02:44am | Sep 24, 2018 |
सातारा : सदर बझार येथील हेमंतकुमार जिरेसाळ यांची नात मनस्वी जिरेसाळ हिचा दुसरा वाढदिवस काल जिरेसाळ कुटूंबियांच्यावतीने अनाठायी खर्चाला बगल देवून रिमांड होम मधील मुलांना शैक्षणिक साहित्याचे वाटप करुन साजरा करण्यात आला.
वाढदिवस म्हटले की अनाठायी खर्च आलाच! वाढदिवस असलेल्या व्यक्तीचा वाढदिवस संस्मरणीय व्हावा यासाठी कुटूंबिय काळजी घेत असतात. वाढदिवसा दिवशी गरीबातील गरीब आणि श्रीमंतांमधील श्रीमंतही सढळ हाताने खर्च करताना दिसून येतो. हजारो रुपयांपासून लाखो रुपयांचा खर्च दुसर्या दिवशी पाण्यात गेलेला पहावयास मिळतो. परंतू सामाजिक बांधिलकी जपणारी काही लोकंच वाढदिवसाच्या अनाठायी खर्चाला बगल देवून समाजोपयोगी कार्य करताना दिसून येतात. त्यातीलच एक म्हणजे सदर बझार मधील जिरेसाळ कुटूंबीय.
काल पोवई नाक्यावरील सुप्रसिद्ध अशा काटदरे मसाले शॉपीचे संचालक हेमंतकुमार जिरेसाळ यांची नात मनस्वी करण जिरेसाळ हिचा दुसरा वाढदिवस होता. परंतू जिरेसाळ कुटूंबियांनी सामाजिक बांधिलकी जपत सातारा येथील रिमांड होम मधील मुलांसमवेत मनुश्रीचा वाढदिवसाचा केक कापण्यात आला. तसेच रिमांड होम मधील मुलांना शैक्षणिक साहित्य व मिष्ठान्नाचे वाटप करण्यात आले. या उपक्रमाबद्दल रिमांड होमचे अधीक्षक यांनी जिरेसाळ यांचे आभार मानले. प्रत्येकानेच जिरेसाळ कुटूंबियांप्रमाणेच दृष्टिकोन ठेवला तर समाजामध्ये चांगला संदेश जाईल. जिरेसाळ कुटूंबाने दरवर्षी अशीच सामाजिक बांधिलकी जपावी, अशी अपेक्षा रिमांड होम अधीक्षकांनी व्यक्त केली. यावेळी श्री. हेमंतकुमार व सौ. शोभा जिरेसाळ, करण जिरेसाळ, सौ. वृषाली जिरेसाळ व वाडकर कुटूंबीय उपस्थित होते. त्यांच्या या दातृत्वाचे परिसरातून कौतुक होत आहे.
एकास मारहाण केल्याप्रकरणी पाच जणांवर गुन्हा |
सातार्यातून युवक बेपत्ता |
नागठाण्यात युवकाची आत्महत्या |
उदयनराजे यांना मतदान करून गादीचा सन्मान ठेवा |
जपानचे स्लिम लँडर तिसऱ्यांदा जागृत |
कोल्हापुरातील अंबाबाईच्या रथोत्सव |
छत्रपतींच्या वंशजांना जावळीचा स्वाभिमान सांगू नका |
माझ्याकडे विरोधकांच्या अनेक भानगडी |
महाभकास आघाडीला निवडणुकीत जागा दाखवा |
साताऱ्यात मेघगर्जनेसह बरसल्या पावसाच्या सरी |
जनता बँकेत पुर्नगठीत बोर्ड ऑफ मॅनेजमेंटच्या चेअरमनपदी विनोद कुलकर्णी |
बोंडारवाडीसह धरणांची कामे मार्गी लावणार उदयनराजेंचे आश्वासन |
दलित महासंघ,पॅंथरचा उदयनराजेंना जाहीर पाठींबा |
सातारकरांना बाहेरच्यांनी स्वाभिमान शिकवू नये |
साताऱ्यात कोट्यावधीची कामे हीच आपली जमेची बाजू |
कोल्हापुरातील अंबाबाईच्या रथोत्सव |
छत्रपतींच्या वंशजांना जावळीचा स्वाभिमान सांगू नका |
माझ्याकडे विरोधकांच्या अनेक भानगडी |
महाभकास आघाडीला निवडणुकीत जागा दाखवा |
साताऱ्यात मेघगर्जनेसह बरसल्या पावसाच्या सरी |
जनता बँकेत पुर्नगठीत बोर्ड ऑफ मॅनेजमेंटच्या चेअरमनपदी विनोद कुलकर्णी |
बोंडारवाडीसह धरणांची कामे मार्गी लावणार उदयनराजेंचे आश्वासन |
दलित महासंघ,पॅंथरचा उदयनराजेंना जाहीर पाठींबा |
सातारकरांना बाहेरच्यांनी स्वाभिमान शिकवू नये |
साताऱ्यात कोट्यावधीची कामे हीच आपली जमेची बाजू |
जुगार प्रकरणी एकावर कारवाई |
नोकरीच्या अमिषाने सुमारे पावणे सहा लाखांची फसवणूक |
शहरातील दोन वेगवेगळ्या घटनांमध्ये दोनजण बेपत्ता |
विवाहितेला आत्महत्येस प्रवृत्त केल्याप्रकरणी पती विरुध्द गुन्हा |
शाहूनगर येथे घरफोडी |