कराड : येथील पंकज मल्टीपर्पज हॉल येथे लग्नानंतर स्टेजवर फोटो काढण्यास गेल्यानंतर साऊंडच्या बॉक्सवर ठेवलेली पर्ससह त्यातील 10 तोळे सोन्याचे दागिने व रोकड असा दोन लाखाचा ऐवज चोरट्याने चोरून नेल्याची घटना सोमवारी घडली. याबाबत सुखेंदु छोटालाल दोशी (वय 51, रा. राशीन ता. कर्जत, जि. अहमदनगर) यांनी शहर पोलिसात फिर्याद दिली असून याप्रकरणी अज्ञात चोरट्याच्या विरोधात गुन्हा नोंद करण्यात आला आहे.
याबाबत पोलिसांनी दिलेली माहिती अशी, सुखेंदु दोशी यांच्या मुलीचा दिर अक्षय शहा यांचे लग्न दि.20 जानेवारीला पकंज मल्टीपर्पज हॉल येथे होते. त्यानिमित्त दोशी हे कार्यालयात आले होते. सोमवारी सकाळी साडेअकरा वाजणेचे सुमारास दोशी याची मुलगी प्रांजल शहा हिने तिचेकडे असलेले सोन्याचे दागिने एका गोल्डन सिल्वर रंगाच्या पर्समध्ये घालुन दोशी यांच्या पत्नीकडे ठेवणेकरिता दिले होते. लग्न झालेनंतर पत्नीने सुखेंदु दोशी यांच्याकडे पर्स दिली होती. काही वेळाने दोशी ओळखीच्या पाहुण्यांचा फोटो मोबाईलवर काढण्यासाठी गेले. फोटो काढत असताना दोशी यांनी आपल्या हातातील पर्स बाजूच्या साऊंड सिस्टीम बॉक्स वर ठेवली. फोटो काढून आल्यानंतर ती पर्स तेथून गायब झाल्याचे सुखेंदु दोशी यांच्या निदर्शनास आले. त्यांनी इतरत्र शोध घेतला मात्र पर्स व त्यामधील दहा तोळे वजनाचे सोन्याचे दागिने व रोकड असा 2 लाख 20 हजार रुपयांचा ऐवज चोरीस गेल्याचे लक्षात आल्याने त्यांनी गुरुवारी शहर पोलिसांत फिर्याद दिली असून याप्रकरणी अज्ञात चोरट्यावर गुन्हा नोंद करण्यात आला आहे. अधिक तपास पोलीस करत आहेत.
शाहूपुरी पोलिस ठाण्याच्या हद्दीत आढळला अनोळखी पुरुषाचा मृतदेह |
सातारा शहरातून दोनजणी बेपत्ता |
डॉ आंबेडकर जयंती समारोह अध्यक्षपदी संजय गाडे यांची निवड |
शरद पवारांच्या डावपेचाकडे महाराष्ट्राचे लक्ष |
कराडला रविवारी इंडिया आघाडीचा मेळावा |
पश्चिम महाराष्ट्रात दि. २९ ते ३१ पर्यंत महावितरणचे वीजबिल भरणा केंद्र सुरू |
करंजे पेठतील थकबाकीदाराची पालिकेकडून मालमत्ता केली सील |
साताऱ्यात लोकसभेबाबत शुक्रवारी शरद पवारांची बैठक |
जमिनीच्या वादातून धारदार शस्त्राने एकाचा खून |
लोकसभा सार्वत्रिक निवडणूक-2024 |
कोल्हापूरला निघालेली खासगी ट्रॅव्हल्स झाली पलटी |
पुण्यातील पीएमटीच्या बसचालकाची सोनगाव येथे आत्महत्या |
झाड मारल्याप्रकरणी सातार्यात दोन गुन्हे दाखल |
अदानी ग्रुपचा वीज प्रकल्प रद्द करण्याठी प्रकल्पग्रस्त जिल्हाधिकारी कार्यालयावर काढणार मोर्चा |
प्रतापसिंह नगरात अतिक्रमणांसह लल्लन आणि युवराजच्या दहशतीवर जिल्हा प्रशासनाचा बुलडोझर |

पाच नॅशनल पुरस्कार मिळवून श्लोक घोरपडे कोल्हापूर येथील स्पर्धेत मारणार बाजी |
'आयडियल' मतदारसंघाचे 'आयडॉल' आमदार |
आचारसंहिता काळात लोकशाही दिनाचे आयोजन होणार नाही : नागेश पाटील |
पोक्सोंतर्गत एकावर गुन्हा |
कुऱ्हाडीने वार केल्या प्रकरणी एकावर गुन्हा |