01:51am | Aug 13, 2018 |
सातारा : पाणी फौंडेशन आयोजित सत्यमेव जयते वॉटर कप स्पर्धेत टाकेवाडी, ता. माण जि. सातारा या गावाने विजेतपद पटकावून 75 लाखाचे बक्षीस मिळवले. या राज्यस्तरीय स्पर्धेतील द्वितीय क्रमांकाचे संयुक्त बक्षीस प्रत्येकी 25 लाख रूपये भांडवली, ता.माण, जि.सातारा व सिंदखेड ता. मोताळा, जि. बुलढाणा या गावांना देण्यात आला. तर तृतीय क्रमांकाचे संयुक्त प्रत्येकी 20 लाख रूपये बक्षीस आनंदवाडी, ता.आष्टी, जि.बीड व उमठा ता. नरखेड, जि. नागपूर या गावांना मिळाला आहे.
पाणी फौंडेशन आयोजित सत्यमेव जयते वॉटर कप स्पर्धा पर्व 3 रे या स्पर्धेत माण तालुक्यातील टाकेवाडी व भांडवली ही दोन गावे राज्यस्तरीय स्पर्धेत विजेती ठरल्याने बनगरवाडी, ता. माण गावाला तालुकास्तरीय प्रथम क्रमांक मिळाले. खटाव तालुक्यातील गोपूज व कोरेगाव तालुक्यातील रूई गावाला तालुकास्तरीय क्रमांक मिळाला आहे.
पुणे येथील बालेवाडीत पार पडलेल्या वॉटर कप पुरस्कार सोहळ्यात जलसंधारणात भरीव काम करणार्या गावांचा गौरव करण्यात आला. याप्रसंगी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, माजी मुख्यमंत्री अशोक चव्हाण, राज ठाकरे, अमीर खान, किरण राव, ना.राम शिंदे, ना.विजय शिवतारे, माजी उपमुख्यमंत्री अजितदादा पवार, राधाकृष्ण विखेपाटील, पोपटराव पवार, सिनेअभिनेते, उच्चपदस्थ अधिकारी, पाणी फौंडशन, बीजेएसचे शांतीलाल मुथा व कार्यकर्ते, शेतकरीवर्ग मोठ्या संख्येने उपस्थित होते.
वॉटर कप स्पर्धा पर्व 2 रे या स्पर्धेत राज्याला आदर्शवत असे बिदाल, ता.माण येथील गावाने जलसंधारणाचे काम केले असताना बिदाल गावच वॉटर कप मिळवेल असा विश्वास राज्यभरातून व्यक्त केला जात होता. मात्र गेल्यावर्षी सर्वांच्या आशेवर पाणी फिरत या स्पर्धेत बिदाल गावाला तिसर्या क्रमांकावर समाधान मानावे लागले होते. तरीही हताश न होता पुन्हा नव्या जोमाने पर्व 3 च्या स्पर्धेत माणवासियांनी जलसंधारणाचे मोठे काम हाती घेतले. यात भांडवली, टाकेवाडी, बनगरवाडी, वाघमोडेवाडी, भाटकी, दिवड, नरवणे, कुकुडवाड, येळेवाडी आदी गावांनी वॉटर कप आपल्या गावात आणण्यासाठी अहोरात्र झटून श्रमदान केले होते.
राज्यस्तरीय पुरस्कार सोहळ्यास प्रारंभ झाल्यानंतर द्वितीय क्रमांकाचे संयुक्त बक्षीस भांडवलीला जाहीर झाल्यानंतर माण तालुक्याने मोठा जल्लोष केला. त्यानंतर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी प्रथम क्रमांकाचे बक्षीस जाहीर करताना सातारा जिल्ह्याचे नाव अगोदर सांगतानाच माण तालुक्यातील जनतेने मोठा जल्लोष करत टाकेवाडी गावाचा विजय असो असा जयघोष केला. टाकेवाडी वाटर कपचा मानकरी झाल्याचे पुकारताच माणचे आमदार जयकुमार गोरे व टाकेवाडी ग्रामस्थ व्यासपीठावर वाटर कप आणण्यासाठी उपस्थित होताच मोठा जल्लोष करण्यात आला. राज्य शासनातर्फे राज्यस्तरीय पहिला क्रमांक मिळालेल्या गावाला 25 लाख, दुसर्या क्रमांकाला 15 लाख तर तिसर्या क्रमांकाला 10 लाख रूपयांचे बक्षीस जाहीर करण्यात आले. पुरस्कार सोहळ्यात सकाळच्या सत्रात टाकेवाडी व भांडवली गावाला तालुकास्तरीय बक्षीस जाहीर केल्याने राज्यस्तरीय स्पर्धेतला आपला पत्ता कट झाला असा सर्व उपस्थितांचा समज झाल्याने नाराजीचा सूर दिसून येत होता. त्यामुळे कही खुशी कही गमचे वातावरण तयार झाले होते. मात्र संयोजकांनी यावर्षीच्या नियोजनात बदल केला असून आपल्या गावांची नावे राज्यस्तरीय स्पर्धेतही कायमही आहेत. नाराज होऊ नका असे म्हटल्यावर उपस्थितांना दिलासा मिळाला होता. अन प्रथम व द्वितीय क्रमांक माणलाच मिळाल्याने सर्वांनीच आनंद साजरा केला. माणवासियांच्या श्रमाचे चीज झाल्याचे सर्व उपस्थीतांकडून बोलले जात होते.
