03:36pm | Apr 18, 2019 |
सातारा : लोकसभेच्या ऐन रणधुमाळीत फलटण उपविभागीय पोलीस अधिकारी डॉ. अभिजीत पाटील यांच्यावर अडीच लाख रुपयांची लाच मागितल्या प्रकरणी पुणे व सातारा येथील लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने गुन्हा दाखल केला आहे. काल दुपारपासूनच या कारवाईबाबत पुणे व सातारा एसीबीने मोठ्या प्रमाणावर गुप्तता पाळली होती. दरम्यान उंदीर-मांजराच्या खेळानंतर रात्री उशिरा पुणे एसीबीने फलटण शहर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल केला आहे.
वाईचे तत्कालीन उपविभागीय पोलीस अधिकारी दीपक हुंबरे यांच्यानंतर जिल्ह्यात डीवायएसपी दर्जाच्या अधिकार्यांवर एसीबीची कारवाई झाल्यामुळे जिल्हा पोलीस दलात खळबळ उडाली आहे. सध्या जिल्ह्यात सातारा व माढा लोकसभा निवडणुकीच्या अनुषंगाने धुरळा उडाला आहे. जिल्हा पोलीस दलावर कायदा व सुव्यवस्था राखण्याची मोठी जबाबदारी आहे. असे असताना खंडाळा पोलीस ठाण्यात दाखल असलेला एका गुन्ह्याचा तपास फलटणचे उप विभागीय पोलीस अधिकारी डॉ. अभिजीत शिवाजीराव पाटील (वय 38) मूळ रा. प्लॉट नं. 6 स्वातंत्र्य सैनिक कॉलनी, राजेंद्र नगर, कोल्हापूर यांच्याकडे होता. या गुन्ह्यात झालेल्या फसवणुकीबाबत तक्रारदाराला आठ लाखाचा डीडी मिळवून देण्यासाठी डीवायएसपी डॉ. अभिजीत पाटील यांनी तक्रारदाराला अडीच लाख रुपयांच्या लाचेची मागणी केली होती. त्या अनुषंगाने तक्रारदाराने पुणे एसीबी यांच्याकडे तक्रार दाखल केली होती. त्यानुसार पुणे व सातारा एसीबीने डीवायएसपी डॉ. अभिजीत पाटील यांच्यावर काल दि. 17 रोजी सापळा लावला होता. परंतू डॉ. अभिजीत पाटील यांना संशय आल्यामुळे त्यांनी संबंधिताकडून लाचेची रक्कम न स्विकारता तक्रारदार यास गाडीत घालून तक्रारदाराचा मोबाईल तसेच शासकीय व्हाईस रेकॉर्डर जबरदस्तीने हिसकावून घेतल्याची माहिती सातारा एसीबीने प्रसिद्धीपत्रकाद्वारे दिलेली आहे. मात्र, सातारा व पुणे एसीबीची ही कारवाई संशयास्पद असल्याची चर्चा जिल्हा पोलीस दलात आहे. सातारा व पुणे एसीबीचे अधिकारी आपले टार्गेट पूर्ण करण्यासाठी कोणत्याही थराला जावू शकतात. सातारा पोलीस दलातील एका मोठ्या अधिकार्यावर काल झालेल्या या कारवाईमुळे पोलीस दलात खळबळ माजली आहे. या कारवाईमध्ये सातारा व पुणे एसीबीने मोठी गुप्तता पाळल्यामुळे काल रात्रीपर्यंत या घटनेचा तपशील प्रसारमाध्यमांनाही देण्यात आलेला नव्हता. त्यामुळे एकूणच या सर्व प्रकरणाला संशयाचे वलय निर्माण झाले आहे.
इतर प्रकरणात एसीबी कारवाई झाल्यानंतर याबाबतची माहिती प्रसारमाध्यमांना देत असते. परंतू फलटण डीवायएसपी प्रकरणात एसीबीने माहिती देण्यासाठी चोवीस तास का लावले? त्यामुळे एकूणच या कारवाईबाबत सस्पेन्स निर्माण झाला आहे.
शाहूपुरी पोलिस ठाण्याच्या हद्दीत आढळला अनोळखी पुरुषाचा मृतदेह |
सातारा शहरातून दोनजणी बेपत्ता |
डॉ आंबेडकर जयंती समारोह अध्यक्षपदी संजय गाडे यांची निवड |
शरद पवारांच्या डावपेचाकडे महाराष्ट्राचे लक्ष |
कराडला रविवारी इंडिया आघाडीचा मेळावा |
पश्चिम महाराष्ट्रात दि. २९ ते ३१ पर्यंत महावितरणचे वीजबिल भरणा केंद्र सुरू |
करंजे पेठतील थकबाकीदाराची पालिकेकडून मालमत्ता केली सील |
साताऱ्यात लोकसभेबाबत शुक्रवारी शरद पवारांची बैठक |
जमिनीच्या वादातून धारदार शस्त्राने एकाचा खून |
लोकसभा सार्वत्रिक निवडणूक-2024 |
कोल्हापूरला निघालेली खासगी ट्रॅव्हल्स झाली पलटी |
पुण्यातील पीएमटीच्या बसचालकाची सोनगाव येथे आत्महत्या |
झाड मारल्याप्रकरणी सातार्यात दोन गुन्हे दाखल |
अदानी ग्रुपचा वीज प्रकल्प रद्द करण्याठी प्रकल्पग्रस्त जिल्हाधिकारी कार्यालयावर काढणार मोर्चा |
प्रतापसिंह नगरात अतिक्रमणांसह लल्लन आणि युवराजच्या दहशतीवर जिल्हा प्रशासनाचा बुलडोझर |
पश्चिम महाराष्ट्रात दि. २९ ते ३१ पर्यंत महावितरणचे वीजबिल भरणा केंद्र सुरू |
करंजे पेठतील थकबाकीदाराची पालिकेकडून मालमत्ता केली सील |
साताऱ्यात लोकसभेबाबत शुक्रवारी शरद पवारांची बैठक |
जमिनीच्या वादातून धारदार शस्त्राने एकाचा खून |
लोकसभा सार्वत्रिक निवडणूक-2024 |
कोल्हापूरला निघालेली खासगी ट्रॅव्हल्स झाली पलटी |
पुण्यातील पीएमटीच्या बसचालकाची सोनगाव येथे आत्महत्या |
झाड मारल्याप्रकरणी सातार्यात दोन गुन्हे दाखल |
अदानी ग्रुपचा वीज प्रकल्प रद्द करण्याठी प्रकल्पग्रस्त जिल्हाधिकारी कार्यालयावर काढणार मोर्चा |
प्रतापसिंह नगरात अतिक्रमणांसह लल्लन आणि युवराजच्या दहशतीवर जिल्हा प्रशासनाचा बुलडोझर |
पाच नॅशनल पुरस्कार मिळवून श्लोक घोरपडे कोल्हापूर येथील स्पर्धेत मारणार बाजी |
'आयडियल' मतदारसंघाचे 'आयडॉल' आमदार |
आचारसंहिता काळात लोकशाही दिनाचे आयोजन होणार नाही : नागेश पाटील |
पोक्सोंतर्गत एकावर गुन्हा |
कुऱ्हाडीने वार केल्या प्रकरणी एकावर गुन्हा |