- प्रकाश राजेघाटगे
सातारा : माणूस जगतो का? नि जगण्यासाठी एवढा धडपडतो का? याचा विचार आम्ही करणे जरूर आहे. त्या धडपडणार्या पतिताला आम्ही भित्रा समजतो, तो उंच गगनात गेलेल्या विद्युतमय मनोर्यावर उभे राहून विजेच्या तारा जोडतो, खाणीत उभ्या कड्यावर चढून सुरुंगाना पेट देतो, पोलादाच्या रस करणार्या भट्टीवर तो निर्भय वावरतो किंवा ओढ्यात भिजवलेल्या वाकाला फिरकीवर तयार केलेला दोरखंड बनवणे असो, इतर दलिताप्रमाणे त्याच्या सर्व भावना सदैव जागृत असतात. पण तो इतरांपेक्षा जरा निराळा असतो. कारण तो हाडामांसाचा केवळ गोळा नसतो. तो निर्मितीक्षम असतो. तो वास्तव जगात कष्टाचे सागर उपसून दौलतीचे डोंगर रचतो, नविन निर्मिती हाच त्याचा ध्यास असतो, म्हणून तर अशा संकल्पपुर्ती संघर्षमय जीवनाचा मानबिंदू म्हणजे आपले आनंदराव भोंडवे (खटाव पंचायत समिती उपसभापती)....
खटाव तालुक्याच्या पाचवीला दुष्काळ पुजलेला आहे. येथे आजही सधन कुटुंबातील लोक या दुष्काळामुळे काकुळतीला येतात, तर भुमीहीन दलित कुटुंबाबद्दल बोलायचे नको. पण अशा कठीण परिस्थितीत कळीकाळाला आव्हान देवून याच मातीत संघर्ष करून आपल्या पोटाची खळगी भरणारी आनंदाराव भोंडवे यांच्या सारखी कुटुंबे फारच थोडी असतात. गावकी व्यवहार बंद झाल्यानंतर या माणसाने जगण्याच्या संघर्षात वाजंत्रीची भुमिका पार पाडली. अमोल बँड च्या माध्यमातून तालुक्यात व संपुर्ण जिल्ह्यात त्यांची ख्याती पसरली. लहानपणी लोकांची तहान भागविण्यासाठी गारेगार विकणारा हा मनुष्य भविष्यात तालुक्यातील पंचायत समितीचा उपसभापती होईल असे कुणालाही वाटले नाही. पण शरद पवार साहेबांच्या सामाजिक अभिसरणातील हा मानबिंदू ठरला.म्हणून तर या माणसाला खटाव तालुका आधुनिक रॉबिनहुड मानतो हे निश्चितपणे मान्य करावे लागेल.
राष्ट्रवादी कॉंग्रेस पक्षाची स्थापना मुळातच समाजातील सामान्य घटकांना न्याय देण्यासाठी झाली आहे. आ.पवार साहेबांना अभिप्रेत असणारा सामाजिक समाज निर्माती हाच ह्या पक्षाचा मूलभूत घटक ह्या पक्षाचा केंद्रबिंदू आहे. याच धर्तीवर खटाव तालुक्याचा राष्ट्रवादी पक्ष कार्यरत आहे, म्हणून तर आनंदराव भोंडवे यांच्यासारख्या मातंग समाजातील व्यक्तीला पंचायत समितीचे तिकीट दिले गेले आणि आमोल बँड च्या माध्यमातून केलेली सेवा भोंडवेच्या कामी आली. लोकांच्या लग्नात ढोल वाजवणारा हा ढोली पंचायत समिती सदस्य झाला. आपल्या कामातून समाजाचे ऋण फेडणारे हे व्यक्तीमत्व फारच थोड्या जणांच्या लक्षात राहिले. त्यात उपमुख्यमंत्री अजितदादा पवार यांचे नांव प्रामुख्याने घ्यावे लागेल. म्हणून अडीच वर्षांनंतर ज्यावेळी उपसभापती निवडीचा विषय आला तेव्हा निढळ या गावच्या सुपुत्राचे नांव पहिल्या नंबरने घेतले गेले. यात आनंदराव भोंडवे यांच्या भूतकाळातील कार्याचा गौरव होत आहे, असेच आम्ही समजतो आणि तो तितकासा खरा म्हणावा लागेल. कारण उपसभापती पदासाठी कुठलेही आरक्षण नसताना एक आरक्षित व्यक्ती या पदावर येणे ह्या त्या पक्षाचा व त्या उमेदवाराचा सामाजिक समरसतेचा परिपाक असतो म्हणून जसे शरद पवार साहेब ग्रेट आहेत तसेच त्यांचे वारसा चालवणारेआनंदराव भोंडवे सारखे कार्यकर्तेही श्रेष्ठच म्हणावे लागतील.
एकास मारहाण केल्याप्रकरणी पाच जणांवर गुन्हा |
सातार्यातून युवक बेपत्ता |
नागठाण्यात युवकाची आत्महत्या |
उदयनराजे यांना मतदान करून गादीचा सन्मान ठेवा |
जपानचे स्लिम लँडर तिसऱ्यांदा जागृत |
कोल्हापुरातील अंबाबाईच्या रथोत्सव |
छत्रपतींच्या वंशजांना जावळीचा स्वाभिमान सांगू नका |
माझ्याकडे विरोधकांच्या अनेक भानगडी |
महाभकास आघाडीला निवडणुकीत जागा दाखवा |
साताऱ्यात मेघगर्जनेसह बरसल्या पावसाच्या सरी |
जनता बँकेत पुर्नगठीत बोर्ड ऑफ मॅनेजमेंटच्या चेअरमनपदी विनोद कुलकर्णी |
बोंडारवाडीसह धरणांची कामे मार्गी लावणार उदयनराजेंचे आश्वासन |
दलित महासंघ,पॅंथरचा उदयनराजेंना जाहीर पाठींबा |
सातारकरांना बाहेरच्यांनी स्वाभिमान शिकवू नये |
साताऱ्यात कोट्यावधीची कामे हीच आपली जमेची बाजू |
कोल्हापुरातील अंबाबाईच्या रथोत्सव |
छत्रपतींच्या वंशजांना जावळीचा स्वाभिमान सांगू नका |
माझ्याकडे विरोधकांच्या अनेक भानगडी |
महाभकास आघाडीला निवडणुकीत जागा दाखवा |
साताऱ्यात मेघगर्जनेसह बरसल्या पावसाच्या सरी |
जनता बँकेत पुर्नगठीत बोर्ड ऑफ मॅनेजमेंटच्या चेअरमनपदी विनोद कुलकर्णी |
बोंडारवाडीसह धरणांची कामे मार्गी लावणार उदयनराजेंचे आश्वासन |
दलित महासंघ,पॅंथरचा उदयनराजेंना जाहीर पाठींबा |
सातारकरांना बाहेरच्यांनी स्वाभिमान शिकवू नये |
साताऱ्यात कोट्यावधीची कामे हीच आपली जमेची बाजू |
जुगार प्रकरणी एकावर कारवाई |
नोकरीच्या अमिषाने सुमारे पावणे सहा लाखांची फसवणूक |
शहरातील दोन वेगवेगळ्या घटनांमध्ये दोनजण बेपत्ता |
विवाहितेला आत्महत्येस प्रवृत्त केल्याप्रकरणी पती विरुध्द गुन्हा |
शाहूनगर येथे घरफोडी |