03:32am | Aug 25, 2019 |
सातारा : पानटपरी चालवत असलेल्या वृध्द महिलेकडे खंडणीची मागणी केल्यानंतर त्यास नकार दिल्याने चिडलेल्या युवकाने 10 हजार रुपये किंमतीचे मणीमंगळसूत्र जबरदस्तीने चोरुन नेले. याप्रकरणी शहर पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल झाल्यानंतर अवघ्या काही तासात अभिजीत अशोक भिसे (वय 18, रा.दत्तनगर, कोडोली) याच्या स्थानिक गुन्हे अन्वेषन विभागाच्या पथकाने (एलसीबी) मुसक्या आवळल्या. दरम्यान, संशयितावर यापूर्वीही गंभीर गुन्हे दाखल असल्याची महिती समोर आली आहे.
रत्नाबाई विलास कोरडकर (वय 60, सध्या रा.कोडोली मूळ रा.गुरसाळे जि.सोलापूर) यांनी सातारा शहर पोलिस ठाण्यात तक्रार दिली आहे.
याबाबत अधिक माहिती अशी, तक्रारदार रत्नाबाई कोरडकर या पानटपरी चालवतात. दि. 22 रोजी दुपारी 3 वाजता त्या पानटपरीमध्ये असतानाच संशयित अभिजीत भिसे हा तेथे गेला. यावेळी संशयिताने दारु पिण्यासाठी 5 हजार रुपयांची मागणी केली. एवढ्या मोठ्या रकमेची मागणी झाल्याने वृध्द घाबरली व तिने पैसे नसल्याचे सांगितले.
पैसे देण्यास नकार दिल्याने संशयित अभिजीत भिसे चिडला. त्याने महिलेला दमदाटी, शिवीगाळ करत व्यवसाय करु देणार नाही धमकी दिली. याचवेळी महिलेच्या गळ्यातील 10 हजार रुपये किंमतीचे मणीमंगळसूत्र जबरदस्तीने ओढून चोरले. या सर्व घटनेमुळे वृध्द महिला घाबरली व परिसरात दहशतीचे वातावरण झाले. घडलेल्या घटनेनंतर वृध्द महिलेने सातारा शहर पोलिस ठाण्यात धाव घेतली. घडलेल्या घटनेची माहिती दिल्यानंतर पोलिसांनी खंडणी, जबरी चोरीसह विविध कलमाअंतर्गत गुन्हा दाखल केला.
शहर पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल झाल्यानंतर एलसीबी पथकाने या प्रकरणाचा तपास करण्यास सुरुवात केली. संशयित अभिजीत भिसे याची माहिती मिळाल्यानंतर शनिवारी त्याला ताब्यात घेवून पोलिसांनी अटक केली. गुन्हा घडल्यानंतर अवघ्या काही तासात एलसीबीने ही कारवाई केल्याने वृध्द महिलेने सुसकारा सोडला. दरम्यान, संशयित हा सराईत असून त्याच्यावर यापूर्वीही गुन्हे दाखल असल्याची माहिती समोर आली आहे.
पोलिस अधीक्षक तेजस्वी सातपुते, अप्पर पोलिस अधीक्षक धीरज पाटील, पोनि विजय कुंभार यांच्या मार्गदर्शनाखाली फौजदार सागर गवसणे, पोलिस हवालदार पृथ्वीराज घोरपडे, विलास नागे, ज्योतीराम बर्गे, विनोद गायकवाड, मोहन नाचण, राजकुमार ननावरे, नितीन भोसले, योगेश पोळ, संतोष जाधव, प्रवीण कडव, गणेश कापरे, धिरज महाडीक, केतन शिंदे, वैभव सावंत, मयुर देेशमुख, मोहसिन मोमीन यांनी कारवाईत सहभाग घेतला.
गंभीर गुन्हे करणार्या चौघांच्या टोळीला तडीपारीचा दणका |
बेकायदा दारु विक्रीप्रकरणी एकावर कारवाई |
आदेशाचे उल्लंघन केल्याप्रकरणी पाचजणांवर गुन्हा |
अपघातात जखमी केल्याप्रकरणी दुचाकी चालकावर गुन्हा |
वेगवेगळ्या घटनांमध्ये दोनजणी बेपत्ता |
सातारा शहरातील लल्लन टोळीवर मोक्का कारवाई |
कृष्णा खोरे महामंडळामुळे दुष्काळी भागात पाणी : उदयनराजे भोसले |
लोकसभा निवडणुकीच्या मतदानाची वेळ वाढवून मिळावी |
सूर्योदयाच्या मुहूर्तावर हनुमान जन्मोत्सव साजरा |
सणबूरच्या यात्रेत कुस्तीच्या फडात आग्या मोहोळाचा हल्ला |
उदयनराजेंच्या पत्नी दमयंतीराजेंचा काँग्रेसवर गंभीर आरोप |
वाई, जावळी तालुक्यात अवकाळी पाऊस |
अल्पवयीन मुलीवर अत्याचार करणाऱ्या युवकाला सश्रम कारावास |
उदयनराजे यांनी घेतले वाईच्या महागणपतीचे दर्शन |
तरुणांच्या भवितव्यासाठी मोदींच्या नेतृत्वाखाली स्थिर सरकार निवडून देऊया उदयनराजे यांचे आवाहन |
सातारा शहरातील लल्लन टोळीवर मोक्का कारवाई |
कृष्णा खोरे महामंडळामुळे दुष्काळी भागात पाणी : उदयनराजे भोसले |
लोकसभा निवडणुकीच्या मतदानाची वेळ वाढवून मिळावी |
सूर्योदयाच्या मुहूर्तावर हनुमान जन्मोत्सव साजरा |
सणबूरच्या यात्रेत कुस्तीच्या फडात आग्या मोहोळाचा हल्ला |
उदयनराजेंच्या पत्नी दमयंतीराजेंचा काँग्रेसवर गंभीर आरोप |
वाई, जावळी तालुक्यात अवकाळी पाऊस |
अल्पवयीन मुलीवर अत्याचार करणाऱ्या युवकाला सश्रम कारावास |
उदयनराजे यांनी घेतले वाईच्या महागणपतीचे दर्शन |
तरुणांच्या भवितव्यासाठी मोदींच्या नेतृत्वाखाली स्थिर सरकार निवडून देऊया उदयनराजे यांचे आवाहन |
पाण्याच्या मोटरची चोरी |
सिव्हिल हॉस्पिटलच्या पार्किंगमधून दुचाकीची चोरी |
चैन स्नॅचिंग प्रकरणी दोन अज्ञातांवर गुन्हा |
अपघातात जखमी केल्याप्रकरणी एकावर गुन्हा |
अवैध दारु प्रकरणी दोघांवर कारवाई |