01:49am | Mar 05, 2020 |
कराड : 8 मार्च 2020 रोजी जागतिक महिला दिना निमित्त कराड नगर परिषदेने विविध कार्यक्रमांचे आयोजन केले आहे याची माहिती नगराध्यक्षा सौ.रोहिणी उमेश शिंदे यांनी आज दिली.
नगरपरिषदेच्या वतीने दरवर्षी प्रमाणे यंदाही महिलांसाठी भरगच्च कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आलेले आहे. दिनांक 7 मार्च व 8 मार्च दोन दिवस हे कार्यक्रम नगर परिषदेच्या टावून हाल येथे होणार आहेत.
यावेळी बोलताना नगरध्यक्षा यांनी सांगितले कि गेली 3 वर्षे कराड नगरपरिषदेने महिला सबलीकरण व सक्षमीकरण हे उद्दिष्ट डोळया समोर ठेऊन विविध योजना राबविल्या आहेत. यामध्ये कृष्णामाई महिला समुपदेशन केंद्राची स्थापना केली असून महिला अत्याचारावर प्रतिबंध लावणे कमी तसेच कौटुंबिक कलह कमी होणेकामी वेळोवेळी अनुभवी व्यक्तीकडून समुपदेशन करण्यात आले.याचा फायदा ब-याच कुटुंबाना झाला. कायदा साक्षरता अभियाना अंतर्गत महिलासाठी विविध कायदे, तसेच अधिकार,शासकीय योजना, विशाखा समिती, निर्भया पथक, सेव्ह चाईल्ड अभियान, बेटी बचाव बेटी पढाव अभियान, लहान मुलींसाठी गुड टच बड टच यासारख्या विषयांवर महिलांना मुलीना शाळेत, कॉलेज, येथे नियमित मार्गदर्शन करण्यात आहे.
शहरातील महिलांसाठी संक्राती निमित्त हळदी कुंकू वाण वाटप असा कार्यक्रम आयोजित करतच असतो त्याचबरोबर महिलांच्या कलागुणांना वाव मिळावा यासाठी वेगवेगळ्या कार्य कर्मांचे आयोजन करण्यात येते. विशेषतः प्रसिद्ध शेफ विष्णू मनोहर यांचा कुकरी शो राबवण्यात आला. या कार्यक्रमाला प्रचंड प्रतिसाद मिळाला. त्याच बरोबर कराड नगरपरिषदेच्या महिला कर्मचारी ना तांब्याचा कलश देऊन त्यांच्या कार्याचा सन्मान करण्याची अभिनव कल्पना राबवण्यात आली. महिलांना स्वतःच्या पायावर उभे राहातायावे यासाठी न.पा.ने ब्युटी पार्लर चे बेसिक व सुधारित कोर्सं घेण्यात आले तसेच विविध कोर्सेसचे आयोजन करण्यात आले. हे सर्व प्रशिक्षण विना शुल्क करण्यात आले. त्याच बरोबर महिला व युवतीनसाठी मराठी व इंग्रजी टंकलेखनचे व संगणकाचे विविध कोर्सेस घेण्यात आले. त्याच बरोबर दुचाकी व चारचाकी वाहनांचे प्रशिक्षण राबवण्यात आले. याचा फायदा नक्कीच महिलांना झाला आहे.
वरील सर्व कार्यक्रमांचे आयोजन करताना माझ्या सहकारी नगसेविका यांची मोलाची साथ मला नेहमीच मिळत आहे. यामध्ये मशारदाताई जाधव , आशाताई मुळे, विद्याताई पावसकर, स्मिताताई हुलवान, प्रियांकाताई यादव, अंजलीताई कुंभार, मिनाजभाभी पटवेकर, अरुणाताई पाटील, अर्चनाताई ढेकळे, मायाताई भोसले काश्मीरताई इंगवले, सुप्रियाताई खराडे, अनिताताई पवार, पल्लवीताई पवार , सुनंदाताई शिंदे या सगळ्यांचा मोठा वाटा आहे. या सर्व महिला प्रतिनिधी आपआपल्या प्रभागामध्ये सक्षमपणे कार्य करत आहेत. त्याच बरोबर महिलांना न्याय हक्क मिळूऊन देण्यासाठी कार्य करीत आहेत.
येत्या 7 व 8 मार्च रोजी महिला दिन निमित्त वेग वेगळ्या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे. या कार्यक्रमाला बहुसंखेनी उपस्थित राहून कार्यक्रमाची शोभा वाढवावी अस आव्हान मी व माझ्या सर्व सहकारी नगसेविका यांच्या वातिने करत आहे.
श्री क्षेत्र निनाम येथील सासनकाठीला यात्रेत महत्वाचे स्थान |
मंदार कोल्हटकर, धिरज पाटील यांचे अपघाती निधन |
ट्रकच्या धडकेत दुचाकीस्वाराचा मृत्यू |
राजवाडा परिसरातून सव्वा लाखांच्या सोन्याच्या चैनची चोरी |
मारहाण प्रकरणी चौघांवर गुन्हा |
ट्रक चालकाला लुटल्याप्रकरणी तीन अज्ञातांवर गुन्हा |
महिलेचा विनयभंग केल्याप्रकरणी एकावर गुन्हा |
सराईत गुन्हेगाराने दिली तीन घरफोड्यांची कबुली |
उदयनराजे यांच्या समर्थनार्थ सातार्यात लोटला जनसागर |
शिक्षक हेच सुसंस्कृत समाजनिर्मितीचे जनक |
अजिंक्यतारा कारखान्यावर वादातून झाला गोळीबार |
जनता बँक साताराच्या तज्ज्ञ संचालकपदी सौरभ रायरीकर, राजेंद्र जाधव यांची निवड |
महिलेची गळफास घेवून आत्महत्या |
एकाच्या मृत्यूप्रकरणी कार चालकावर गुन्हा |
संशयित माल जवळ बाळगल्याप्रकरणी एकावर गुन्हा |
ट्रक चालकाला लुटल्याप्रकरणी तीन अज्ञातांवर गुन्हा |
महिलेचा विनयभंग केल्याप्रकरणी एकावर गुन्हा |
सराईत गुन्हेगाराने दिली तीन घरफोड्यांची कबुली |
उदयनराजे यांच्या समर्थनार्थ सातार्यात लोटला जनसागर |
शिक्षक हेच सुसंस्कृत समाजनिर्मितीचे जनक |
अजिंक्यतारा कारखान्यावर वादातून झाला गोळीबार |
जनता बँक साताराच्या तज्ज्ञ संचालकपदी सौरभ रायरीकर, राजेंद्र जाधव यांची निवड |
महिलेची गळफास घेवून आत्महत्या |
एकाच्या मृत्यूप्रकरणी कार चालकावर गुन्हा |
संशयित माल जवळ बाळगल्याप्रकरणी एकावर गुन्हा |
राहत्या घरातून युवती बेपत्ता |
वाई, जावळी परिसरात जोरदार अवकाळी पाऊस |
विरोधकांच्या रडीच्या डावाला जनता भुलणार नाही |
महायुतीचे आज सातार्यात जोरदार शक्ती प्रदर्शन |
सातारा जिल्ह्यात राम लल्लाच्या गजराने रामनवमी साजरी |