सातारा : मंगळवारी सातारा जिल्ह्यात वारीचे आगमन झाल्यानंतर सातारा पोलिस दलही अलर्ट झाले असून पहिल्याच दिवशी पाकिटमारी करणार्या 6 जणांची धरपकड केली. संबंधित संशयितांना ताब्यात घेवून लोणंद पोलिसांच्या स्वाधीन करण्यात आले आहे.
विठ्ठलाच्या भेटीच्या ओढीने लाखो वैष्णवांसह आळंदीहून पंढरपूरकडे संत ज्ञानेश्वरांची पालखी निघालेली आहे. मंगळवारी या पालखीचे सातारा जिल्ह्यात आगमन झाले. जिल्ह्यात पालखीचे तब्बल चार मुक्काम असल्याने त्या पार्श्वभूमीवर सातारा पोलिस दल अलर्ट झालेले आहे. पोलिस अधीक्षक तेजस्वी सातपुते, अप्पर पोलिस अधीक्षक धिरज पाटील, एलसीबीचे पोनि विजय कुंभार यांनी पालखी नियोजनासाठी मायक्रो प्लॅन तयार केला.
पायी निघालेल्या वारकर्यांना रस्त्याची अडचण येवू नये. मुक्कामाच्या ठिकाणी त्यांना सुरक्षितता मिळावी, यासाठी सातारा पोलिस दल बंदोबस्तासाठी तैनात आहेे. मंगळवारी सातारा पोलिस बंदोबस्तावर असतानाच त्यांना सहा संशयित पाकीटमार आढळून आले. संशयितांकडे चौकशी केल्यानंतर त्यांना पुढील तपासासाठी लोणंद पोलिसांच्या ताब्यात देण्यात आले आहे. दरम्यान, संशयितांबाबत माहिती मिळाल्यास तात्काळ पोलिसांशी संपर्क साधण्याचे आवाहन पोनि विजय कुंभार यांनी केले आहे.
कोल्हापूरला निघालेली खासगी ट्रॅव्हल्स झाली पलटी |
पुण्यातील पीएमटीच्या बसचालकाची सोनगाव येथे आत्महत्या |
झाड मारल्याप्रकरणी सातार्यात दोन गुन्हे दाखल |
अदानी ग्रुपचा वीज प्रकल्प रद्द करण्याठी प्रकल्पग्रस्त जिल्हाधिकारी कार्यालयावर काढणार मोर्चा |
प्रतापसिंह नगरात अतिक्रमणांसह लल्लन आणि युवराजच्या दहशतीवर जिल्हा प्रशासनाचा बुलडोझर |
पाच नॅशनल पुरस्कार मिळवून श्लोक घोरपडे कोल्हापूर येथील स्पर्धेत मारणार बाजी |
'आयडियल' मतदारसंघाचे 'आयडॉल' आमदार |
आचारसंहिता काळात लोकशाही दिनाचे आयोजन होणार नाही : नागेश पाटील |
पोक्सोंतर्गत एकावर गुन्हा |
कुऱ्हाडीने वार केल्या प्रकरणी एकावर गुन्हा |
अवैधरित्या दारू विक्री प्रकरणी एकावर कारवाई |
अंमली पदार्थाचे सेवन केल्याप्रकरणी एकावर गुन्हा |
राहत्या घरातून युवक बेपत्ता |
वडूज येथे बांधकाम विभागाचा अभियंता लाचलुचपतच्या जाळ्यात |
मल्हारपेठेत शाहूपुरी पोलिसांनी पकडला पावणेदोन लाखाचा गुटखा |
पाच नॅशनल पुरस्कार मिळवून श्लोक घोरपडे कोल्हापूर येथील स्पर्धेत मारणार बाजी |
'आयडियल' मतदारसंघाचे 'आयडॉल' आमदार |
आचारसंहिता काळात लोकशाही दिनाचे आयोजन होणार नाही : नागेश पाटील |
पोक्सोंतर्गत एकावर गुन्हा |
कुऱ्हाडीने वार केल्या प्रकरणी एकावर गुन्हा |
अवैधरित्या दारू विक्री प्रकरणी एकावर कारवाई |
अंमली पदार्थाचे सेवन केल्याप्रकरणी एकावर गुन्हा |
राहत्या घरातून युवक बेपत्ता |
वडूज येथे बांधकाम विभागाचा अभियंता लाचलुचपतच्या जाळ्यात |
मल्हारपेठेत शाहूपुरी पोलिसांनी पकडला पावणेदोन लाखाचा गुटखा |
आज जिल्ह्यात उदयनराजेंची होणार ग्रँड एन्ट्री |
सातारा लोकसभेवर अजितदादांच्या राष्ट्रवादीचा दावा कायम |
पाटखळ येथील नूतन तलाठी कार्यालयाचे अतिक्रमण |
मेक इन इंडिया पॉलिसीमुळे ‘मॅक्सिको’ होण्याची भीती? |
चक्क अप्पर जिल्हाधिकारी निवासस्थाना बाहेरचे झाड जाळण्याचा प्रयत्न |