04:33pm | Jan 30, 2019 |
सातारा (संग्राम निकाळजे) : देशाच्या अर्थव्यवस्थेला हादरवून टाकणारा घोटाळा ‘कोब्रा पोस्ट’ या इन्व्हेस्टिगेटिव्ह पोर्टलने उघडकीस आणला असून यामुळे आर्थिक, राजकीय क्षेत्रेही हादरुन गेली आहेत. जनतेच्या मालकीचे सुमारे 31 हजार कोटी रुपये सरकारी बँकांच्या माध्यमातून असुरक्षित कर्जाच्या स्वरुपात घेवून तो पैसा इतर देशातील शेल कंपन्यांमध्ये गुंतवण्यात आल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे. ‘सातारा टुडे’ने नुकतेच उघडकीस आणलेल्या महाबळेश्वर हेलिकॉप्टर कांडातील संशयित धीरज वाधवा या उद्योजकाने हा घोटाळा केल्याचा दावा ‘कोब्रा पोस्ट’ने केला आहे.
7 नोव्हेंबर 2018 रोजी डीएचएफएलच्या धीरज वाधवा व उद्योगपती मुकेश अंबानी यांनी ऐन दिवाळीत लक्ष्मी पूजनाच्या पूर्वसंध्येला महाबळेश्वरमधील शासकीय भाडेपट्टा मिळकत असलेल्या उद्योजक अविनाश भोसले यांच्या फोर ओक्स या बंगल्यात जिल्हा प्रशासनाची परवानगी न घेता हेलिकॉप्टरचे लॅण्डिंग तसेच टेक ऑफ (उड्डाण) केले होते. याची कुणकुण महाबळेश्वर पोलीस ठाण्याचे तत्कालीन पोलीस निरीक्षक दत्तात्रय नाळे यांना लागल्यानंतर त्यांनी यासंदर्भात महाबळेश्वर तहसिल कार्यालयाशी पत्रव्यवहार केला होता. मात्र यानंतर ना तहसिलदार कार्यालयाने, ना जिल्हाधिकारी कार्यालयाने याबाबत कोणतीही कारवाई केली. याबाबत चकार शब्दही उच्चारला नाही. त्यामुळे ‘दाल में कुछ काला हैं’ अशी परिस्थिती निर्माण झाली होती. परंतू कालपासून ‘सातारा टुडे’ने यासंदर्भात आवाज उठवल्यामुळे जिल्हा प्रशासनाची तंतरली आहे. सुमारे दोन महिने उलटूनसुद्धा महाबळेश्वर हेलिकॉप्टर कांडासंदर्भात जिल्हा प्रशासनाने अद्याप कोणतीही ठोस भूमिका जाहीर केलेली नाही. बॉम्बे एन्वार्यन्मेंट एक्शन ग्रुपच्या श्रीमती हेमा रमाणी यांनी दि. 31 मे 2018 रोजी पाचगणी येथे विनापरवानगी हेलिकॉप्टरचे लॅण्डिंग व टेक ऑफ करणारे उद्योगपती वाल्मिकी केंद्रे व दोराब पेशोतन दुभाष यांच्याविरोधात ‘डीसीजीए’कडे तक्रार केली होती. त्यानुसार त्या दोघांवरही पाचगणी पोलीस ठाण्यात सुमारे सहा महिन्यांनंतर गुन्हा दाखल करण्यात आला होता.
