06:26pm | May 30, 2019 |
सातारा : स्वत:चे पद टिकविण्यासाठी फलटण नरेश काहीही करु शकतात. रक्तातली मस्ती डोक्यात घुसली की कुलंगड्या केल्याशिवाय स्वस्थ झोप येत नाही. सातारा आणि माढ्यात फलटण नरेशांनी आपले उपद्रवमुल्य पणाला लावले. आपले राजकीय विरोधक असलेल्या रणजितसिंह, उदयनराजेंना लोळविण्याचे स्वप्न मात्र अधुरेच राहिल्यामुळे फलटण नरेशांना आपल्या चेहर्यावरची अवस्थता लपवता येत नाही, असे चित्र काही दिवसांपासून दिसून येत आहे.
उपयुक्तता संपल्यानंतर एखाद्या गोष्टीची जागा ‘डस्टबीन’च असते. फलटण नरेशांनीही राष्ट्रवादीच्या जिवावर अनेक पदे भोगली, मिजाशी मारल्या. परंतू राष्ट्रवादी अडचणीत असतानाच आज फलटण नरेश शिवसेनेच्या वाटेवर असल्याची चर्चा आहे. माय मरो, पण मावशी जगो, अशा पद्धतीचे राजकारण फलटण नरेशांनी प्रथमपासूनच केलेले आहे. फलटण नरेशांना महत्त्वाकांक्षी लोक आवडत नाहीत. ज्याने त्याने आपल्या पायाशी लोळण घ्यावी, अशी फलटण नरेशांची मनिषा असते. खा. उदयनराजे भोसले व खा. रणजितसिंह नाईक-निंबाळकर ही फलटण नरेशांची पहिल्यापासूनची नावडती माणसं. परंतू तकदीर का तकाजा भी देखो, ज्यांना आपण सतत पाण्यात पाहतो, ती निवडून आली, खासदार झाली हे आता फलटण नरेशांना सहन होत नाहीये. काही दिवसांत सभापतीपदाची वस्त्रेही अंगावरुन उतरणार आहेत, या एकाच विचाराने फलटण नरेशांची भंबेरी उडालेली आहे. काही करुन सत्तेत तर राहिले पाहिजे. कारण सत्तेशिवाय मी जगूच शकत नाही, अशी धारणा फलटण नरेशांची झाल्यामुळेच फलटण नरेश पद वाचविण्यासाठी शिवसेनेच्या मार्गावर असल्याचे बोलले जात आहे. राष्ट्रवादी सुप्रिमो शरद पवारांनी माढ्यातून लढण्याचा निर्णय मागे घेतल्यानंतर फलटण नरेशांच्या सुप्त भावना जाग्या झाल्या. परंतू पवारांनी फलटण नरेशांच्या सुप्त भावनेला हरताळ फासल्याने शेवटी फलटण नरेशांनी थेट माढ्याच्या तिकिटासाठी भाजपकडे फिल्डिंग लावली. परंतू मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी फलटण नरेशांच्या या सुप्त भावनेची भृणहत्त्या केल्यामुळे फलटण नरेशांचा स्वप्नभंग झाला.
शेवटी पारंपारिक प्रतिस्पर्धी असलेल्या रणजितसिंहांना आस्मान दाखविण्यासाठी फलटण नरेशांनी तालुक्यातून जोर लावला. परंतू हा जोर शेवटपर्यंत टिकला नाही. इकडे खंडाळ्यातही स्वपक्षाच्या उदयनराजेंना आस्मान दाखविण्यासाठी फलटण नरेशांनी ताकद लावली. परंतू इथेही फारसा उपयोग झाला नाही. खा. रणजितसिंह व खा. उदयनराजे हे दोघेही फलटण नरेशांचे तसे प्रतिस्पर्धी. तेही जनतेतून निवडून आलेले. गेली दोन दशके फलटण नरेश बारामतीकरांनी टाकलेल्या तुकड्यांवर जगले. परंतू आता अडकित्त्यात सुपारी अडकावी, अशी अवस्था फलटण नरेशांची झालेली आहे. इकडे बारामतीकर कोलताहेत, तर तिकडे भाजपवाले हिंग लावून विचारत नाहीत. कारण दगाबाजांची औकात या दोघांच्याही लक्षात आलेली आहे. शेवटी जावयाच्या पूर्वाश्रमीच्या पुण्याईच्या जोरावर फलटण नरेशांनी सभापतीपद वाचविण्यासाठी थेट ‘मातोश्री’कडे फिल्डिंग