन्हा |
शाहूनगर येथे घरफोडी |
पंतप्रधान मोदी यांची सभा म्हणजे उदयनराजे यांच्या विजयाची नांदी |
वाट कशाची पाहता? कामाला लागा |
साताऱ्यात आरटीई प्रवेशासाठी पालकांचा कमी प्रतिसाद |
अफवांवर नाही, हवामान खात्यावर विश्वास ठेवा : हवामान खात्याचे प्रमुख सुनील कांबळे |
घोटाळेबाजांशी कायम लढत राहणार उदयनराजे गरजले |
साताऱ्यातील सुप्रसिद्ध डॉ. रविंद्र हर्षे यांचे दुःखद निधन |
भाजप देशाचे भविष्य तर काँग्रेस भूतकाळ उदयनराजे भोसले यांचा टोला |
कृष्णाबाई यात्रा महोत्सवाचा पालखी मिरवणुकीने शुभारंभ |
गंभीर गुन्हे करणार्या चौघांच्या टोळीला तडीपारीचा दणका |