सातारा : कराड शहरात कृष्णा, कोयनाचा संगम असल्यामुळे पाणी मोठ्या प्रमाणात एकत्र आले होते. ते दत्त चौकापर्यंत आले होते पण आता ते चार फुटांनी कमी झाले आहे. पूर ओसरत आहे, त्यामुळे लोकांनी कोणत्याही अफ़वाला बळी पडू नये असे कराडचे उपविभागीय अधिकारी हिम्मत खराडे यांनी सांगितले.
कोयना, धोम, या धरणाचे पाणी मोठ्या प्रमाणात अनुक्रमे कोयना आणि कृष्णा नद्यांमध्ये विसर्ग करावे लागत आहे. पण आता पावसाचा जोर कमी झाल्यामुळे विसर्ग कमी होवू शकतो. तथापि काल मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी कर्नाटकाचे मुख्यमंत्री यांच्याशी चर्चा केल्या नंतर अलमट्टी धरणातून सकाळी 6 पासून 4 लाख क्युसेक्स पाण्याचा विसर्ग सुरु केल्यामुळे झपाट्याने पुराच्या पाण्याची पातळी कमी होत आहे. कराड शहरातील दत्त चौकापर्यंत आलेले पाणी सकाळी 9 पर्यंत चार फुटांनी ओसरले आहे. त्यामुळे लोकांनी कोणत्याही अफवांना बळी पडू नये असे कराडचे उपविभागीय अधिकारी हिम्मत खराडे यांनी आवाहन केले आहे.
काल रात्रीच एन.डी.आर.एफ ची टीम जिल्ह्यात दाखल झाली आहे. जिथे आवश्यकता भासेल तिथे या टीम मधील लोक पाठविले जातील असे जिल्हा प्रशासनातर्फे सांगण्यात आले आहे.
जिल्ह्यात आतापर्यंत सरासरी 1047.69 मि.मी. पावसाची नोंद
जिल्ह्यात आज पहाटे आणि काल दिवसभरात एकूण 721.75 मि.मी. पाऊस पडल्याची नोंद झाली आहे. जिल्ह्यात गेल्या 24 तासात एकूण सरासरी 55.70 मि.मी. पाऊस झाला आहे. जिल्ह्यात सकाळी 8 वाजेपर्यंत झालेल्या पावसाची तालुकानिहाय माहिती आणि कंसात आतापर्यंत झालेल्या एकूण पावसाची आकडेवारी मि. मी. मध्ये पुढीलप्रमाणे आहे. सातारा- 57.28 (1440.53) मि. मी., जावळी- 119.42 (1782.67) मि.मी. पाटण- 88.91 (1540.85) मि.मी., कराड- 51.69 (836.31) मि.मी., कोरेगाव- 25.56 (590.44) मि.मी., खटाव- 15.10 (365.44) मि.मी., माण- 0.57 (150.27) मि.मी., फलटण- 3.00 (182.22) मि.मी., खंडाळा- 20.65 (463.70) मि.मी., वाई- 59.11 (747.60) मि.मी., महाबळेश्वर- 280.45 (5288.31) याप्रमाणे आजपर्यंत एकूण 13388.34 मि.मी. तर सरासरी. 1047.69 मि.मी. पावसाची नोंद झाली आहे.
कोयना धरणक्षेत्रात झालेल्या पावसाची आकडेवारी मि. मी. मध्ये पुढीलप्रमाणे
कोयना 249 मि.मी., नवजा 265 मि.मी., महाबळेश्वर 232 मि.मी. कोयना धरणात 97.63 टीएमसी एवढा पाणीसाठा झाला असून धरणातून 1,22,475 क्युसेस विसर्ग सुरु आहे.
प्रमुख धरणातील पाणीसाठा
सातारा जिल्ह्यातील प्रमुख धरणातील पाणीसाठा टी.एम.सी.मध्ये पुढील प्रमाणे. धोम-10.14, धोम-बलकवडी-3.46, कण्हेर-8.48, उरमोडी-8.99, तारळी-5.15, निरा देवघर-11.27, भाटघर-22.86, वीर-8.60.
साताऱ्यात मेघगर्जनेसह बरसल्या पावसाच्या सरी |
जनता बँकेत पुर्नगठीत बोर्ड ऑफ मॅनेजमेंटच्या चेअरमनपदी विनोद कुलकर्णी |
बोंडारवाडीसह धरणांची कामे मार्गी लावणार उदयनराजेंचे आश्वासन |
दलित महासंघ,पॅंथरचा उदयनराजेंना जाहीर पाठींबा |
सातारकरांना बाहेरच्यांनी स्वाभिमान शिकवू नये |
साताऱ्यात कोट्यावधीची कामे हीच आपली जमेची बाजू |
जुगार प्रकरणी एकावर कारवाई |
नोकरीच्या अमिषाने सुमारे पावणे सहा लाखांची फसवणूक |
शहरातील दोन वेगवेगळ्या घटनांमध्ये दोनजण बेपत्ता |
विवाहितेला आत्महत्येस प्रवृत्त केल्याप्रकरणी पती विरुध्द गुन्हा |
शाहूनगर येथे घरफोडी |
पंतप्रधान मोदी यांची सभा म्हणजे उदयनराजे यांच्या विजयाची नांदी |
वाट कशाची पाहता? कामाला लागा |
साताऱ्यात आरटीई प्रवेशासाठी पालकांचा कमी प्रतिसाद |
अफवांवर नाही, हवामान खात्यावर विश्वास ठेवा : हवामान खात्याचे प्रमुख सुनील कांबळे |
साताऱ्यात कोट्यावधीची कामे हीच आपली जमेची बाजू |
जुगार प्रकरणी एकावर कारवाई |
नोकरीच्या अमिषाने सुमारे पावणे सहा लाखांची फसवणूक |
शहरातील दोन वेगवेगळ्या घटनांमध्ये दोनजण बेपत्ता |
विवाहितेला आत्महत्येस प्रवृत्त केल्याप्रकरणी पती विरुध्द गुन्हा |
शाहूनगर येथे घरफोडी |
पंतप्रधान मोदी यांची सभा म्हणजे उदयनराजे यांच्या विजयाची नांदी |
वाट कशाची पाहता? कामाला लागा |
साताऱ्यात आरटीई प्रवेशासाठी पालकांचा कमी प्रतिसाद |
अफवांवर नाही, हवामान खात्यावर विश्वास ठेवा : हवामान खात्याचे प्रमुख सुनील कांबळे |
घोटाळेबाजांशी कायम लढत राहणार उदयनराजे गरजले |
साताऱ्यातील सुप्रसिद्ध डॉ. रविंद्र हर्षे यांचे दुःखद निधन |
भाजप देशाचे भविष्य तर काँग्रेस भूतकाळ उदयनराजे भोसले यांचा टोला |
कृष्णाबाई यात्रा महोत्सवाचा पालखी मिरवणुकीने शुभारंभ |
गंभीर गुन्हे करणार्या चौघांच्या टोळीला तडीपारीचा दणका |