मात्र, फोर ओक्स हेलिकॉप्टर कांड प्रकरणात वाधवा, अंबानी जिल्हा प्रशासन व शासनाचे जावई आहेत काय? असा प्रश्न महाबळेश्वरमधील सामाजिक कार्यकर्ते विचारत आहेत. कायदा हा सर्वांना समान असतो. मग वाधवा-अंबानींना वेगळा कायदा आहे काय, आणि जर असेल तर याचा खुलासा जिल्हा प्रशासनाने करायला हवा. सुमारे दोन महिने उलटूनसुद्धा फोर ओक्स हेलिकॉप्टर कांड प्रकरणी जिल्हा प्रशासन मूग गिळून गप्प आहे. दोन महिन्यांपूर्वीच ‘डीएचएफएल’च्या धीरज वाधवा व मुकेश अंबानी यांच्यावर जिल्हा प्रशासनाने विनापरवाना हेलिकॉप्टर लॅण्डिंग, टेक ऑफ प्रकरणी गुन्हा दाखल केला असता तर धीरज वाधवा माध्यमांच्या रडारवर आला असता. सक्त वसुली संचलनालय (इडी) व इतर केंद्रीय तपास यंत्रणांच्या रडारवर डीएचएफएल ग्रुप होता. त्याचवेळी धीरज वाधवांच्या मुसक्या आवळल्या असत्या तर कदाचित दोन महिन्यांपूर्वीच देशातील सर्वात मोठा आर्थिक घोटाळा उघडकीस आला असता. ‘कोब्रा पोस्ट’ने याप्रकरणी भाजपवरही डीएचएफएलला मदत केल्याचा आरोप केला आहे. त्यामुळे महाबळेश्वर हेलिकॉप्टर कांडात वाधवा-अंबानींना पाठिशी घालण्यासाठी जिल्हा प्रशासनावर सरकारचा दबाव आहे काय? हेही आता तपासायला हवे.
शाहूपुरी पोलिस ठाण्याच्या हद्दीत आढळला अनोळखी पुरुषाचा मृतदेह |
सातारा शहरातून दोनजणी बेपत्ता |
डॉ आंबेडकर जयंती समारोह अध्यक्षपदी संजय गाडे यांची निवड |
शरद पवारांच्या डावपेचाकडे महाराष्ट्राचे लक्ष |
कराडला रविवारी इंडिया आघाडीचा मेळावा |
पश्चिम महाराष्ट्रात दि. २९ ते ३१ पर्यंत महावितरणचे वीजबिल भरणा केंद्र सुरू |
करंजे पेठतील थकबाकीदाराची पालिकेकडून मालमत्ता केली सील |
साताऱ्यात लोकसभेबाबत शुक्रवारी शरद पवारांची बैठक |
जमिनीच्या वादातून धारदार शस्त्राने एकाचा खून |
लोकसभा सार्वत्रिक निवडणूक-2024 |
कोल्हापूरला निघालेली खासगी ट्रॅव्हल्स झाली पलटी |
पुण्यातील पीएमटीच्या बसचालकाची सोनगाव येथे आत्महत्या |
झाड मारल्याप्रकरणी सातार्यात दोन गुन्हे दाखल |
अदानी ग्रुपचा वीज प्रकल्प रद्द करण्याठी प्रकल्पग्रस्त जिल्हाधिकारी कार्यालयावर काढणार मोर्चा |
प्रतापसिंह नगरात अतिक्रमणांसह लल्लन आणि युवराजच्या दहशतीवर जिल्हा प्रशासनाचा बुलडोझर |
पश्चिम महाराष्ट्रात दि. २९ ते ३१ पर्यंत महावितरणचे वीजबिल भरणा केंद्र सुरू |
करंजे पेठतील थकबाकीदाराची पालिकेकडून मालमत्ता केली सील |
साताऱ्यात लोकसभेबाबत शुक्रवारी शरद पवारांची बैठक |
जमिनीच्या वादातून धारदार शस्त्राने एकाचा खून |
लोकसभा सार्वत्रिक निवडणूक-2024 |
कोल्हापूरला निघालेली खासगी ट्रॅव्हल्स झाली पलटी |
पुण्यातील पीएमटीच्या बसचालकाची सोनगाव येथे आत्महत्या |
झाड मारल्याप्रकरणी सातार्यात दोन गुन्हे दाखल |
अदानी ग्रुपचा वीज प्रकल्प रद्द करण्याठी प्रकल्पग्रस्त जिल्हाधिकारी कार्यालयावर काढणार मोर्चा |
प्रतापसिंह नगरात अतिक्रमणांसह लल्लन आणि युवराजच्या दहशतीवर जिल्हा प्रशासनाचा बुलडोझर |
पाच नॅशनल पुरस्कार मिळवून श्लोक घोरपडे कोल्हापूर येथील स्पर्धेत मारणार बाजी |
'आयडियल' मतदारसंघाचे 'आयडॉल' आमदार |
आचारसंहिता काळात लोकशाही दिनाचे आयोजन होणार नाही : नागेश पाटील |
पोक्सोंतर्गत एकावर गुन्हा |
कुऱ्हाडीने वार केल्या प्रकरणी एकावर गुन्हा |