07:15pm | Aug 13, 2018 |
वरकुटे- मलवडी : सत्यमेव जयते वॉटरकप स्पर्धेत बनगरवाडी गावाचा माण तालुक्यात प्रथम क्रमांक आल्याने 10 लाख रु. वॉटरकपकडून व 5 लाख रुपयांचे पारितोषिक महाराष्ट्र शासन यांच्याकडून बक्षीस म्हणून मिळाले.
माण तालुक्याच्या पूर्वेला असणार्या बनगरवाडी करांच्या दुष्काळ मुक्तीच्या लढ्यास यश आल्याने ग्रामस्थांनी समाधान व्यक्त करीत बनगरवाडीत पेढे वाटून आनंद साजरा केला, तर वरकुटे मलवडी येथील हनुमान मंदिरात पंक्रोशीच्यावतीने बनगरवाडीचे सुरेश बनगर यांच्यासह पाणी फौंडेशनच्या संपूर्ण टिमचा नागरी सत्कार करण्यात आला. बनगरवाडीकरांची प्रमाणपत्र आणि सन्मानचिन्ह घेवून गावातून वाजतगाजत मिरवणूकही काढण्यात आली.
यावेळी वरकुटे मलवडीचे सरपंच बाळकृष्ण जगताप महाबळेश्वरवाडीचे सरपंच अंकुश गाढवे, मा.सभापती वसंतराव जगताप, जालींदर खरात, अरूण वणवे, मधुकर जगताप, जयसिंग नरळे, आदी मान्यवर उपस्थित होते. अप्पर आयकर आयुक्त डॉ. नितीन वाघमोडे यांच्या मार्गदर्शनाखाली बनगरवाडीतील तरुणांनी दुष्काळ मुक्तीचा लढा उभा केला. भविष्याचा वेध घेत तरुणांनी गावकर्यांचे मनसंधारण करून महिलांसह 45 दिवस अथक परिश्रम घेवून दुष्काळाची लक्तरे काढून फेकीत, जलक्रांती घडवली. म्हणून माण तालुक्यात प्रथम क्रमांक मिळाला. यामध्ये सरपंच सौ. रंजना बनगर, विक्रम शिंगाडे, उपसरपंच सागर बनगर, चेअरमन भारत अनुसे, मा.सरपंच वैभव शिंगाडे, बापुराव बनगर, भागवत अनुसे, ज्ञानेश्वर बनगर, पोलिस पाटील शहाजी बनगर यांनी लोकांच्या मनामध्ये प्रेरणा निर्माण करून बनगरवाडी गावातील लोकांना जलसंधारणाचे महत्त्व पटवून सांगितले आणि गावाच्या परिसरात 3 लाख घनमीटर काम, 27 शेततळी, 350 किलोमीटर नाला खोलीकरण व रूंदिकरण, 17 हजार घनमीटर डीप सिसीटी, 450 हेक्टर कंपार्टमेंट बिल्डिंग, 4500 घनमीटर सिसीटी, 180 एल.बी. एवढ्या मोठ्या प्रमाणात काम केले आहे.
एकास मारहाण केल्याप्रकरणी पाच जणांवर गुन्हा |
सातार्यातून युवक बेपत्ता |
नागठाण्यात युवकाची आत्महत्या |
उदयनराजे यांना मतदान करून गादीचा सन्मान ठेवा |
जपानचे स्लिम लँडर तिसऱ्यांदा जागृत |
कोल्हापुरातील अंबाबाईच्या रथोत्सव |
छत्रपतींच्या वंशजांना जावळीचा स्वाभिमान सांगू नका |
माझ्याकडे विरोधकांच्या अनेक भानगडी |
महाभकास आघाडीला निवडणुकीत जागा दाखवा |
साताऱ्यात मेघगर्जनेसह बरसल्या पावसाच्या सरी |
जनता बँकेत पुर्नगठीत बोर्ड ऑफ मॅनेजमेंटच्या चेअरमनपदी विनोद कुलकर्णी |
बोंडारवाडीसह धरणांची कामे मार्गी लावणार उदयनराजेंचे आश्वासन |
दलित महासंघ,पॅंथरचा उदयनराजेंना जाहीर पाठींबा |
सातारकरांना बाहेरच्यांनी स्वाभिमान शिकवू नये |
साताऱ्यात कोट्यावधीची कामे हीच आपली जमेची बाजू |
कोल्हापुरातील अंबाबाईच्या रथोत्सव |
छत्रपतींच्या वंशजांना जावळीचा स्वाभिमान सांगू नका |
माझ्याकडे विरोधकांच्या अनेक भानगडी |
महाभकास आघाडीला निवडणुकीत जागा दाखवा |
साताऱ्यात मेघगर्जनेसह बरसल्या पावसाच्या सरी |
जनता बँकेत पुर्नगठीत बोर्ड ऑफ मॅनेजमेंटच्या चेअरमनपदी विनोद कुलकर्णी |
बोंडारवाडीसह धरणांची कामे मार्गी लावणार उदयनराजेंचे आश्वासन |
दलित महासंघ,पॅंथरचा उदयनराजेंना जाहीर पाठींबा |
सातारकरांना बाहेरच्यांनी स्वाभिमान शिकवू नये |
साताऱ्यात कोट्यावधीची कामे हीच आपली जमेची बाजू |
जुगार प्रकरणी एकावर कारवाई |
नोकरीच्या अमिषाने सुमारे पावणे सहा लाखांची फसवणूक |
शहरातील दोन वेगवेगळ्या घटनांमध्ये दोनजण बेपत्ता |
विवाहितेला आत्महत्येस प्रवृत्त केल्याप्रकरणी पती विरुध्द गुन्हा |
शाहूनगर येथे घरफोडी |