सातारा : कोरोना संसर्ग रोखण्यासाठी केंद्र व राज्य सरकारचे अनेक घटक परिश्रम घेत आहेत. फिल्डवर कार्यरत राहूनच राज्यस्तरीय जिल्हा परिषद अभियंता संघटनेने मुख्यमंत्री सहाय्यता निधीला दोन दिवसांचा पगार म्हणजे दोन कोटींचा निधी देऊन 'साथी हाथ बढाना' हा निर्णय घेतला असल्याची माहिती राज्याध्यक्ष अभियंता आर. वाय. शिंदे यांनी दिली आहे.
चाळीस वर्षांपूर्वी जिल्हा परिषद अभियंता संघटनेची स्थापना झाली होती.त्यावेळी कोयना भूकंपग्रस्तांना मदत करण्यात आली होती. राष्ट्रीय आपत्ती तसेच गतवर्षी झालेल्या अतिवृष्टीमुळे बाधित झालेल्या लोकांच्यासाठी संघटनेने एक कोटी रुपये पगार व दहा लाख रुपयांचा धनादेश दि ३१ ऑगस्ट १९ रोजी तत्कालीन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडे सुपूर्द केला होता.
सध्या कोरोना विषाणू संसर्ग होऊ नये. ज्यांना संसर्ग झाला आहे त्यांची काळजी घेण्यासाठी हजारोंच्या संख्येने डॉक्टर, परिचारिका, सफाई कामगार, रुग्णवाहिका चालक - मदतनीस, पोलीस, महसूल व आशा-अंगणवाडी सेविका, ग्रामसेवक, आरोग्य, प्रसारमाध्यमे, पुरवठा विभाग, शेतकरी, सामाजिक संघटना आणि वाहतूक विभाग, बांधकाम विभाग सक्रिय झाले आहेत.
या कालावधीत केंद्र व राज्य सरकारवर कमालीचा ताण पडणे स्वाभाविक आहे. जिल्हा परिषद अभियंते कर्तव्य बजावत आहेत. त्याचबरोबर समाज्याचे हे आपण देणे लागतो. या भावनेतून राज्यातील सुमारे साडेआठ हजार जिल्हा परिषद अभियंते यांनी दिन दिवसाचा मार्च - एप्रिलमधील एक-एक दिवसांचा पगार मुख्यमंत्री सहाय्यता निधीला देण्याचा निर्णय घेतला आहे. यातून सरकारच्या तिजोरीत दोन कोटी रुपये जमा होणार आहेत. मोठे संकट आले की, थोड्याफार चुका होणारच आहेत. पण, त्यातुन सर्वजण सुरक्षित राहणे गरजेचे आहे. साथी हाथ बढाना हा नारा अंमलात आणल्याचे समाधान जिल्हा परिषद अभियंत्यांना वाटत आहे. राज्याध्यक्ष आर वाय शिंदे, महासचिव सुहास धरासुरकर, कार्याध्यक्ष सतिश मारबादे, विविध जिल्ह्यातील अभियंते तसेच सातारा जिल्हाध्यक्ष अजय शितोळे, सचिव संदिप पाटील यांच्या समवेत खैरमोडे, आमले, साबळे, धनंजय पाटील, विकास चव्हाण, संजय गायकवाड, पंडित व इतर सर्व जिल्हा परिषद अभियंता यांचे सहकार्य लाभले आहे. राज्याचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे,उपमुख्यमंत्री अजित पवार,ग्रामविकासमंत्री हसन मुश्रीफ,सहकार तथा सातारा जिल्ह्याचे पालकमंत्री बाळासाहेब पाटील,राज्याचे मुख्य सचिब अजोय मेहता यांचे बहुमूल्य मार्गदर्शन लाभत आहे. त्यामुळे कोरोनावर निश्चित मात करण्यात अभियंते यश मिळविण्यासाठी खारीचा वाटा उचलत आहेत. ही कौतुकास्पद बाब ठरली आहे.
लोकसभा सार्वत्रिक निवडणूक-2024 |
कोल्हापूरला निघालेली खासगी ट्रॅव्हल्स झाली पलटी |
पुण्यातील पीएमटीच्या बसचालकाची सोनगाव येथे आत्महत्या |
झाड मारल्याप्रकरणी सातार्यात दोन गुन्हे दाखल |
अदानी ग्रुपचा वीज प्रकल्प रद्द करण्याठी प्रकल्पग्रस्त जिल्हाधिकारी कार्यालयावर काढणार मोर्चा |
प्रतापसिंह नगरात अतिक्रमणांसह लल्लन आणि युवराजच्या दहशतीवर जिल्हा प्रशासनाचा बुलडोझर |
पाच नॅशनल पुरस्कार मिळवून श्लोक घोरपडे कोल्हापूर येथील स्पर्धेत मारणार बाजी |
'आयडियल' मतदारसंघाचे 'आयडॉल' आमदार |
आचारसंहिता काळात लोकशाही दिनाचे आयोजन होणार नाही : नागेश पाटील |
पोक्सोंतर्गत एकावर गुन्हा |
कुऱ्हाडीने वार केल्या प्रकरणी एकावर गुन्हा |
अवैधरित्या दारू विक्री प्रकरणी एकावर कारवाई |
अंमली पदार्थाचे सेवन केल्याप्रकरणी एकावर गुन्हा |
राहत्या घरातून युवक बेपत्ता |
वडूज येथे बांधकाम विभागाचा अभियंता लाचलुचपतच्या जाळ्यात |
प्रतापसिंह नगरात अतिक्रमणांसह लल्लन आणि युवराजच्या दहशतीवर जिल्हा प्रशासनाचा बुलडोझर |
पाच नॅशनल पुरस्कार मिळवून श्लोक घोरपडे कोल्हापूर येथील स्पर्धेत मारणार बाजी |
'आयडियल' मतदारसंघाचे 'आयडॉल' आमदार |
आचारसंहिता काळात लोकशाही दिनाचे आयोजन होणार नाही : नागेश पाटील |
पोक्सोंतर्गत एकावर गुन्हा |
कुऱ्हाडीने वार केल्या प्रकरणी एकावर गुन्हा |
अवैधरित्या दारू विक्री प्रकरणी एकावर कारवाई |
अंमली पदार्थाचे सेवन केल्याप्रकरणी एकावर गुन्हा |
राहत्या घरातून युवक बेपत्ता |
वडूज येथे बांधकाम विभागाचा अभियंता लाचलुचपतच्या जाळ्यात |
मल्हारपेठेत शाहूपुरी पोलिसांनी पकडला पावणेदोन लाखाचा गुटखा |
आज जिल्ह्यात उदयनराजेंची होणार ग्रँड एन्ट्री |
सातारा लोकसभेवर अजितदादांच्या राष्ट्रवादीचा दावा कायम |
पाटखळ येथील नूतन तलाठी कार्यालयाचे अतिक्रमण |
मेक इन इंडिया पॉलिसीमुळे ‘मॅक्सिको’ होण्याची भीती? |