12:15am | Aug 20, 2018 |
कोरेगाव : नगराध्यक्ष राजाभाऊ बर्गे यांच्यासह तब्बल बारा नगरसेवकांच्या अनुपस्थितीत आ. शशिकांत शिंदे यांनी कोरेगाव शहराच्या विविध विकासकामांचा आढावा घेतला. कोरेगाव नगरपंचायतीत झालेल्या या बैठकीस राष्ट्रवादीचे संजय पिसाळ, उपनगराध्यक्ष जयवंत पवार, नगरसेवक नागेश कांबळे हे तीनच नगरसेवक उपस्थित राहिले, तर नवनाथ बर्गे, किशोर बर्गे, जाधव, फडतरे असे चारजण नगरसेविकांचे पती म्हणून उपस्थित राहिले. सर्व मिळून सातजणांनी नगरसेवक किंवा नगरसेविकांचे प्रतिनिधी म्हणून आमदारांच्या नेतृत्वाखालील कोरेगाव शहराच्या विविध विकासकामांच्या आढावा बैठकीस हजेरी लावल्यामुळे आ. शशिकांत शिंदे यांच्या नेतृत्वाखालील कोरेगावची राष्ट्रवादीची सत्ता संपुष्टात आल्याचे निदर्शनास आले.
याबाबत अधिक माहिती अशी की, शनिवार दि. 18 रोजी आ. शशिकांत शिंदे यांनी कोरेगाव नगरपंचायतीमध्ये कोरेगाव शहरातील विविध विकासकामांचा आढावा घेण्यासाठी नगरपंचायतीच्या सभागृहात दुपारी 2 ते 4 या वेळेत नगरसेवक, पदाधिकारी, अधिकारी, प्रमुख कार्यकर्त्यांची संयुक्त बैठक घेतली. या बैठकीला राष्ट्रवादीचे नगराध्यक्ष राजाभाऊ बर्गे यांनी अनुपस्थित राहून आमदारांच्या विरोधात बंडाचा झेंडा रोवला. राजाभाऊ बर्गे यांच्या कृतीला राष्ट्रवादीचे येवले यांच्यासहित काँग्रेसच्या आठ नगरसेवकांनीही अनुपस्थित राहून समर्थन दिले. या बैठकीला काँग्रेस आणि राष्ट्रवादीच्या नगरसेवकांनी दाखवलेल्या या अनुपस्थितीमुळे कोरेगाव नगरपंचायतीमधील राष्ट्रवादी काँग्रेसची आणि आ. शशिकांत शिंदे यांची सत्ता संपुष्टात आल्याचे चित्र निर्माण झाले आहे.
दोन वर्षापूर्वी आ. शिंदे यांची राष्ट्रवादीची सत्ता कोरेगाव नगरपंचायतीमध्ये अस्तित्वात आली. त्यावेळी नगराध्यक्षांच्या निवडीवेळी मोठा संघर्ष निर्माण झाला होता. आ. शिंदे यांचे कट्टर समर्थक असलेले संजय पिसाळ यांना प्रथम नगराध्यक्ष करायचे की कोरेगाव शहरातील बहुसंख्यांक असलेल्या बर्गे समुदायाला संधी देण्यासाठी राजाभाऊ बर्गे यांना प्रथम नगराध्यक्ष करायचे, असा मोठा अंतर्गत संघर्ष झाला होता. त्यावेळच्या राजकीय परिस्थितीची गरज ओळखून आ. शिंदे यांनी केवळ सात महिन्यांसाठी राजाभाऊ बर्गे यांना नगराध्यक्षपदाची संधी दिली आणि सात महिन्यानंतर संजय पिसाळ यांना नगराध्यक्षपदाची संधी द्यायचे ठरले.
