म्हसवड : म्हसवड येथे आठवडी बाजाराच्या दिवशी भेळच्या गाड्याचा माल मागितलेच्या कारणावरून चिडून जाऊन कांदा कापणेच्या चाकूने संशयित आरोपी शुभम गणेश तावरे यांने सागर दत्तात्रय भागवत (वय 32) संदीप दत्तात्रय भागवत (वय 30) व सुमित दत्तात्रय भागवत (वय 28, सर्व रा. कोष्टी गल्ली, म्हसवड) यांच्यावर चाकू हल्ला चढवला या हल्ल्यात तिघेजण जखमी झाले आहेत. जखमीपैकी दोघांना पुढील उपचारासाठी रुग्णवाहिकेने सातारा येथील जिल्हा रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. याबाबतची फिर्याद म्हसवड पोलीस ठाण्यात दाखल झाली.
दत्तात्रय पांडुरंग भागवत (रा. म्हसवड, कोष्टीगल्ली) यांचे म्हसवड बसस्थानकाशेजारी चौंडेश्वरी नावाचे भेळचे दुकान आहे. त्यांना आज पहाटे पाच वाजता विटा, ता. खानापूर येथील व्यापार्यांनी फोनवरून भेळगाड्याचा माल टेम्पोत पाठवला आहे. तो माल उतरून घ्या, असे सांगितले होते. त्याप्रमाणे भागवत हे सकाळी 5 वाजता बसस्थानकावर गेले होते. त्यावेळी संबंधित टेम्पो निघून गेला होता. त्यांचा भेळचा माल शेजारच्या भेळवाल्याने काढून घेतला होता. हा माल भागवत यांनी मागितला असता तुमचा माल घरी ठेवला आहे. घरून घेऊन जावा असे सांगितले. त्यावेळी भागवत यांनी तुमचे घर मला माहित नाही. त्यामुळे माझा माल तुम्ही आणून द्या. असे सांगितले. त्याकडे तावरे यांनी कानाडोळा केला. भागवत यांनी माझा माल आणून द्या, असे म्हणाले असता शुभम गणेश तावरे (रा. म्हसवड) याने शिवीगाळ व दमदाटी करून हाताने कानाखाली व ओठावर मारहाण केली.
याबाबत विचारणा करण्यासाठी भागवत यांची मुले सागर भागवत, सुमित भागवत, संदिप भागवत हे घटनास्थळी येऊन गणेश तावरे यांना विचारणा करत असताना, तावरे यांचा मुलगा शुभम तावरे यांने पप्पांना काय विचारताय तुमचे खूप झालंय असे म्हणत सागर, संदिप, सुमित यांचेबरोबर झटापट करून संशयित शुभम तावरे याने भेळच्या गाड्यावरील कांदा कापण्याच्या चाकूने तिघांवर वार केले. यामध्ये सागर भागवत याच्या उजव्या गालावर खोल वार झाल्याने त्याची प्रकृती गंभीर आहे. सुमित भागवत यांच्या डाव्या हाताच्या कोपरावर चाकूने वार केला. संदीप भागवत यांच्या हाताच्या दंडावर वार केला. सागर व सुमित या दोघांना शासनाच्या रुग्णवाहिकेतून सातारा सिव्हिल रूग्णालयात दाखल करण्यात आले आहे. तर आरोपी शुभम गणेश तावरे यास अटक करण्यात आली असून पुढील तपास पोलीस हवालदार सोरटे करत आहेत.
जिल्ह्यात 5105 पाणी स्त्रोतांची तपासणी |
आयुर्वेदिक गार्डनचा वॉकिंग ट्रॅक सुरू करण्याची मागणी |
तरुणांनी उद्योगविश्वात गरुड झेप घ्यावी |
महिलेचा विनयभंग केल्याप्रकरणी एकावर गुन्हा |
एकास मारहाण केल्याप्रकरणी तिघांवर गुन्हा |
अपघात प्रकरणी ट्रक चालकावर गुन्हा |
बांधकाम साहित्याची चोरी करणारी सराईत टोळी गजाआड |
वाई अर्बन बँकेच्या निवडणुकीत १५ जागांसाठी ७२ उमेदवारी अर्ज |
सोनी मराठी वरील कोण होणार करोडपतीच्या स्पर्धकांना २ करोड रुपये जिंकण्याची सुवर्णसंधी! |
मेट्रोपोलिस हेल्थकेअरने केले कराड येथे प्रगत निदान चाचणी केंद्र सुरू |
डॉ.बाळकृष्ण दामले यांची संचालक पदी निवड |
पाटणला रविवारी अजित पवार यांच्या उपस्थितीत राष्ट्रवादीचा मेळावा |
तो ऐतिहासिक रांजण अखेर पुरातत्व विभागाकडे जमा |
बोगस नळकनेक्शनची पालिकेकडून शोधमोहीम! |
नियमित कर्जफेड करणाऱ्या 24 हजार शेतकऱ्यांना प्रोत्साहनपर रकमेची प्रतीक्षा |
अपघात प्रकरणी ट्रक चालकावर गुन्हा |
बांधकाम साहित्याची चोरी करणारी सराईत टोळी गजाआड |
वाई अर्बन बँकेच्या निवडणुकीत १५ जागांसाठी ७२ उमेदवारी अर्ज |
सोनी मराठी वरील कोण होणार करोडपतीच्या स्पर्धकांना २ करोड रुपये जिंकण्याची सुवर्णसंधी! |
मेट्रोपोलिस हेल्थकेअरने केले कराड येथे प्रगत निदान चाचणी केंद्र सुरू |
डॉ.बाळकृष्ण दामले यांची संचालक पदी निवड |
पाटणला रविवारी अजित पवार यांच्या उपस्थितीत राष्ट्रवादीचा मेळावा |
तो ऐतिहासिक रांजण अखेर पुरातत्व विभागाकडे जमा |
बोगस नळकनेक्शनची पालिकेकडून शोधमोहीम! |
नियमित कर्जफेड करणाऱ्या 24 हजार शेतकऱ्यांना प्रोत्साहनपर रकमेची प्रतीक्षा |
साताऱ्यात इयत्ता १२ वीच्या परीक्षेत मुलींची बाजी |
वडूज पंचायत समितीचा विस्तार अधिकारी लाच लुचपतच्या जाळ्यात |
खिडकीचे गज वाकवून लॅपटॉपची चोरी |
रामाचा गोट येथून युवक बेपत्ता |
विरळी येथे युवकाची आत्महत्या |