03:11am | Dec 14, 2019 |
सातारा : गेल्या काही दिवसांपासून कारभार्यांचे खांदेपालट होणार, अशी कुजबूज सातारा पोलीस दलात होती. त्याला आज मूर्त स्वरुप मिळाले. सातारा पोलीस दलात नुकतेच रुजू झालेले सर्जेराव पाटील हे स्थानिक गुन्हे शाखेचे, तर सायबर क्राईमचे अण्णासाहेब मांजरे तिसर्यांदा बोहल्यावर चढत सातारा शहर पोलीस ठाण्याचे कारभारी झाले आहेत.
सुमारे वर्षभरापूर्वी स्थानिक गुन्हे शाखेचे (एलसीबी) तत्कालीन पोलीस निरीक्षक पद्माकर घनवट यांची पुणे ग्रामीण येथे बदली झाली होती. त्यांच्या जागेवर सोलापूर येथून आलेल्या विजय कुंभार यांची वर्णी लागली होती. सुमारे वर्षभर पोलीस निरीक्षक कुंभार यांनी एलसीबीचा गाडा हाकला. परंतू घनवट यांना टेक ओव्हर करण्यात कुंभार आणि टीम कमी पडली, अशी चर्चा जिल्हा पोलीस दलात होती. एलसीबीच्या खुर्चीवर बसण्यासाठी यापूर्वी अनेक अधिकारी सेटिंग लावून टपले होते. परंतू गेल्या वर्षभरात जिल्हा पोलीस अधीक्षकांनी एलसीबीच्या कारभार्यांवर विश्वास दाखवला होता. परंतू एलसीबीत खांदेपालट होणार, अशा चर्चाही काही दिवसांपासून सुरु होत्या. परंतू जिल्ह्यात सक्षम पोलीस अधिकार्यांची वानवा असल्याने एलसीबीला खमक्या अधिकारी मिळत नव्हता. अखेर नुकतेच सोलापूर ग्रामीणहून जिल्हा पोलीस दलात रुजू झालेल्या सर्जेराव पाटलांना एलसीबीची सूत्रे देण्यात आली आहेत. तर जिल्ह्यात काही वर्षांपासून तळ ठोकून असलेल्या तसेच जिल्ह्यातील महत्त्वाच्या पोलीस ठाण्यांचा कार्यभार सांभाळलेल्या अण्णासाहेब मांजरे यांना सातारा शहरचे कारभारी करण्यात आले आहे. या संदर्भातील आदेश जिल्हा पोलीस प्रमुख तेजस्वी सातपुते यांनी पारित केले असून दोघांनीही तत्काळ आपापले चार्ज घेतले आहेत.
संशयित माल जवळ बाळगल्याप्रकरणी एकावर गुन्हा |
राहत्या घरातून युवती बेपत्ता |
वाई, जावळी परिसरात जोरदार अवकाळी पाऊस |
विरोधकांच्या रडीच्या डावाला जनता भुलणार नाही |
महायुतीचे आज सातार्यात जोरदार शक्ती प्रदर्शन |
सातारा जिल्ह्यात राम लल्लाच्या गजराने रामनवमी साजरी |
उदयनराजे यांच्या शक्तीप्रदर्शनासाठी आमदार शिवेंद्रसिंहराजे सज्ज |
सातारा जिल्ह्यात रामनवमी उत्साहात साजरी |
उष्माघातावरील उपचारासाठी सर्व शासकीय रुग्णालयांमध्ये कक्ष स्थापन |
आदर्श आचारसंहितेच्या काटेकोरपणे अंमलबजावणीस सर्वोच्च प्राधान्य : जिल्हाधिकारी डुडी |
श्रीराम नवमी निमित्त राम ध्यान मंदिरात अर्पित कथक नृत्यलयाचा कार्यक्रम |
निवृत्तीवेतनधारक/कुटुंबनिवृत्तीवेतन धारकांना आवाहन |
विविध मोबाईल अॅपच्या माध्यमातून मतदारांना सोई- सुविधा |
45- सातारा लोकसभेसाठी 6 नामनिर्देशनपत्र दाखल |
जिल्हाधिकारी कार्यालयाबाहेरुन सव्वादोन तोळ्याच्या चैनची चोरी |

महिलेला मारहाण केल्याप्रकरणी एकावर गुन्हा |
बॉम्बे रेस्टॉरंट परिसरात आढळला बेवारस मृतदेह |
लोखंडी रॉडने मारहाण केल्याप्रकरणी तिघांवर गुन्हा |
भाजप कार्यालयात उदयनराजे यांचे स्वागत |
माझ्यावरील आरोप हा राजकीय षडयंत्राचा भाग |