07:47pm | Jul 13, 2018 |
सातारा : नागरिकांपर्यंत विविध शासकीय योजना सर्वदूर पोहोचवण्यात माहिती व जनसंपर्क महासंचालनालयाचा संवाद वारी उपक्रम महत्वपूर्ण भूमिका बजावेल, असा विश्वास जिल्हाधिकारी श्वेता सिंघल यांनी व्यक्त केला.
लोणंद शासकीय विश्रामगृह येथे माहीती व जनसंपर्क महासंचालनालयाच्या वतीने आयोजित संवाद वारी उपक्रमाचे उद्घाटन श्रीमती सिंघल यांच्या हस्ते फीत कापून करण्यात आले. याप्रसंगी त्या बोलत होत्या. यावेळी पोलीस अधीक्षक संदीप पाटील, शिवाजी विद्यापीठाचे कुलगुरू डॉ. देवानंद शिंदे, अपर जिल्हाधिकारी साहेबराव गायकवाड, वाई-खंडाळ्याच्या उपविभागीय अधिकारी अस्मिता मोरे , खंडाळ्याचे तहसीलदार विवेक जाधव तसेच प्रशासनातील सर्व वरिष्ठ अधिकारी व मोठ्या संख्येने वारकरी उपस्थित होते.
जिल्हाधिकारी श्रीमती सिंघल म्हणाल्या, नागरिकांच्या विकासासाठी राज्य शासन विविध कल्याणकारी योजना राबविते. संवाद वारीच्या माध्यमातून चित्र प्रदर्शन, चित्ररथ, एलईडी व्हॅन तसेच कलापथक व पथनाट्य या माध्यमातून पंढरपूर पर्यंत वारकरी व नागरिकांपर्यंत या योजनांची माहिती पोहोचवण्यात येणार आहे. या माहितीचा उपयोग करुन कुटुंबाचा व गावचा विकास साधावा, असे आवाहनही त्यांनी यावेळी केले. संत ज्ञानेश्वर महाराज पालखी सोहळ्यासाठी सातारा जिल्हा प्रशासन सज्ज आहे,असे सांगून प्रशासनाच्या वतीने सुरु करण्यात आलेला वारी अँप, मार्गदर्शक पुस्तिका व अन्य उपक्रमांचीही माहिती श्रीमती सिंघल यांनी दिली.
संवाद वारीद्वारे योजनांची माहिती देण्याचा हा स्तुत्य उपक्रम आहे, असे सांगून पोलीस अधीक्षक संदीप पाटील म्हणाले, आषाढी वारी काळात पोलीस प्रशासनाने चोख सुरक्षा व्यवस्था तैनात केली आहे.
कोल्हापूरच्या शिवाजी विद्यापीठाचे कुलगुरु डॉ.देवानंद शिंदे यांनीही यावेळी मनोगत व्यक्त केले.यावेळीउपस्थित मान्यवरांनी चित्र प्रदर्शन, एलईडी व्हॅन, चित्ररथाची पाहणी केली. तसेच कलापथक व पथनाट्याचा मनमुराद आनंद लुटला. यावेळी सादर करण्यात आलेल्या पोवाडे व पथनाट्याला उपस्थित वारकऱ्यांनी टाळ्यांच्या कडकडाटात भरभरुन दाद दिली.
संशयित माल जवळ बाळगल्याप्रकरणी एकावर गुन्हा |
राहत्या घरातून युवती बेपत्ता |
वाई, जावळी परिसरात जोरदार अवकाळी पाऊस |
विरोधकांच्या रडीच्या डावाला जनता भुलणार नाही |
महायुतीचे आज सातार्यात जोरदार शक्ती प्रदर्शन |
सातारा जिल्ह्यात राम लल्लाच्या गजराने रामनवमी साजरी |
उदयनराजे यांच्या शक्तीप्रदर्शनासाठी आमदार शिवेंद्रसिंहराजे सज्ज |
सातारा जिल्ह्यात रामनवमी उत्साहात साजरी |
उष्माघातावरील उपचारासाठी सर्व शासकीय रुग्णालयांमध्ये कक्ष स्थापन |
आदर्श आचारसंहितेच्या काटेकोरपणे अंमलबजावणीस सर्वोच्च प्राधान्य : जिल्हाधिकारी डुडी |
श्रीराम नवमी निमित्त राम ध्यान मंदिरात अर्पित कथक नृत्यलयाचा कार्यक्रम |
निवृत्तीवेतनधारक/कुटुंबनिवृत्तीवेतन धारकांना आवाहन |
विविध मोबाईल अॅपच्या माध्यमातून मतदारांना सोई- सुविधा |
45- सातारा लोकसभेसाठी 6 नामनिर्देशनपत्र दाखल |
जिल्हाधिकारी कार्यालयाबाहेरुन सव्वादोन तोळ्याच्या चैनची चोरी |

महिलेला मारहाण केल्याप्रकरणी एकावर गुन्हा |
बॉम्बे रेस्टॉरंट परिसरात आढळला बेवारस मृतदेह |
लोखंडी रॉडने मारहाण केल्याप्रकरणी तिघांवर गुन्हा |
भाजप कार्यालयात उदयनराजे यांचे स्वागत |
माझ्यावरील आरोप हा राजकीय षडयंत्राचा भाग |