टाकेवाडी गावाने वाटर कप मिळवला असून त्यात आमदार जयकुमार गोरे यांनी महत्वपूर्ण भूमिका बजावली होती. त्यामुळेच त्यांना ग्रामस्थांनी खांद्यावर उचलून घेत त्यांच्या नावाचा जल्लोष ग्रामस्थ करताना दिसून येत होते.
या स्पर्धेत बीजेएसच्या मशीनरीने राज्यात 8.5 लाख तास कामे करत मोठा हातभार लावला असून यात सातारा जिल्ह्यात सर्वात जास्त कामे झाली आहेत. पण ती फक्त शरद पवार यांच्यामुळे झाली आहेत. त्यांनी विविध माध्यमातून सात कोटी रूपयांच्यावर निधी डिझेलसाठी उपलब्ध करून दिल्यामुळे मोठी कामे झाली आहेत असे बीजेएसचे शांतीलाल मुथा यांनी आपल्या मनोगतात सांगितल्यावर उपस्थितांकडून जल्लोष करण्यात आला.
कृष्णाबाई यात्रा महोत्सवाचा पालखी मिरवणुकीने शुभारंभ |
गंभीर गुन्हे करणार्या चौघांच्या टोळीला तडीपारीचा दणका |
बेकायदा दारु विक्रीप्रकरणी एकावर कारवाई |
आदेशाचे उल्लंघन केल्याप्रकरणी पाचजणांवर गुन्हा |
अपघातात जखमी केल्याप्रकरणी दुचाकी चालकावर गुन्हा |
वेगवेगळ्या घटनांमध्ये दोनजणी बेपत्ता |
सातारा शहरातील लल्लन टोळीवर मोक्का कारवाई |
कृष्णा खोरे महामंडळामुळे दुष्काळी भागात पाणी : उदयनराजे भोसले |
लोकसभा निवडणुकीच्या मतदानाची वेळ वाढवून मिळावी |
सूर्योदयाच्या मुहूर्तावर हनुमान जन्मोत्सव साजरा |
सणबूरच्या यात्रेत कुस्तीच्या फडात आग्या मोहोळाचा हल्ला |
उदयनराजेंच्या पत्नी दमयंतीराजेंचा काँग्रेसवर गंभीर आरोप |
वाई, जावळी तालुक्यात अवकाळी पाऊस |
अल्पवयीन मुलीवर अत्याचार करणाऱ्या युवकाला सश्रम कारावास |
उदयनराजे यांनी घेतले वाईच्या महागणपतीचे दर्शन |
वेगवेगळ्या घटनांमध्ये दोनजणी बेपत्ता |
सातारा शहरातील लल्लन टोळीवर मोक्का कारवाई |
कृष्णा खोरे महामंडळामुळे दुष्काळी भागात पाणी : उदयनराजे भोसले |
लोकसभा निवडणुकीच्या मतदानाची वेळ वाढवून मिळावी |
सूर्योदयाच्या मुहूर्तावर हनुमान जन्मोत्सव साजरा |
सणबूरच्या यात्रेत कुस्तीच्या फडात आग्या मोहोळाचा हल्ला |
उदयनराजेंच्या पत्नी दमयंतीराजेंचा काँग्रेसवर गंभीर आरोप |
वाई, जावळी तालुक्यात अवकाळी पाऊस |
अल्पवयीन मुलीवर अत्याचार करणाऱ्या युवकाला सश्रम कारावास |
उदयनराजे यांनी घेतले वाईच्या महागणपतीचे दर्शन |
तरुणांच्या भवितव्यासाठी मोदींच्या नेतृत्वाखाली स्थिर सरकार निवडून देऊया उदयनराजे यांचे आवाहन |
पाण्याच्या मोटरची चोरी |
सिव्हिल हॉस्पिटलच्या पार्किंगमधून दुचाकीची चोरी |
चैन स्नॅचिंग प्रकरणी दोन अज्ञातांवर गुन्हा |
अपघातात जखमी केल्याप्रकरणी एकावर गुन्हा |