मात्र सात महिने नगराध्यक्षपदी विराजमान झाल्यानंतर आठव्या महिन्यापासून नगराध्यक्ष पदावरुन पायउतार होण्यास राजाभाऊ बर्गे यांनी नकार दिला. तब्बल सव्वा वर्षानंतर आ. शिंदे यांनी संजय पिसाळ यांना नगराध्यक्ष करण्यासाठी राजाभाऊ बर्गे यांचा राजीनामा मागितला. परंतू राजीनामा देण्यास राजाभाऊ बर्गे यांनी नकार दिला. उलट आमदार शशिकांत शिंदे यांना आव्हान देवून राष्ट्रवादीच्या मोजक्या नगरसेवकांसहित नगराध्यक्षपद टिकविण्यासाठी राष्ट्रीय काँग्रेसच्या आठ नगरसेवकांबरोबर युती केली. त्यामुळे आजमितीला आ. शिंदे विरुद्ध राजाभाऊ बर्गे असा राजकीय संघर्ष कोरेगाव शहरात निर्माण झाल्याने आणि नगराध्यक्ष राजाभाऊ बर्गे यांना स्विकृत सदस्यांसह आठ नगरसेवकांची साथ मिळाल्याने आ. शशिकांत शिंदे यांच्या नेतृत्वाखालील कोरेगावातील राष्ट्रवादी काँग्रेसची सत्ता संपुष्टात आल्याचे चित्र कोरेगाव शहरात निर्माण झाले आहे.
या राजकीय संघर्षामुळेच शनिवार दि. 18 रोजी आ. शिंदे यांच्या नेतृत्वाखालील महत्त्वपूर्ण बैठकीस 19 नगरसेवकांपैकी केवळ सातच नगरसेवक अथवा त्यांचे प्रतिनिधी उपस्थित राहिले. हा आमदार शिंदे यांना मोठा राजकीय धक्का आणि झटका मानला जात आहे.
सातारा शहरातील लल्लन टोळीवर मोक्का कारवाई |
कृष्णा खोरे महामंडळामुळे दुष्काळी भागात पाणी : उदयनराजे भोसले |
लोकसभा निवडणुकीच्या मतदानाची वेळ वाढवून मिळावी |
सूर्योदयाच्या मुहूर्तावर हनुमान जन्मोत्सव साजरा |
सणबूरच्या यात्रेत कुस्तीच्या फडात आग्या मोहोळाचा हल्ला |
उदयनराजेंच्या पत्नी दमयंतीराजेंचा काँग्रेसवर गंभीर आरोप |
वाई, जावळी तालुक्यात अवकाळी पाऊस |
अल्पवयीन मुलीवर अत्याचार करणाऱ्या युवकाला सश्रम कारावास |
उदयनराजे यांनी घेतले वाईच्या महागणपतीचे दर्शन |
तरुणांच्या भवितव्यासाठी मोदींच्या नेतृत्वाखाली स्थिर सरकार निवडून देऊया उदयनराजे यांचे आवाहन |
पाण्याच्या मोटरची चोरी |
सिव्हिल हॉस्पिटलच्या पार्किंगमधून दुचाकीची चोरी |
चैन स्नॅचिंग प्रकरणी दोन अज्ञातांवर गुन्हा |
अपघातात जखमी केल्याप्रकरणी एकावर गुन्हा |
अवैध दारु प्रकरणी दोघांवर कारवाई |
उदयनराजेंच्या पत्नी दमयंतीराजेंचा काँग्रेसवर गंभीर आरोप |
वाई, जावळी तालुक्यात अवकाळी पाऊस |
अल्पवयीन मुलीवर अत्याचार करणाऱ्या युवकाला सश्रम कारावास |
उदयनराजे यांनी घेतले वाईच्या महागणपतीचे दर्शन |
तरुणांच्या भवितव्यासाठी मोदींच्या नेतृत्वाखाली स्थिर सरकार निवडून देऊया उदयनराजे यांचे आवाहन |
पाण्याच्या मोटरची चोरी |
सिव्हिल हॉस्पिटलच्या पार्किंगमधून दुचाकीची चोरी |
चैन स्नॅचिंग प्रकरणी दोन अज्ञातांवर गुन्हा |
अपघातात जखमी केल्याप्रकरणी एकावर गुन्हा |
अवैध दारु प्रकरणी दोघांवर कारवाई |
वाहनावर विनापरवाना स्पिकर लावल्याप्रकरणी एकावर कारवाई |
सातारा लोकसभेसाठी एकूण १६ उमेदवार रिंगणात |
उमेदवारांच्या निवडणुक खर्चाची नोंदवही तपासण्याचे वेळापत्रक जाहीर ; जिल्हा निवडणूक निर्णय अधिकारी डुडी |
छत्रपती संभाजी महाराज शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालयतर्फे विविध आरोग्यविषयक उपक्रमांचे आयोजन |
प्लास्टिक पाईपने बेदम मारहाण करून युवकाचा केला निर्घृण खून |