लावलेली आहे. परंतू ही फिल्डिंग कितीवेळ तग धरुन राहते, हे पाहणे औत्सुक्याचे ठरणार आहे. शिवसेनेतही सुभाष देसाई, दिवाकर रावते अशी ज्येष्ठ मंडळी आहेत. त्यांनाही मानाच्या पदावर बसायला आवडते. त्यामुळे फलटण नरेश जरी आपले पद वाचविण्यासाठी सेनेत गेले तरी त्यांना पोत्यावरच बसावे लागणार आहे. येणार्या विधानसभा निवडणुकीत फलटण तालुक्यात काय होणार, याची कल्पना त्यांना आलेलीच आहे. खंडाळ्यात केलेल्या पापाची दखल राष्ट्रवादी सुप्रिमो शरद पवारांनी घेतलेली आहे. त्यामुळे जिल्ह्याच्या राजकारणात फलटण नरेशांची असलेली मांड संपूर्णपणे विस्कटलेली आहे. माढ्यातही रणजितसिंहांनी फलटण नरेशांचे संस्थान खालसा केलेले आहे. त्यामुळे शिवसेनेत जाणार्या फलटण नरेशांना सेनेतही भविष्य नसणार. कारण सेनेत अगोदरच गुडघ्याला बाशिंग बांधलेले कमी नाहीत. माण-खटावमधून आ. जयकुमार गोरे, फलटणमधून खा. रणजितसिंह नाईक-निंबाळकर व सातार्यातून खुद्द खा. उदयनराजे भोसले या तिघांच्या रेट्याने मात्र फलटण नरेशांचे सॅण्डविच होणार आहे.
अल्पवयीन मुलीचे अपहरण |
महायुतीच्या रॅलीदरम्यान चोरट्यांची हाथ की सफाई |
सातारा पोलीस मुख्यालयात उपनिरीक्षकाला धमकी |
बिग बॉस फेम अभिजीत बिचुकले यांचा अर्ज दाखल |
महाविकास आघाडीच्या उमेदवाराचा पूर्ण ताकतीने प्रचार करणार |
माढयात अभय जगताप यांचे बंड शमले |
सातारा लोकसभा प्रबंधन समितीचे कार्य उत्कृष्ठ |
उदयनराजे भोसले यांची संपत्ती 251 कोटीची |
वादळी वाऱ्यात स्पीड बोट उलटून एकाचा मृत्यू |
निवडणूक स्थिर सर्वेक्षण पथकातील कर्मचाऱ्याला पोलिसाकडून मारहाण |
येणके येथील कुंभार वस्तीतील जल जीवन मिशनअंतर्गतचे काम प्रगतीपथावर |
निवडणुक निरिक्षक आर. अर्जुन व पोलिस निवडणुक निरिक्षक प्रदीप शर्मा यांचे जिल्ह्यात आगमन |
उदयनराजेंना विक्रमी मताधिक्याने निवडून आणण्यासाठी सर्वतोपरी प्रयत्न करणार |
श्री क्षेत्र निनाम येथील सासनकाठीला यात्रेत महत्वाचे स्थान |
मंदार कोल्हटकर, धिरज पाटील यांचे अपघाती निधन |
माढयात अभय जगताप यांचे बंड शमले |
सातारा लोकसभा प्रबंधन समितीचे कार्य उत्कृष्ठ |
उदयनराजे भोसले यांची संपत्ती 251 कोटीची |
वादळी वाऱ्यात स्पीड बोट उलटून एकाचा मृत्यू |
निवडणूक स्थिर सर्वेक्षण पथकातील कर्मचाऱ्याला पोलिसाकडून मारहाण |
येणके येथील कुंभार वस्तीतील जल जीवन मिशनअंतर्गतचे काम प्रगतीपथावर |
निवडणुक निरिक्षक आर. अर्जुन व पोलिस निवडणुक निरिक्षक प्रदीप शर्मा यांचे जिल्ह्यात आगमन |
उदयनराजेंना विक्रमी मताधिक्याने निवडून आणण्यासाठी सर्वतोपरी प्रयत्न करणार |
श्री क्षेत्र निनाम येथील सासनकाठीला यात्रेत महत्वाचे स्थान |
मंदार कोल्हटकर, धिरज पाटील यांचे अपघाती निधन |
ट्रकच्या धडकेत दुचाकीस्वाराचा मृत्यू |
राजवाडा परिसरातून सव्वा लाखांच्या सोन्याच्या चैनची चोरी |
मारहाण प्रकरणी चौघांवर गुन्हा |
ट्रक चालकाला लुटल्याप्रकरणी तीन अज्ञातांवर गुन्हा |
महिलेचा विनयभंग केल्याप्रकरणी एकावर गुन्हा |