02:47am | Jan 29, 2019 |
कराड : कराड अर्बन बँक ही सहकार क्षेत्रातील चांगली बँक असून सहकार क्षेत्रात होणारे बदल आत्मसात करून सातत्याने भविष्यकाळाचा वेध घेत, चिंतन करत सुधारणा केल्यामुळेच बँकेची प्रगती साध्य झाली असून अर्बन कुटुंबातील सदस्यांनी बदलत्या बँकिंग प्रवाहाचा वेध घेत सातत्याने आपल्यात सुधारणा करायला पाहिजे असे उद्गार कुटुंबप्रमुख सुभाषराव जोशी यांनी काढले. ते बँकेचे संचालक-सेवक चिंतन शिबिरप्रसंगी बोलत होते. याप्रसंगी बँकेचे अध्यक्ष डॉ. सुभाष एरम, उपाध्यक्ष समीर जोशी, मुख्य कार्यकारी अधिकारी सीए. दिलीप गुरव, बँकेचे सर्व संचालक, सर्व वरिष्ठ अधिकारी, सेवक वर्ग उपस्थित होते.
बँकेच्या शताब्दी सभागृहात संपन्न झालेल्या संचालक सेवक चिंतन शिबिरामध्ये कै. बाबुराव गोखले गुणवंत सेवक पुरस्कार, निवृत्त सेवक सत्कार, अर्थसंगम या त्रैमासिकाचे प्रकाशन, सेवक संघाने आयोजीत केलेल्या विविध स्पर्धांचा बक्षीस वितरण समारंभ व सेवकांना संपूर्ण चातुर्मास ग्रंथ भेट असे विविध कार्यक्रम संपन्न झाले.
यावेळी बोलताना बँकेचे अध्यक्ष डॉ. सुभाष एरम म्हणाले, आपल्या बँकेचा आत्मा सहकाराचा असला तरी आपले स्ट्रक्चर कार्पोरेट आहे. बँकेची प्रतिमा चांगली व पारदर्शक आहे. संवादातून सेवकांना ऊर्जा मिळावी यासाठी चिंतन शिबिर उपयुक्त ठरते. बँकिंग क्षेत्रात सातत्याने होणार्या बदलांना सामोरे जाताना अर्बन कुटुंबातील सर्वांशी सलोख्याचे संबंध ठेवून त्यातून प्रगती साधावी लागते. चिंतन शिबिरातून चांगले विचार रूजविण्याचे काम केले जाते, याचा ङ्गायदा बँकेच्या प्रगतीसाठी होत असतो.
या कार्यक्रमात निवृत्त उप महाव्यवस्थापक माधव माने यांना कै. बाबुराव गोखले गुणवंत सेवक पुरस्काराने सन्मानित करण्यात आले. त्यांचा मानपत्र, स्मृतिचिन्ह व शाल देवून मान्यवरांच्या हस्ते सन्मानित करण्यात आले. मानपत्राचे वाचन सीए. दिलीप गुरव यांनी केले. यावेळी माधव माने यांनी मनोगत व्यक्त केले. तसेच यावेळी अर्थसंगम या त्रैमासिकाचे प्रकाशन करण्यात आले. सेवक संघाने आयोजित केलेल्या कॅरम, बुध्दीबळ, धावणे, क्रिकेट स्पर्धांतील विजेत्यांना यावेळी पारितोषिके वितरीत करण्यात आली.
यावेळी निवृत्त सेवक माधव माने, प्रकाश सराफदार, विलास चव्हाण, शोभा शहा, श्रीनिवास साने, सुहास पोरे, दिलीप चिंचकर, मोहन पवार, संभाजी जाधव, श्रीधर बलकुंदीकर, अंकूश येवले, भीमराव मोरे, शहाजीराव नलगे, दत्तात्रय पाटील, तुकाराम जाधव, बिरू कट्टे व निवास यादव यांचा सत्कार करण्यात आला.
सुरूवातीला मुख्य कार्यकारी अधिकारी सीए. दिलीप गुरव यांनी प्रास्ताविक केले. यावेळी बोलताना ते म्हणाले की, आजचे चिंतन शिबिर हे ऐतिहासिक असून शताब्दी सभागृहातील हे पहिले चिंतन शिबिर आहे. सेवकांना बँकिंगमधील दैनंदिन कामकाजाशिवाय त्यांच्या व्यक्तीमत्वाचा विकास व्हावा, त्यांना चौङ्गेर ज्ञान मिळावे, त्यांना ऊर्जा मिळावी यासाठी चिंतन शिबिराचे आयोजन केले जाते. चिंतन शिबिरामुळे बँकेच्या व्यवसायात सकारात्मक बदल होत आहे.
शेवटी बँकेचे कर्ज विभागाचे उप महाव्यवस्थापक गिरीष सिंहासने यांनी आभार मानले.
ट्रकच्या धडकेत दुचाकीस्वाराचा मृत्यू |
राजवाडा परिसरातून सव्वा लाखांच्या सोन्याच्या चैनची चोरी |
मारहाण प्रकरणी चौघांवर गुन्हा |
ट्रक चालकाला लुटल्याप्रकरणी तीन अज्ञातांवर गुन्हा |
महिलेचा विनयभंग केल्याप्रकरणी एकावर गुन्हा |
सराईत गुन्हेगाराने दिली तीन घरफोड्यांची कबुली |
उदयनराजे यांच्या समर्थनार्थ सातार्यात लोटला जनसागर |
शिक्षक हेच सुसंस्कृत समाजनिर्मितीचे जनक |
अजिंक्यतारा कारखान्यावर वादातून झाला गोळीबार |
जनता बँक साताराच्या तज्ज्ञ संचालकपदी सौरभ रायरीकर, राजेंद्र जाधव यांची निवड |
महिलेची गळफास घेवून आत्महत्या |
एकाच्या मृत्यूप्रकरणी कार चालकावर गुन्हा |
संशयित माल जवळ बाळगल्याप्रकरणी एकावर गुन्हा |
राहत्या घरातून युवती बेपत्ता |
वाई, जावळी परिसरात जोरदार अवकाळी पाऊस |
सराईत गुन्हेगाराने दिली तीन घरफोड्यांची कबुली |
उदयनराजे यांच्या समर्थनार्थ सातार्यात लोटला जनसागर |
शिक्षक हेच सुसंस्कृत समाजनिर्मितीचे जनक |
अजिंक्यतारा कारखान्यावर वादातून झाला गोळीबार |
जनता बँक साताराच्या तज्ज्ञ संचालकपदी सौरभ रायरीकर, राजेंद्र जाधव यांची निवड |
महिलेची गळफास घेवून आत्महत्या |
एकाच्या मृत्यूप्रकरणी कार चालकावर गुन्हा |
संशयित माल जवळ बाळगल्याप्रकरणी एकावर गुन्हा |
राहत्या घरातून युवती बेपत्ता |
वाई, जावळी परिसरात जोरदार अवकाळी पाऊस |
विरोधकांच्या रडीच्या डावाला जनता भुलणार नाही |
महायुतीचे आज सातार्यात जोरदार शक्ती प्रदर्शन |
सातारा जिल्ह्यात राम लल्लाच्या गजराने रामनवमी साजरी |
उदयनराजे यांच्या शक्तीप्रदर्शनासाठी आमदार शिवेंद्रसिंहराजे सज्ज |
सातारा जिल्ह्यात रामनवमी उत्साहात साजरी |