कराड : युपीएससीमध्ये उत्तीर्ण होणे हे खूप खडतर प्रवासाचे प्रतीक आहे. मराठी मुलं या परिक्षेत कमी प्रमाणात यशस्वी होतात. त्या यशाबरोबर भारतीय पोलिस सेवेत मराठी विद्यार्थ्यांचे यश नक्कीच कौतुकास्पद आहे. या सेवेत गिरीश यादवने मराठीचा झेंडा रोवला ही कामगिरी गौरवास्पद आहे. असे मत भारती विद्यापीठाचे उपाध्यक्ष डॉ. इंद्रजीत मोहिते यांनी व्यक्त केले. येरवळे (ता. कराड) येथील गिरीश अशोकराव यादव याने युपीएससी परिक्षेत यश मिळवलेबद्दल त्याचा गौरव करताना ते बोलत होते.
यावेळी येरवळेचे सरपंच सुभाषराव पाटील, ऍड. अरुण जाधव , अशोकराव यादव, यशवंतराव मोहिते नागरी सहकारी पतसंस्थेचे चेअरमन प्रमोद पाटील, व्हाईस चेअरमन जयवंतराव मोरे, सचिव गणेश गरुड, शिवाजी पाटील, राजेंद्र महिंद यांची उपस्थिती होती.
डॉ.इंद्रजीत मोहिते म्हणाले, गिरीशचे यश ग्रामीण भागातील उमद्या पिढीला प्रेरणादायी ठरणारे आहे. आजकाल समाजात अज्ञानाच्या बाजूने पारडे जड झाले आहे. यामुळे सामाजीक परिवर्तनाची प्रक्रिया म्हणावी तितकी गतीने चालत नाही. ती मंदावल्यामुळे ग्रामीण विकासाचा अर्थिक विकासाचा दरदेखील वाढत नाही. ज्ञानी आणि अज्ञानी लोकांचा समतोल साधण्याचा गिरीशसारख्या यशस्वी आयडॉल मुलांनी प्रयत्न करावा. ते म्हणाले, आपण कोठून आलो हे कधीही विसरायचे नाही. त्याबरोबर आपली मूळ पार्श्वभूमी विसरायची नाही. हे विसरले नाही तर जीवनात कधीच काही कमी पडणार नाही. पराभवाला घाबरुन जायचे नाही. भारतीय संविधानाच्या बाहेर जावून कामकाज करायचे नाही. असा सल्लादेखील डॉ. मोहिते यांनी गिरीशला दिला. सत्कारास उत्तर देताना गिरीश यादव म्हणाले, माझ्याप्रमाणे आपल्या भागामध्ये यशस्वी झालेल्या सहकाऱयांच्या मदतीने नवीन पिढीला योग्य दिशा देवू. माझे आई-वडील हे माझे प्रेरणास्त्रोत आहेत. मला माझी चिकाटी आणि प्रयत्न उपयुक्त ठरले.
शाहूपुरी पोलिस ठाण्याच्या हद्दीत आढळला अनोळखी पुरुषाचा मृतदेह |
सातारा शहरातून दोनजणी बेपत्ता |
डॉ आंबेडकर जयंती समारोह अध्यक्षपदी संजय गाडे यांची निवड |
शरद पवारांच्या डावपेचाकडे महाराष्ट्राचे लक्ष |
कराडला रविवारी इंडिया आघाडीचा मेळावा |
पश्चिम महाराष्ट्रात दि. २९ ते ३१ पर्यंत महावितरणचे वीजबिल भरणा केंद्र सुरू |
करंजे पेठतील थकबाकीदाराची पालिकेकडून मालमत्ता केली सील |
साताऱ्यात लोकसभेबाबत शुक्रवारी शरद पवारांची बैठक |
जमिनीच्या वादातून धारदार शस्त्राने एकाचा खून |
लोकसभा सार्वत्रिक निवडणूक-2024 |
कोल्हापूरला निघालेली खासगी ट्रॅव्हल्स झाली पलटी |
पुण्यातील पीएमटीच्या बसचालकाची सोनगाव येथे आत्महत्या |
झाड मारल्याप्रकरणी सातार्यात दोन गुन्हे दाखल |
अदानी ग्रुपचा वीज प्रकल्प रद्द करण्याठी प्रकल्पग्रस्त जिल्हाधिकारी कार्यालयावर काढणार मोर्चा |
प्रतापसिंह नगरात अतिक्रमणांसह लल्लन आणि युवराजच्या दहशतीवर जिल्हा प्रशासनाचा बुलडोझर |

पाच नॅशनल पुरस्कार मिळवून श्लोक घोरपडे कोल्हापूर येथील स्पर्धेत मारणार बाजी |
'आयडियल' मतदारसंघाचे 'आयडॉल' आमदार |
आचारसंहिता काळात लोकशाही दिनाचे आयोजन होणार नाही : नागेश पाटील |
पोक्सोंतर्गत एकावर गुन्हा |
कुऱ्हाडीने वार केल्या प्रकरणी एकावर गुन्हा |