03:02am | Jul 20, 2019 |
बेंगळुरू : कर्नाटकातील राजकीय नाट्याचा आज देखील समारोप न झाल्याने ते सुरूच राहणार असल्याचे दिसत आहे. विधानसभेचे कामाकाज सोमवार २२ जुलैपर्यंत स्थगित करण्यात आले आहे. राज्यपालांनी सांगितल्याप्रमाणे मुख्यमंत्री कुमारस्वामी सरकारने सायंकाळी सहा वाजेपर्यंत देखील बहुमत सिद्ध केले नाही.
सभापतींनी सोमवारपर्यंत सभागृहाचं कामकाज तहकूब केल्याने आता सोमवारीच कुमारस्वामी सरकारच्या भवितव्याचा फैसला होणे अपेक्षित आहे. दरम्यान, आमचं सरकार सोमवारी विश्वासदर्शक ठरावाला सामोरं जाईल, असे काँग्रेस विधीमंडळ नेते एस. सिद्धरामय्या यांनी स्पष्ट केले.
कर्नाटकातील जेडीएस-काँग्रेस आघाडी सरकारला बहुमताची अग्निपरीक्षा द्यावी लागणार असून विधानसभेचे सभापती के. आर. रमेश हे आजच विश्वासदर्शक ठरावावर मतदान घेतील, अशी अपेक्षा होती. राज्यपाल वजुभाई वाला यांनी मतदानासाठी आधी आज दुपारी दीड वाजेपर्यंतची मुदत दिली होती मात्र ही वेळ टळून गेली. त्यानंतर राज्यपालांनी सायंकाळी ६ वाजेपर्यंत मतदान घेण्याची सूचना सभापतींना चिठ्ठीद्वारे केली. मात्र सभापतींनी त्यावर कोणतीच कृती न करता आपल्या अधिकारात सभागृहाचं कामकाज सोमवारपर्यंत तहकूब केलं आहे. आता सोमवारी सकाळी ११ वाजता सभागृहाचं कामकाज सुरू होणार असून विश्वासदर्शक ठरावावरील चर्चा पुढे सुरू राहणार आहे. या चर्चेअंती सोमवारीच या ठरावावर मतदान होऊन कर्नाटकातील सत्तानाट्याचा फैसला होणे अपेक्षित आहे.
दरम्यान, कर्नाटकचे मुख्यमंत्री एच. डी. कुमारस्वामी यांनी राज्यपालांविरोधात सुप्रीम कोर्टात धाव घेतली आहे. राज्यपालांकडून विधानसभेच्या कामकाजात हस्तक्षेप होत आहे, असे नमूद करत बहुमत सिद्ध करण्यासाठी राज्यपालांकडून देण्यात आलेल्या डेडलाइनला कुमारस्वामींनी आक्षेप घेतला आहे. राज्यपालांचा हस्तक्षेप सुप्रीम कोर्टाच्या आधीच्या आदेशाचं उल्लंघन करणारा आहे, असा दावाही कुमारस्वामी यांनी याचिकेत केला आहे. सुप्रीम कोर्टाने कर्नाटकातील १५ बंडखोर आमदारांना सभागृहाच्या कामकाजात भाग घेण्याची परवानगी दिली आहे. हा आदेशही स्पष्ट करून सांगावा, अशी विनंती कुमारस्वामी यांनी केली आहे.
शाहूपुरी पोलिस ठाण्याच्या हद्दीत आढळला अनोळखी पुरुषाचा मृतदेह |
सातारा शहरातून दोनजणी बेपत्ता |
डॉ आंबेडकर जयंती समारोह अध्यक्षपदी संजय गाडे यांची निवड |
शरद पवारांच्या डावपेचाकडे महाराष्ट्राचे लक्ष |
कराडला रविवारी इंडिया आघाडीचा मेळावा |
पश्चिम महाराष्ट्रात दि. २९ ते ३१ पर्यंत महावितरणचे वीजबिल भरणा केंद्र सुरू |
करंजे पेठतील थकबाकीदाराची पालिकेकडून मालमत्ता केली सील |
साताऱ्यात लोकसभेबाबत शुक्रवारी शरद पवारांची बैठक |
जमिनीच्या वादातून धारदार शस्त्राने एकाचा खून |
लोकसभा सार्वत्रिक निवडणूक-2024 |
कोल्हापूरला निघालेली खासगी ट्रॅव्हल्स झाली पलटी |
पुण्यातील पीएमटीच्या बसचालकाची सोनगाव येथे आत्महत्या |
झाड मारल्याप्रकरणी सातार्यात दोन गुन्हे दाखल |
अदानी ग्रुपचा वीज प्रकल्प रद्द करण्याठी प्रकल्पग्रस्त जिल्हाधिकारी कार्यालयावर काढणार मोर्चा |
प्रतापसिंह नगरात अतिक्रमणांसह लल्लन आणि युवराजच्या दहशतीवर जिल्हा प्रशासनाचा बुलडोझर |

पाच नॅशनल पुरस्कार मिळवून श्लोक घोरपडे कोल्हापूर येथील स्पर्धेत मारणार बाजी |
'आयडियल' मतदारसंघाचे 'आयडॉल' आमदार |
आचारसंहिता काळात लोकशाही दिनाचे आयोजन होणार नाही : नागेश पाटील |
पोक्सोंतर्गत एकावर गुन्हा |
कुऱ्हाडीने वार केल्या प्रकरणी एकावर गुन्हा |