07:58pm | May 17, 2019 |
सातारा : नुकत्याच पार पडलेल्या गळीत हंगामात गाळपास आलेल्या ऊसाला एफआरपीनुसार होणारी सर्व रक्कम संबंधीत शेतकर्यांना अदा करणारा सातारा जिल्ह्यातील पहिला आणि एकमेक कारखाना म्हणून अजिंक्यतारा सहकारी साखर कारखान्याने नावलौकिक मिळवला आहे. शेतकर्यांना एफआरपीची संपुर्ण रक्कम दिल्याबद्दल अजिंक्यतारा कारखान्याचे आभार मानून शरद जोशी प्रणीत शेतकरी संघटनेच्या पदाधिकार्यांनी कारखान्याचे मार्गदर्शक संचालक आ. श्रीमंत छ. शिवेंद्रसिंहराजे भोसले, चेअरमन सर्जेराव सावंत आणि संचालक मंडळाचा सत्कार केला.
अजिंक्यातारा सहकारी साखर कारखान्याच्या नुकत्याच झालेल्या गळीत हंगामात एकूण ६ लाख ३६ हजार ३३९ मे.टन ऊसाचे गाळप करण्यात आले आहे. गाळपास आलेल्या ऊसाला कारखान्याने शासन निर्धारीत एफआरपीनुसार प्रतीटन २ हजार ८१५ रुपये दर दिला असून एफआरपीनुसार गाळपास आलेल्या ऊसाला १ अब्ज ७९ कोटी १२ लाख ९६ हजार २७५ रुपये एवढी रक्कम कारखान्याने संबंधीत शेतकर्यांना अदा केली आहे. गाळप झालेल्या ऊसाची एफआरपीनुसार होणारी संपुर्ण रक्कम शेतकर्यांना देणारा अजिंक्यतारा साखर कारखाना हा सातारा जिल्ह्यातील पहिला आणि एकमेव कारखाना ठरला आहे. शेतकर्यांचे हित जोपासून एफआरपीनुसार संपुर्ण रक्कम अदा केली याबद्दल शेतकरी संघटनेचे जिल्हाध्यक्ष बाळासाहेब चव्हाण, संघटनेच्या लोकराजा विभागाचे जिल्हाध्यक्ष कृष्णा भोसले (गुरुजी), संघटनेचे जावली तालुका प्रमुख मनोज सणस, सातारा तालुका प्रमुख आनंदा महापुरे, नाना पाटील ब्रिगेडचे एकनाथ जाधव, शशी कदम आदी मान्यवरांनी कारखाना व्यवस्थापनाचे आभार मानले तसेच कारखान्याचे मार्गदर्शन संचालक आ. शिवेंद्रसिंहराजे, चेअरमन सावंत आणि संचालकांचा शाल, श्रीफळ आणि हार घालून सत्कार केला.
ऊसाला चांगला दर मिळावा म्हणून आंदोलनाची भुमिका शेतकरी संघटनांमार्फत घेतली जात असते. त्याचप्रमाणे एखाद्या कारखान्याने एफआरपीनुसार शेतकर्यांना देय असलेली संपुर्ण रक्कम वेळेत दिल्याबद्दल शेतकरी संघटनेकडून त्या कारखान्याचा सत्कार केला जातो, हे निश्चितच प्रेरणादायी आणि सत्कार्यासाठी आणखी बळ देणारे आहे. आज शेतकरी संघटनेने अजिंक्यतारा कारखान्याचा सत्कार करुन संचालक मंडळाच्या पाठीवर कौतुकाची थाप मारली आहे. त्यामुळे संचालक मंडळाची जबाबदारी निश्चितच वाढली आहे. स्व. भाऊसाहेब महाराजांच्या तत्वानुसार कारखान्याचे कामकाज सुरु असून यापुढेही शेतकरी हिताचे निर्णय घेवून अजिंक्यतारा कारखाना कार्यरत राहील, अशी ग्वाही आ. शिवेंद्रसिंहराजे यांनी शेतकरी संघटनेला यावेळी दिली.
शाहूपुरी पोलिस ठाण्याच्या हद्दीत आढळला अनोळखी पुरुषाचा मृतदेह |
सातारा शहरातून दोनजणी बेपत्ता |
डॉ आंबेडकर जयंती समारोह अध्यक्षपदी संजय गाडे यांची निवड |
शरद पवारांच्या डावपेचाकडे महाराष्ट्राचे लक्ष |
कराडला रविवारी इंडिया आघाडीचा मेळावा |
पश्चिम महाराष्ट्रात दि. २९ ते ३१ पर्यंत महावितरणचे वीजबिल भरणा केंद्र सुरू |
करंजे पेठतील थकबाकीदाराची पालिकेकडून मालमत्ता केली सील |
साताऱ्यात लोकसभेबाबत शुक्रवारी शरद पवारांची बैठक |
जमिनीच्या वादातून धारदार शस्त्राने एकाचा खून |
लोकसभा सार्वत्रिक निवडणूक-2024 |
कोल्हापूरला निघालेली खासगी ट्रॅव्हल्स झाली पलटी |
पुण्यातील पीएमटीच्या बसचालकाची सोनगाव येथे आत्महत्या |
झाड मारल्याप्रकरणी सातार्यात दोन गुन्हे दाखल |
अदानी ग्रुपचा वीज प्रकल्प रद्द करण्याठी प्रकल्पग्रस्त जिल्हाधिकारी कार्यालयावर काढणार मोर्चा |
प्रतापसिंह नगरात अतिक्रमणांसह लल्लन आणि युवराजच्या दहशतीवर जिल्हा प्रशासनाचा बुलडोझर |
पश्चिम महाराष्ट्रात दि. २९ ते ३१ पर्यंत महावितरणचे वीजबिल भरणा केंद्र सुरू |
करंजे पेठतील थकबाकीदाराची पालिकेकडून मालमत्ता केली सील |
साताऱ्यात लोकसभेबाबत शुक्रवारी शरद पवारांची बैठक |
जमिनीच्या वादातून धारदार शस्त्राने एकाचा खून |
लोकसभा सार्वत्रिक निवडणूक-2024 |
कोल्हापूरला निघालेली खासगी ट्रॅव्हल्स झाली पलटी |
पुण्यातील पीएमटीच्या बसचालकाची सोनगाव येथे आत्महत्या |
झाड मारल्याप्रकरणी सातार्यात दोन गुन्हे दाखल |
अदानी ग्रुपचा वीज प्रकल्प रद्द करण्याठी प्रकल्पग्रस्त जिल्हाधिकारी कार्यालयावर काढणार मोर्चा |
प्रतापसिंह नगरात अतिक्रमणांसह लल्लन आणि युवराजच्या दहशतीवर जिल्हा प्रशासनाचा बुलडोझर |
पाच नॅशनल पुरस्कार मिळवून श्लोक घोरपडे कोल्हापूर येथील स्पर्धेत मारणार बाजी |
'आयडियल' मतदारसंघाचे 'आयडॉल' आमदार |
आचारसंहिता काळात लोकशाही दिनाचे आयोजन होणार नाही : नागेश पाटील |
पोक्सोंतर्गत एकावर गुन्हा |
कुऱ्हाडीने वार केल्या प्रकरणी एकावर गुन्हा |