11:25pm | Apr 05, 2020 |
सातारा : कोरोना अनुमानित म्हणून जिल्हा रुग्णालयात दाखल असणाऱ्या रुग्णांपैकी एका ५४ वर्षीय नागरिकाचा कोरोना (कोव्हीड -19) रिपोर्ट पॉझिटिव्ह आला आहे. त्यामुळे जिल्ह्यातील कोरोनाबाधित रुग्णांची संख्या चार झाली आहे. याचबरोबर ३१ वर्षीय युवकाचा रिपोर्ट निगेटिव्ह आला असून आज सातारा येथे ४ व कराड येथे ७ अनुमानित नागरिकांना विलगीकरण कक्षात दाखल करण्यात आले असल्याची माहिती जिल्हा शल्य चिकीत्सक डॉ. आमोद गडीकर यांनी दिली.
कोरोनाबाधित रुग्ण हा सातारच्या ग्रामीण भागातील असून वाळकेश्वर, मुंबई येथे मागील १४ वर्षापासून खाजगी कारचालक म्हणून एकटा राहत होता. ८ मार्च २०२० रोजी टेम्पोने गावी आला. दोन दिवसांपूर्वी ताप व सर्दी खोकल्याचा त्रास होत असल्याने जिल्हा रुग्णालयात दाखल झाला होता. त्यास मधूमेहाचा त्रास असून त्यावर उपचार सुरू आहेत. सद्यस्थितीत त्याची प्रकृती स्थिर असुन त्यावर मार्गदर्शक सुचनांनुसार कोरोना संसर्गाचे उपचार सुरू आहेत. या कोरानाबाधित रुग्णाच्या संपर्कातील सर्व निकट सहवासितांची माहिती घेऊन पुढील कार्यवाही करण्यात येत आहे, असे त्यांनी सांगितले.
सांगली पोलीस अधीक्षक कार्यालयाकडून प्राप्त झालेल्या यादीनुसार मरकज काळात दिल्ली येथे भेट दिल्याने सातारा जिल्ह्यातील २५ ते २७ वयोगटातील ४ पुरुषांना आज कोविड- 19 अनुमानित म्हणून जिल्हा रुग्णालयातील विलगीकरण कक्षात दाखल करण्यात आले आहे. तसेच कृष्णा मेडिकल कॉलेज, कराड येथे १ ते ८५ वयोगटातील ५ पुरुष व १ महिला अशा ६ नागरिकांना श्वसन संस्थेच्या तीव्र जंतूसंसर्गामुळे विलगीकरण कक्षात दाखल करण्यात आले असून यातील ३० वर्षाचा पुरुष हा कोरोनाबाधित रुग्णांचा निकट सहवासित असल्याचे निदर्शनास आले आहे. तसेच परदेश प्रवास करुन आलेल्या एका ६७ वर्षीय पुरुषासदेखील विलगीकरण कक्षात दाखल केले आहे. या सर्व ११ नागरिकांच्या घशातील स्त्रावांचे नमुने एनआयव्ही, पुणे येथे पाठविण्यात येत असून सर्वांची प्रकृती स्थिर आहे.
उदयनराजे यांना मतदान करून गादीचा सन्मान ठेवा |
जपानचे स्लिम लँडर तिसऱ्यांदा जागृत |
कोल्हापुरातील अंबाबाईच्या रथोत्सव |
छत्रपतींच्या वंशजांना जावळीचा स्वाभिमान सांगू नका |
माझ्याकडे विरोधकांच्या अनेक भानगडी |
महाभकास आघाडीला निवडणुकीत जागा दाखवा |
साताऱ्यात मेघगर्जनेसह बरसल्या पावसाच्या सरी |
जनता बँकेत पुर्नगठीत बोर्ड ऑफ मॅनेजमेंटच्या चेअरमनपदी विनोद कुलकर्णी |
बोंडारवाडीसह धरणांची कामे मार्गी लावणार उदयनराजेंचे आश्वासन |
दलित महासंघ,पॅंथरचा उदयनराजेंना जाहीर पाठींबा |
सातारकरांना बाहेरच्यांनी स्वाभिमान शिकवू नये |
साताऱ्यात कोट्यावधीची कामे हीच आपली जमेची बाजू |
जुगार प्रकरणी एकावर कारवाई |
नोकरीच्या अमिषाने सुमारे पावणे सहा लाखांची फसवणूक |
शहरातील दोन वेगवेगळ्या घटनांमध्ये दोनजण बेपत्ता |
महाभकास आघाडीला निवडणुकीत जागा दाखवा |
साताऱ्यात मेघगर्जनेसह बरसल्या पावसाच्या सरी |
जनता बँकेत पुर्नगठीत बोर्ड ऑफ मॅनेजमेंटच्या चेअरमनपदी विनोद कुलकर्णी |
बोंडारवाडीसह धरणांची कामे मार्गी लावणार उदयनराजेंचे आश्वासन |
दलित महासंघ,पॅंथरचा उदयनराजेंना जाहीर पाठींबा |
सातारकरांना बाहेरच्यांनी स्वाभिमान शिकवू नये |
साताऱ्यात कोट्यावधीची कामे हीच आपली जमेची बाजू |
जुगार प्रकरणी एकावर कारवाई |
नोकरीच्या अमिषाने सुमारे पावणे सहा लाखांची फसवणूक |
शहरातील दोन वेगवेगळ्या घटनांमध्ये दोनजण बेपत्ता |
विवाहितेला आत्महत्येस प्रवृत्त केल्याप्रकरणी पती विरुध्द गुन्हा |
शाहूनगर येथे घरफोडी |
पंतप्रधान मोदी यांची सभा म्हणजे उदयनराजे यांच्या विजयाची नांदी |
वाट कशाची पाहता? कामाला लागा |
साताऱ्यात आरटीई प्रवेशासाठी पालकांचा कमी प्रतिसाद |