सातारा : सातारा रनर्स असोसिएशनच्या वतीने मॅरेथॉनपट्टू व पत्रकार स्व.पांडुरंग पवार यांच्या स्मृतीस अभिवादन करण्यासाठी साताऱ्यात आज सकाळी आठ किलोमीटर मॅरेथॉन स्पधेर्च आयोजन करण्यात आले होते. सातारा रनर्स असोसिएशन व सातारा शहर पत्रकार संघ व इलेकट्रॉनिक मिडिया सातारा या तिन्ही संघटनेच्या पाचशेहून अधिक सदस्यांनी या मॅरेथॉनमध्ये भाग घेऊन पांडुरंग पवार यांना श्रध्दांजली वाहिली. रनर्स असोसिएशनच्या वतीने यावेळी स्व. पांडुरंग पवार यांच्या कुटुंबियांना एक लाख रुपयांची मदत करण्यात आली.
सातारा शहराच्या विविध माध्यमात मोठा मित्रपरिवार व जनाधार निर्माण करणाऱ्या व आरोग्याप्रती जागरूक असणारे पत्रकार पांडुरंग नामदेव पवार यांचे मागील आठवडयात अपघाती निधनं झाले. पांडुरंग पवार यांच्या अपघाती निधनामुळे संपूर्ण सातारा हळहळला. आणि मदतीचे हजारो हात पुढे आले. रनर्स असोसिएशनचे सदस्य डॉ संदीप काटे, डॉ प्रताप गोळे, अॅड. कमलेश पिसाळ यांनी साताऱ्यात झालेल्या छोटेखानी अभिवादन कार्यक्रमात स्व. पांडुरंग पवार यांच्या कुटुंबियांना एक लाख रुपयांची मदत शहर पत्रकार संघाचे अध्यक्ष विनोद कुलकर्णी, पत्रकार हरीश पाटणे, ज्येष्ठ पत्रकार शरद काटकर, इलेकट्रॉनिक मिडियाचे राहुल तपासे, सचिन जाधव, तुषार तपासे यावेळी उपस्थित होते. प्रातिनिधिक स्वरूपात पत्रकारांच्या वतीने विनोद कुलकर्णी व सचिन जाधव यांनी मनोगत व्यक्त केले. यंदा रनर्स असोसिएशनच्या वतीने आयोजित सातारा हिल हाफ मॅरेथॉन 25 ऑगस्ट रोजी साताऱ्यात होत आहे. या वर्षी 'मै भी मॅरेथॉनची सिपाही' ही टॅगलाईन असून सातारा जिल्ह्यासह जगभरातील स्पर्धक या मॅरेथॉनमध्ये सहभागी होणार असल्याची माहिती असोसिएशनचे डॉ संदीप काटे यांनी दिली. स्व.पांडुरंग पवार हे स्वत: या असोसिएशनचे सक्रीय सदस्य होते. असोसिएशनच्या एकूण सोळा आठवड्याच्या सराव सत्रापैकी आज पार पडलेली आठ किमीची पोलीस परेड ग्राउंड ते बोगदा ही मॅरेथॉन स्व. पवार यांना समर्पित करण्यात आली होती. या सराव सत्रात साधारण आठशे स्पर्धकांनी भाग घेतल्याचे सांगण्यात आले.
शाहूपुरी पोलिस ठाण्याच्या हद्दीत आढळला अनोळखी पुरुषाचा मृतदेह |
सातारा शहरातून दोनजणी बेपत्ता |
डॉ आंबेडकर जयंती समारोह अध्यक्षपदी संजय गाडे यांची निवड |
शरद पवारांच्या डावपेचाकडे महाराष्ट्राचे लक्ष |
कराडला रविवारी इंडिया आघाडीचा मेळावा |
पश्चिम महाराष्ट्रात दि. २९ ते ३१ पर्यंत महावितरणचे वीजबिल भरणा केंद्र सुरू |
करंजे पेठतील थकबाकीदाराची पालिकेकडून मालमत्ता केली सील |
साताऱ्यात लोकसभेबाबत शुक्रवारी शरद पवारांची बैठक |
जमिनीच्या वादातून धारदार शस्त्राने एकाचा खून |
लोकसभा सार्वत्रिक निवडणूक-2024 |
कोल्हापूरला निघालेली खासगी ट्रॅव्हल्स झाली पलटी |
पुण्यातील पीएमटीच्या बसचालकाची सोनगाव येथे आत्महत्या |
झाड मारल्याप्रकरणी सातार्यात दोन गुन्हे दाखल |
अदानी ग्रुपचा वीज प्रकल्प रद्द करण्याठी प्रकल्पग्रस्त जिल्हाधिकारी कार्यालयावर काढणार मोर्चा |
प्रतापसिंह नगरात अतिक्रमणांसह लल्लन आणि युवराजच्या दहशतीवर जिल्हा प्रशासनाचा बुलडोझर |

पाच नॅशनल पुरस्कार मिळवून श्लोक घोरपडे कोल्हापूर येथील स्पर्धेत मारणार बाजी |
'आयडियल' मतदारसंघाचे 'आयडॉल' आमदार |
आचारसंहिता काळात लोकशाही दिनाचे आयोजन होणार नाही : नागेश पाटील |
पोक्सोंतर्गत एकावर गुन्हा |
कुऱ्हाडीने वार केल्या प्रकरणी एकावर गुन्हा |