सातारा : येथील एका हॉटेलसमोर ‘फाईट’ या चित्रपट प्रदर्शनाच्या पत्रकार परिषदेसाठी आलेल्या चित्रपट नायक व निर्मात्याची गाडी पाच जणांनी फोडल्यानंतर त्यातील दोघेजण पळून गेले. गाडी फोडल्यानंतरही पिक्चर चमूने तक्रार न देता तेथून निघून जाणे पसंत केले. यामुळे ही स्टंटबाजीची ‘फाईट’ असल्याची खुमासदार चर्चा रंगली. दरम्यान, ‘सातार्यात फक्त माझीच चालते,’ हा डायलॉग वगळावा असे तथाकथित खा.उदयनराजे समर्थक असल्याचा आव आणून संशयितांनी परिसरात दशहत केल्याने पोलिसांची याप्रकरणी सुमोटो तक्रार देण्याची प्रक्रिया सुरु होती.
आदित्य शेंडे (रा.खडकी ता.वाई), स्वप्नील पवार (रा.गोडोली), प्रज्वल धुमाळ (रा.गोळीबार मैदान), अतुल पाटोळे, राहूल पाटोळे (दोघे रा.विलासपूर) या पाच जणांवर गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया रात्री उशीरापर्यंत सुरु होती. दरम्यान, स्वप्नील पवार व प्रज्वल धुमाळ यांनी घटनेनंतर दुचाकीवर पळ काढला आहे.
याबाबत प्राथमिक माहिती अशी, की गुरुवारी फाईट या चित्रपट प्रदर्शनासाठी सातार्यातील राधिका पॅलेस या हॉटेलमध्ये पत्रकार परिषदेचे आयोजन करण्यात आले होते. याबाबत चित्रपटाची माहिती निर्माते ललित ओसवाल, दिग्दर्शक जी.मी. मोरे, अभिनेता जीत मोरे, अभिनेत्री सायली जोशी, खलनायक प्रसाद सुर्वे हे देत होते. दुपारी एक वाजण्याच्या सुमारास अचानक हॉटेलच्या परिसरात गोंधळाला सुरुवात झाली. ‘सातार्यात फक्त माझीच चालते’ हा डायलॉग काढून टाका, सातार्यात फक्त आणि फक्त उदयनराजेंचीच चालते असे म्हणत चिडून जाऊन पाच जणांनी हॉटेल बाहेर उभ्या असलेल्या गाडीची तोडफोड केली. यावेळी संशयितांनी लावण्यात आलेला चित्रपटाचा फ्लेक्सही फाडला. तो डॉयलॉग काढून टाका, अन्यथा सातार्यासह महाराष्ट्रात हा चित्रपट चालून देणार नाही, असे म्हणत संबंधितांनी राडा केला.
संशयित ऐकण्याच्या मनस्थितीमध्ये नसल्याने परिसरात खळबळ उडाली व पळापळ झाली व नागरिकांमध्ये भितीचे वातावरण निर्माण झाले. या राड्याची माहिती शाहूपुरी पोलिसांना समजल्यानंतर त्यांनी तत्काळ घटनास्थळी धाव घेतली. संशयितांची धरपकड करताच दोघेजण पळून गेले. तिघांना पोलिसांनी ताब्यात घेतले व पोलिस ठाण्यात नेले. कायदा व सुव्यवस्थेचा प्रश्न ऐरणीवर आल्याने पोलिसांनी या प्रकरणी चौकशीला सुरुवात केली.ज्यांच्या कारची तोडफोड केली व फ्लेक्स फाडला त्यांना तक्रार देण्याची पोलिसांनी सूचना केल्यानंतर फाईटमधील कलाकार, निर्मात्यांची टाईट झाली. संबंधितांनी चक्क तक्रार देणार नसल्याचे सांगून सातार्यातून पाय काढून घेतला.
