07:14pm | Jul 20, 2018 |
मुंबई : देशातील हाताने मैला उचलणाऱ्या कामगारांच्या पुनर्वसनासाठी व त्यांचा सामाजिक व आर्थिक स्तर उंचावण्यासाठी केंद्र सरकार आणि संबंधित राज्य सरकारने पावले उचलण्याची आग्रही मागणी खासदार अमर साबळे यांनी राज्यसभेत केली.
खासदार अमर साबळे केंद्राच्या ‘मॅन्युअल स्केव्हेंजर रोजगार बंदी आणि पुनर्वसन’ या समितीवर सदस्य आहेत. हाताने मैला उचलणाऱ्या सफाई कामगारांची आर्थिक स्थिती आजही अत्यंत बिकट असून त्यांना सामाजिक स्तरावर अहवेलनेचा सामना करावा लागतो. त्यामुळे त्यांचे आर्थिक व सामाजिक पुनर्वसन होणे आवश्यक आहे, अशी भूमिका खासदार साबळे यांनी घेतली. तसेच यासाठी सामाजिक न्याय मंत्रालयाच्या वतीने कोणती पावले उचलण्यात येत आहेत यासंबंधीची माहिती देण्याची मागणीही साबळे यांनी यावेळी केली.
त्यांच्या प्रश्नांना सामाजिक न्याय राज्यमंत्री रामदास आठवले यांनी उत्तरे दिली. यावेळी बोलताना आठवले म्हणाले की, हाताने मैला उचलणाऱ्या सफाई कामगारांच्या नियुक्तीस प्रतिबंध घालण्याबाबत आणि त्यांचे पुनर्वसन करण्याबाबत ‘अधिनियम 2013’ची परिणामकारक अंमलबजावणी करण्यात येत आहे. या कामगारांच्या आर्थिक स्थैर्यतेसाठी व त्यांच्या पुनर्वसनासाठी केंद्र सरकार प्रति व्यक्ती 40 हजार रुपये देते.
देशातील विविध राज्यातील अशा सफाई कामगारांचे सर्वेक्षण करण्याचे आदेश संबंधित विभागाला देण्यात आले असून सद्यस्थितीत 18 राज्यांमधील 170 जिल्ह्यांमध्ये प्रत्यक्ष सर्वेक्षण सुरू करण्यात आले आहे.
या सफाई कामगारांच्या पुनर्वसनासाठी स्वयंरोजगार योजनेंतर्गत त्यांना कौशल्य विकास प्रशिक्षण तसेच रोजगार निर्मिती करण्यासाठी 15 लाख रुपयांचे कर्ज उपलब्ध करून देण्यात येत असून त्याला 3लाख 25 हजार रुपये अनुदान देण्यात येत असल्याची माहिती आठवले यांनी यावेळी दिली.
सातारा पोलीस मुख्यालयात उपनिरीक्षकाला धमकी |
बिग बॉस फेम अभिजीत बिचुकले यांचा अर्ज दाखल |
महाविकास आघाडीच्या उमेदवाराचा पूर्ण ताकतीने प्रचार करणार |
माढयात अभय जगताप यांचे बंड शमले |
सातारा लोकसभा प्रबंधन समितीचे कार्य उत्कृष्ठ |
उदयनराजे भोसले यांची संपत्ती 251 कोटीची |
वादळी वाऱ्यात स्पीड बोट उलटून एकाचा मृत्यू |
निवडणूक स्थिर सर्वेक्षण पथकातील कर्मचाऱ्याला पोलिसाकडून मारहाण |
येणके येथील कुंभार वस्तीतील जल जीवन मिशनअंतर्गतचे काम प्रगतीपथावर |
निवडणुक निरिक्षक आर. अर्जुन व पोलिस निवडणुक निरिक्षक प्रदीप शर्मा यांचे जिल्ह्यात आगमन |
उदयनराजेंना विक्रमी मताधिक्याने निवडून आणण्यासाठी सर्वतोपरी प्रयत्न करणार |
श्री क्षेत्र निनाम येथील सासनकाठीला यात्रेत महत्वाचे स्थान |
मंदार कोल्हटकर, धिरज पाटील यांचे अपघाती निधन |
ट्रकच्या धडकेत दुचाकीस्वाराचा मृत्यू |
राजवाडा परिसरातून सव्वा लाखांच्या सोन्याच्या चैनची चोरी |

मारहाण प्रकरणी चौघांवर गुन्हा |
ट्रक चालकाला लुटल्याप्रकरणी तीन अज्ञातांवर गुन्हा |
महिलेचा विनयभंग केल्याप्रकरणी एकावर गुन्हा |
सराईत गुन्हेगाराने दिली तीन घरफोड्यांची कबुली |
उदयनराजे यांच्या समर्थनार्थ सातार्यात लोटला जनसागर |