सातारा : सातारा जिल्हा परीषदेच्या स्वमालकीच्या मैदानावर रचना-2019 हा कार्यक्रम आयोजित केला होता. परंतु सातारा बिल्डर असोशिएनने वीस दिवस या मैदानाचा वापर करून जिल्हा परीषदेची रक्कम भरली नाही. ज्या कारणासाठी अनामत रक्कम भरली होती. त्यानंतरही मैदानाचा ताबा दिला नसल्यामुळे अखेर सातारा बिल्डर असोशिएनला रचना-2019 करीता जिल्हा परीषदेच्या बांधकाम विभागाने कारवाईची नोटीस बजावली आहे. या घटनेने खळबळ माजली आहे. बिल्डर असोशिएनच्या या कार्यक्रमाची इतर विभागानेही चौकशी करावी अशी मागणी पुढे येवू लागली आहे.
सातारा जिल्हा परीषदेचे मुख्यकार्यकारी अधिकारी डॉ. कैलास शिंदे यांनी याबाबत लक्ष वेधून घेतल्यानंतर बांधकाम विभाग (उत्तर) यांनी नोटीस पाठवली आहे. दि. 13 डिसेंबर रोजी बिल्डर असोशिएशनने सातारा जिल्हा परीषदेकडे मैदान रचना-2019 साठी भाडे तत्वावर मिळावे यासाठी अर्ज केला होता. दि. 28 जानेवारी रोजी पासून हे मैदान वापरण्यासाठी परवानगी दिली होती. परंतु बिल्डर असोशिएशनने दि. 20 जानेवारी पासून या मैदानाचा ताबा घेवून साहित्या काम मंडप उभारणीचे काम सुरू केले होते. तसेच या ठिकाणी स्वच्छता राखली गेली नव्हती. सदरची बाब जागरूक नागरीकांनी जिल्हा परीषदेच्या मुख्यकार्यकारी अधिकारी यांच्याकडे कळविल्यानंतर याबाबत त्यांनी लक्ष घातले. त्यानंतर 23 जानेवारी रोजी श्रीमती शेख सहा. अभियंता शेख व कार्यकारी अभियंता बांधकाम विभाग एस. आर. पाटील यांनी सातारा बिल्डर असोशिएशनला कारवाईची नोटीस बजावली आहे. इथूनपुढे जिल्हा परीषदेच्या भाड्याबाबतची पूर्ण खात्री झाल्याशिवाय मागणीदारास देण्यात येवू नये याची दक्षता घेण्यात यावी अशा शब्दात सातार्यातील बिल्डर असोशिएशनला खडसावले आहे.
सातार्यातील काही बांधकाम व्यवसायीकांनी अशा प्रकारचे रचना-2019 प्रदर्शन भरवले होते. राजकीय हितसंबधामुळे आपणाला कोणीही जाब विचारणार नाही, अशा भ्रमात असलेल्या सातारा बिल्डर असोशिएशनला जिल्हा परीषदेच्या बांधकाम विभागाने झटका दिला असल्यामुळे सामान्य जनतेकडन समाधान व्यक्त केले जात आहे. प्रामाणिक व्यसायापेक्षाही ग्राहकांना वेळेत फ्लॅट न देणे, अर्पाटमेंटचे बांधकाम अपूर्ण ठेवणे, सांडपाण्याची व्यवस्था न करणे तसेच 24 तास पाणी असल्याचे सांगून ग्राहकांची फसवणुुक करणे अशा गंभीर आरोपांमुळे काही व्यवसायीक बदनाम झाले आहेत. आता जिल्हा परीषदेच्या मैदानाचा जादा वापर करून पैसे न भरणे, स्वच्छता न ठेवणे या कारणांसाठी बिल्डर असोशिएशन चर्चेत आली आहे.
पंतप्रधान मोदी यांची सभा म्हणजे उदयनराजे यांच्या विजयाची नांदी |
वाट कशाची पाहता? कामाला लागा |
साताऱ्यात आरटीई प्रवेशासाठी पालकांचा कमी प्रतिसाद |
अफवांवर नाही, हवामान खात्यावर विश्वास ठेवा : हवामान खात्याचे प्रमुख सुनील कांबळे |
घोटाळेबाजांशी कायम लढत राहणार उदयनराजे गरजले |
साताऱ्यातील सुप्रसिद्ध डॉ. रविंद्र हर्षे यांचे दुःखद निधन |
भाजप देशाचे भविष्य तर काँग्रेस भूतकाळ उदयनराजे भोसले यांचा टोला |
कृष्णाबाई यात्रा महोत्सवाचा पालखी मिरवणुकीने शुभारंभ |
गंभीर गुन्हे करणार्या चौघांच्या टोळीला तडीपारीचा दणका |
बेकायदा दारु विक्रीप्रकरणी एकावर कारवाई |
आदेशाचे उल्लंघन केल्याप्रकरणी पाचजणांवर गुन्हा |
अपघातात जखमी केल्याप्रकरणी दुचाकी चालकावर गुन्हा |
वेगवेगळ्या घटनांमध्ये दोनजणी बेपत्ता |
सातारा शहरातील लल्लन टोळीवर मोक्का कारवाई |
कृष्णा खोरे महामंडळामुळे दुष्काळी भागात पाणी : उदयनराजे भोसले |
साताऱ्यातील सुप्रसिद्ध डॉ. रविंद्र हर्षे यांचे दुःखद निधन |
भाजप देशाचे भविष्य तर काँग्रेस भूतकाळ उदयनराजे भोसले यांचा टोला |
कृष्णाबाई यात्रा महोत्सवाचा पालखी मिरवणुकीने शुभारंभ |
गंभीर गुन्हे करणार्या चौघांच्या टोळीला तडीपारीचा दणका |
बेकायदा दारु विक्रीप्रकरणी एकावर कारवाई |
आदेशाचे उल्लंघन केल्याप्रकरणी पाचजणांवर गुन्हा |
अपघातात जखमी केल्याप्रकरणी दुचाकी चालकावर गुन्हा |
वेगवेगळ्या घटनांमध्ये दोनजणी बेपत्ता |
सातारा शहरातील लल्लन टोळीवर मोक्का कारवाई |
कृष्णा खोरे महामंडळामुळे दुष्काळी भागात पाणी : उदयनराजे भोसले |
लोकसभा निवडणुकीच्या मतदानाची वेळ वाढवून मिळावी |
सूर्योदयाच्या मुहूर्तावर हनुमान जन्मोत्सव साजरा |
सणबूरच्या यात्रेत कुस्तीच्या फडात आग्या मोहोळाचा हल्ला |
उदयनराजेंच्या पत्नी दमयंतीराजेंचा काँग्रेसवर गंभीर आरोप |
वाई, जावळी तालुक्यात अवकाळी पाऊस |