दरम्यान, चित्रपट सुपरहिट व्हावा यासाठी हा स्टंट केला असल्याची चर्चा परिसरात दबक्या आवाजात सुरु होती. संशयित हे खासदार समर्थक असल्याचे कधी पाहण्यात आले नसल्याचीही चर्चा जोर धरु लागली. अशातच पिक्चरवाले तक्रार देत नसल्याने या चर्चांना दखलपात्र होवू लागल्या. स्टंटबाजीसाठीही ही तोडफोड झाली आहे का? या दृष्टीकोनातूनही पोलिसांनी तपासाला सुरुवात केली आहे. संशयितांमुळे परिसर दहशतीखाली गेल्याने पोलिसांनी सुमोटो तक्रार देवून कोणालाही सोडणार नसल्याचे निश्चित केले व त्यानुसार जमावबंदी, शस्त्रबंदीची तक्रार दाखल करण्याची प्रक्रिया सुरु होती.
सातारा शहरातील तीन कॅफेंवर कारवाई; 9 जणांवर गुन्हे |
अल्पवयीन मुलीचे अपहरण |
महायुतीच्या रॅलीदरम्यान चोरट्यांची हाथ की सफाई |
सातारा पोलीस मुख्यालयात उपनिरीक्षकाला धमकी |
बिग बॉस फेम अभिजीत बिचुकले यांचा अर्ज दाखल |
महाविकास आघाडीच्या उमेदवाराचा पूर्ण ताकतीने प्रचार करणार |
माढयात अभय जगताप यांचे बंड शमले |
सातारा लोकसभा प्रबंधन समितीचे कार्य उत्कृष्ठ |
उदयनराजे भोसले यांची संपत्ती 251 कोटीची |
वादळी वाऱ्यात स्पीड बोट उलटून एकाचा मृत्यू |
निवडणूक स्थिर सर्वेक्षण पथकातील कर्मचाऱ्याला पोलिसाकडून मारहाण |
येणके येथील कुंभार वस्तीतील जल जीवन मिशनअंतर्गतचे काम प्रगतीपथावर |
निवडणुक निरिक्षक आर. अर्जुन व पोलिस निवडणुक निरिक्षक प्रदीप शर्मा यांचे जिल्ह्यात आगमन |
उदयनराजेंना विक्रमी मताधिक्याने निवडून आणण्यासाठी सर्वतोपरी प्रयत्न करणार |
श्री क्षेत्र निनाम येथील सासनकाठीला यात्रेत महत्वाचे स्थान |
महाविकास आघाडीच्या उमेदवाराचा पूर्ण ताकतीने प्रचार करणार |
माढयात अभय जगताप यांचे बंड शमले |
सातारा लोकसभा प्रबंधन समितीचे कार्य उत्कृष्ठ |
उदयनराजे भोसले यांची संपत्ती 251 कोटीची |
वादळी वाऱ्यात स्पीड बोट उलटून एकाचा मृत्यू |
निवडणूक स्थिर सर्वेक्षण पथकातील कर्मचाऱ्याला पोलिसाकडून मारहाण |
येणके येथील कुंभार वस्तीतील जल जीवन मिशनअंतर्गतचे काम प्रगतीपथावर |
निवडणुक निरिक्षक आर. अर्जुन व पोलिस निवडणुक निरिक्षक प्रदीप शर्मा यांचे जिल्ह्यात आगमन |
उदयनराजेंना विक्रमी मताधिक्याने निवडून आणण्यासाठी सर्वतोपरी प्रयत्न करणार |
श्री क्षेत्र निनाम येथील सासनकाठीला यात्रेत महत्वाचे स्थान |
मंदार कोल्हटकर, धिरज पाटील यांचे अपघाती निधन |
ट्रकच्या धडकेत दुचाकीस्वाराचा मृत्यू |
राजवाडा परिसरातून सव्वा लाखांच्या सोन्याच्या चैनची चोरी |
मारहाण प्रकरणी चौघांवर गुन्हा |
ट्रक चालकाला लुटल्याप्रकरणी तीन अज्ञातांवर गुन्हा |